भारतातील हे काही विचित्र पण महत्वाचे कायदे आपल्याला १००% माहित असायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण ज्या देशात राहतो त्या देशातील सुरक्षा व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेबाबत आपल्याला संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे असते. कारण ते आपल्यासाठीच असतात.

पण असे काही कायदे देखील असतात जे खूप लोकांना माहित नसतात. ते जाणून घेणे आपल्यासाठी गरजेचे असते.

असेच काही भारतातील कायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील पण ते जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय गरजेचे आहे.

१. एक मुलगा असताना दुसरा मुलगा/एक मुलगी असताना दुसरी मुलगी दत्तक घेता येत नाही.

 

adopting-child-inmarathi
indianexpress.com

आजकाल अनेक जोडप्यांचा कल मुलं दत्तक घेण्याकडे वाढतोय.

पण कधी कधी असं होतं की, एखाद्या जोडप्याला एक मुलगा आहे आणि त्यांना आणखी एकाला दत्तक घ्यायचं असेल तर ते मुलाला दत्तक घेऊ शकत नाही. कारण कायद्या अंतर्गत ते बेकायदेशीर आहे.

हिंदू अडॉप्शन अॅण्ड मेन्टेनन्स अॅक्ट १९५६ नुसार, विवाहित जोडपं एकाच लिंगाच्या दोन मुलांना दत्तक घेऊ शकत नाही. म्हणजे जर त्या जोडप्याला आधी मुलगा आहे तर त्यांना मुलीला दत्तक घ्यावे लागेल.

२. महिला ह्या तक्रार ईमेल द्वारे देखील करू शकतात.

 

women-complaint-inmarathi
www.shutterstock.com

महिलांकरिता हा कायदा खरच फायदेशीर ठरणारा आहे. जर एखादी महिला ही तिची तक्रार नोंदविण्याकरिता पोलीस ठाण्यात जाऊ शकली नाही तर ती डेप्युटी कमिश्नर किंवा पोलीस कमिशनरला आपली तक्रार ईमेल किंवा रजिस्टर्ड पोस्ट पाठवू शकते.

३. कुठलीही व्यक्ती कुठल्याही हॉटेल मधून पाणी घेऊ शकते किंवा तिथलं बाथरूम वापरू शकते.

 

indian-law-inmarathi06
thehotelairport.com

इंडियन साराईस अॅक्ट १८६७ नुसार कुठलीही व्यक्ती कुठल्याही हॉटेलमधून स्वतःसाठी किंवा स्वतःच्या पाळीव जनावरांसाठी मोफत पाणी मागू शकते. तसेच ती हॉटेलचे बाथरूम वापरू शकते.

४. संपत्ती खरेदी केल्यावर त्याची सार्वजनिकरित्या सूचना देणे.

 

indian-law-inmarathi05
topyaps.com

हा कायदा कदाचित अनेकांना ठाऊक असेल. जेव्हा तुम्ही कुठलीही स्थावर संपत्ती म्हणजेच जमीन किंवा घर खरेदी करता तेव्हा त्याची सूचना ती वृत्तपत्रातून देणे गरजेचे असते.

तुम्ही ती कुठल्याही वृत्तपत्रात देऊ शकता.

५. लग्नाला एक वर्ष होईपर्यंत घटस्फोटाचा अर्ज देता येत नाही.

 

theindiantelegraph.com.au

हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १४ नुसार कुठल्याही विवाहित जोडप्याला लग्नाला एक वर्ष होईपर्यंत घटस्फोट घेता येत नाही. लग्नाला एक वर्ष होइपर्यंत ते घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकत नाही.

६. सिलेंडरचा स्फोट झाल्यास भरपाईची मागणी करता येते…

 

indian-law-inmarathi04
rediff.com

जर घरातल्या सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाली, तर तुम्ही उपभोक्त्या कंपनीकडे ४० लाखापर्यंत भरपाईची मागणी करू शकतात.

७. एका दिवसाला एकदाच दंड आकारला जाऊ शकतो.

 

indian-law-inmarathi03
dnaindia.com

एखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चुकीकरिता दंड भरावा लागत नाही.

पण ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, एकदा दंड भरल्यावर तुम्ही वारंवार कायदे मोडायला मोकळे झालात.

८. लिव्ह-इन-रिलेशनशिप हे बेकायदेशीर नाही…

 

indian-law-inmarathi02
realbharat.org

लिव्ह-इन-रिलेशनशिप ला आपल्या देशात अजूनही सामाजिकदृष्ट्या मान्यता मिळालेली नाही. पण तरी त्याला कायद्याची मान्यता प्राप्त आहे.

म्हणजे आपण जरी आपल्या परंपरेनुसार त्याला चुकीचे मानत असलो तरी देखील ह्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही.

९. स्त्री पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे.

 

indian-law-inmarathi01
financialsamachar.com

संविधानात नमूद परिच्छेद ३९ (डी) नुसार, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळावे. पण ह्या कायद्याची अमंलबजावणी होताना फारशी दिसून येत नाही.

१०. स्त्री गुन्हेगाराला स्त्री पोलिसच अटक करू शकते.

 

indian-law-inmarathi
jamiiradio.com

अनेकदा असं बघायला मिळतं की, महिलांना देखील पुरुष पोलीस अटक करतात. पण कायद्यानुसार कुठलाही पोलीस अधिकारी महिलेला अटक करू शकत नाही. तर त्यासाठी स्त्री पोलीस असणे गरजेचं असते.

तसेच सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत स्त्रियांना अटक केली जाऊ शकत नाही.

तर हे काही महत्वाचे कायदे आपल्याला एक भारतीय म्हणून माहिती असायलाच हवे. आणि जर माहित नसतील तर आपल्या गरजेच्या सर्व कायद्यांची माहिती करुन घ्यायलाच हवी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?