शाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

शाहरुख खान म्हणजेच बॉलीवूडचा किंग खान. शाहरुखचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र आहेत. लोक त्याचे एवढे दिवाने आहेत की, त्याची एक झलक बघण्यासाठी त्याच्या घराबाहेर गर्दी करतात.

जर तो नाहीच दिसला तर त्याच्या बंगल्याबाहेर लागलेल्या “मन्नत”च्या पाटीबरोबर फोटो काढूनच समाधान मानतात.

कारण जेवढी पॉप्युल्यारीटी शाहरुखची आहे तेवढीच मन्नतची देखील आहे.पण तुम्ही शाहरुखचे कितीही मोठे चाहते असाल तरी तुम्हाला त्याच्या मन्नत बद्दल ह्या गोष्टी माहित नसतील.

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi07
pinkvilla.com

हा बंगला मिळविण्यासाठी त्याला खूप विनंती करावी लागली होती.

शाहरुखचा हा शानदार बंगला त्याने बनवून नाही घेतला, तर हा बंगला त्याने एका गुजराती व्यवसायिकाकडून विकत घेतला आहे. जे कधी काळी त्याचे शेजारी होते. जेव्हा शाहरुखने पहिल्यांदा हा बंगला बघितला तेव्हाच त्याला आवडला.

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi06
cosmopolitan.in

ह्या बंगल्याचे तेव्हाचे मालक नरिमन दुबेशी ह्यांना खूप विंनती केल्यानंतर शेवटी त्यांनी त्यांचा हा अलिशान बंगला १३.३२ कोटी रुपये किमतीत शाहरुखला विकला.

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi08
indiatvnews.com

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, शाहरुखला त्याच्या घरी एक विशेष प्रार्थनास्थळ बनवायचे होते. म्हणून त्याला त्याचे घर डिझाईन करवून घ्यायचे होते.

पण हा बंगला त्याला पहिल्याच नजरेत भावला आणि त्याने हा विकत घेण्याचा ठाम विचार केला.

एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की, जर तो कधी पूर्णपणे उध्वस्त झाला तरी तो आपलं सर्व काही विकून टाकेल पण ‘मन्नत’ कधीही विकणार नाही. ह्यावरून लक्षात येते की, त्याच्यासाठी मन्नत किती महत्वाचा आहे.

मन्नतचे नाव आधी ‘विला विएना’ होते

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi02
celebritytonic.com

जेव्हा हा बंगला नरिमन दुबेशी ह्यांच्या मालकीचा होता तेव्हा त्याचं नाव ‘विला विएना’ होतं. पण जेव्हा शाहरुखने हा बंगला विकत घेतला तेव्हा त्याने ह्या बंगल्याचं नाव मन्नत ठेवले.

आज ह्याची किंमत २०० कोटींहून अधिक आहे

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi03
zeenews.india.com

शाहरुख खानने त्यावेळी हा बंगला १३.३२ कोटीला विकत घेतला होता. आज ह्याची किंमत २०० कोटीच्या घरात आहे.

शाहरुखचा हा बंगला आज जगातील सर्वश्रेष्ठ घरांच्या लिस्टमध्ये १० व्या स्थानावर आहे.

ह्या बंगल्यात एक शानदार लॉज आणि त्यासोबतच मोठा स्टुडिओ देखील आहे. ह्याचं इंटिरियर एवढं अप्रतिम आहे की बघणारा बघतच राहतो.

 

Shah-Rukh-Khan-Mannat-inmarathi
zebree.info

६ हजार स्क्वेअर फूटच्या परिसरात पसरलेला हा बंगला सहा मजल्यांचा आहे.

ज्यामध्ये पाच बेडरूम, दोन लिविंग रूम, एक गेस्ट रूम आहे. सोबतच ऑफिस, लायब्ररी, जिम, मनोरंजन रूम आणि कार पार्किंगसाठी देखील खूप जागा आहे.

ह्या बंगल्याचं इंटेरियर शाहरूखची पत्नी गौरी हिने केले आहे. ह्याला पूर्णपणे डिझाईन करण्यासाठी तिला चार वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला.

शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला एवढा मोठा आहे की त्यात २२५ लोक आरामात राहू शकतील…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “शाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी

 • March 9, 2018 at 12:41 pm
  Permalink

  Nice and interestingKeep it the nice work andथोड competitive चि तयारी कशी करावी याच्या बद्दल माहिती हवी

  Reply
 • March 10, 2018 at 10:53 pm
  Permalink

  अप्रतिम

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?