श्रीमंत व्हायचंय? मग या टिप्स खास तुमच्यासाठी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

श्रीमंत होणे कोणाला नको असते? आपल्याकडे भरपूर पैसा असावा, सर्व सुखसोयींनी युक्त असे घर असावे, आयुष्यात कधीही कुठलेही काम पैश्यांविना अडू नये असे सर्वांनाच वाटते. कारण ह्या भौतिक जगात पैश्याशिवाय माणसाचे पान हलू शकत नाही हे कटू असले तरी सत्य आहे.

पैसा हे साध्य जरी नसले तरी साधन नक्कीच आहे. आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे साधन!

म्हणूनच प्रत्येक माणूस आपल्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहावा ह्यासाठी प्रयत्न करीत असतो. असं म्हणतात की लहान वयातच सुरुवात केली की पैसा जमवणे व साठवणे सोपे जाते.

जितक्या लवकर तुम्ही पैसा कमावण्यास सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.

 

rich-tips-marathipizza01
whytoread.com

“मला लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल” हा विचार सगळेच करतात. आज आम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी आणले आहे.

Scripbox ही एक वेल्थ मॅनेजमेण्ट करणारी कंपनी आहे तसेच ती ग्राहकांना म्युचुअल फंड स्कीम सुद्धा देते. थोडक्यात ही कंपनी तुमचे आर्थिक मॅनेजमेण्ट कसे करावे ह्या साठी तुम्हाला सहाय्य करते.

ह्या कंपनीचे संस्थापक तसेच सीईओ अशोक कुमार ह्यांनी त्यांच्या Scripbox च्या ब्लॉग वर त्यांना विचारलेल्या ‘मला लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल?’ ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून ज्या टिप्स दिल्या आहेत

त्या आज आम्ही खास तुमच्यासाठी आणल्या आहेत. त्यांनी त्यांच्या काही सवयींबद्दल सांगितले ज्यांचा त्यांना आयुष्यात आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी उपयोग झाला.

 

१. बजेट ठरवून त्यानुसार खर्च करणे

 

rich-tips-marathipizza02
zeenews.india.com

कुठल्याही खर्चासाठी आधी प्लान करणे, आपले बजेट ठरवणे आणि त्यानुसारच खर्च करणे हे आवश्यक आहे. त्याचा पुढील आयुष्यातही खूप फायदा होतो आणि तुमचा अवास्तव खर्च होत नाही.

तुमच्या खर्चाची विभागणी करा.

कुठला खर्च आवश्यक आहे आणि कुठला खर्च फक्त चैन आणि मजा ह्यासाठी होतोय किंवा होणार आहे ह्याचे नीट प्लानिंग करा. शक्यतोवर कर्ज घ्यावे लागेल अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका.

खर्च झाला की माणसाला अपराध्यासारखं वाटतं. हे टाळायच असेल तर आधीच सर्व खर्चाचे प्लानिंग करा, कारण आयुष्यात खर्च होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी केली असेल तर तुम्हाला अपराधी वाटणार नाही.

 

२. प्लान B ठेवा किंवा आपत्कालीन खर्चासाठी/ निकडीच्या प्रसंगासाठी नेहेमी तयार राहा

 

rich-tips-marathipizza03
scripbox.com

बजेट ठरविण्याबरोबरच थोडे थोडे करून आपत्कालीन खर्चासाठी किंवा अगदीच निकडीच्या प्रसंगासाठी वेगळे सेव्हिंग करा. ह्याने तुम्हाला कधीही गरज पडल्यास पैश्याची वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडणार नाही.

आणि जर अशी परिस्थिती नाही उद्भवली, तरी सुद्धा तुमच्याकडे बराचसा पैसा असेल, जो तुम्ही नंतर काही मोठा खर्च करायचा झाल्यास वापरू शकता. जेणेकरून तुमच्या इतर सेव्हिंगला धक्का लागणार नाही.

 

३. सेव्हिंग करण्याला पहिले प्राधान्य द्या

 

rich-tips-marathipizza04
stepupmoney.com

सामान्यपणे लोक काय करतात की पगार झाल्यावर आधी सर्व खर्च करतात अन् मग महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे सेव्हिंग मध्ये टाकतात. पण असे केल्याने तुमचे सेव्हिंग कधी कमी तर कधी जास्त असे होऊ शकते.

त्यापेक्षा महिन्याच्या सुरुवातीलाच एक ठराविक रक्कम सेव्हिंग मध्ये टाकण्याची सवय ठेवा. तुमच्या ह्या दर महिन्याच्या सेव्हिंगचा सुद्धा महिन्याच्या खर्चाच्या लिस्ट मध्ये समावेश करा.

म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला ठराविक रक्कम सेव्ह होईलच शिवाय महिन्याच्या शेवटी जर काही पैसे उरले तर तो तुमच्या सेव्हिंगसाठी बोनस असेल. म्हणजेच आधी सेव्हिंग करण्याला प्राधान्य द्या.

 

४. पैश्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा

 

rich-tips-marathipizza05
ways2capital.com

नुसतेच सतत सेव्हिंग करून तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही. तुमचा पैश्यानेच पैसा वाढेल अशी काहीतरी गुंतवणूक तुम्ही करायला हवी. ज्या गुंतवणुकीतून जास्त प्रमाणात परतावा मिळू शकेल अशा ठिकाणी आपला पैसा इन्व्हेस्ट करा.

लक्षात ठेवा, जितकी जास्त योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल तितका तुमचा पैसा वाढेल. आणि जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे त्या प्रमाणात पैसा असायला हवा.

परंतू गुंतवणूक तिकडेच करा जिकडे तुमची फसवणूक होणार नाही आणि परतावा मिळण्याची खात्री असेल. पळत्याच्या पाठी लागताना हातचे निसटून जाईल असे चुकूनही करू नका.

५. ह्याशिवाय सतत स्वतःला अपडेटेड ठेवा. नवीन नवीन गोष्टी शिकून कायम स्वतःच्या कौशल्यांमध्ये भर घाला.

 

rich-tips-marathipizza06
intuition.com

श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमचा पगार वेळोवेळी वाढवत नेणे फार गरजेचे आहे. पगार वाढवण्यासाठी तुमच्या कामाच्या संदर्भात सतत नवनवीन काहीतरी शिकून नव्या संधीच्या शोधात राहा. स्वतःमध्ये सतत सुधारणा करा. म्हणजे नव्या संधी तुमच्याकडे चालून येतील आणि तुमच्याकडे पैश्याचा ओघ वाढता राहील.

काहीच न करता केवळ पगारवाढीची वाट बघणे योग्य नाही. अशाने काहीही साध्य होत नाही. म्हणून कायम स्वत:ची कौशल्ये अधिक विकसित कशी होतील ह्याकडे लक्ष द्या.

तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल कारण कौशल्यपूर्ण माणसाला संधी देण्यास लोक कायम उत्सुक असतात.

ह्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही प्रयत्न केले तर तुमचे आयुष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न नक्कीच लवकर पूर्ण होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?