एका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===


अमृतसरच्या खास आणि प्रसिद्ध जागांपैकी एक आहे गुरुद्वारा हरमिंदर साहिब. जो गोल्डन टेम्पल नावाने सुद्धा ओळखला जातो. हा गुरुद्वारा आपली सुंदरता आणि धार्मिक एकतेसाठी पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे धार्मिक स्थळ फक्त सुंदरच नाही, तर इतिहासाच्या दृष्टीने खूप विशेष आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, गोल्डन टेम्पलशी निगडीत काही रंजक गोष्टी!

golden-temple-marathipizza01
sites.ndtv.com

१. सुवर्ण मंदिर उभारण्यासाठी जमीन मुस्लिम शासक अकबराने दान केली होती.

 

२. या मंदिराचा पाया साईं मिया मीर नावाच्या एका मुस्लिम संताने ठेवला होता. सुफी संत साईं मिया मीरला शीख धर्माबद्दल पहिल्यापासून आकर्षण होते. ते लाहोरचे राहणारे होते आणि शिखांचे पाचवे गुरु अर्जन देव यांचे मित्र होते. जेव्हा हरमंदिर साहिब उभारण्याचा विचार करण्यात आला, तेव्हा हा निर्णय घेण्यात आला की या मंदिरात सर्व धर्माच्या लोकांना प्रवेश देण्यात येईल. यानंतर शिखांचे पाचवे गुरु अर्जन देव यांनी लाहोरचे सुफी संत साईं मिया मीर यांच्याकडून डिसेंबर १५८८ मध्ये या मंदिराचा पाया घातला होता.

 

३. महाराजा रणजीत सिंहानी मंदिर बनवल्यानंतर जवळपास २ शतकानंतर या मंदिराच्या भिंतींवर सोने चढवले होते.

 

४. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटीश सरकारने जिंकण्यासाठी इथे अखंड पाठ करवला होता.

golden-temple-marathipizza02
dailysikhupdates.com

५. अहमद शाह अब्दालीचा सेनापती जहां खान याने या मंदिरावर हल्ला केला होता, ज्याचे उत्तर देताना शीख सैन्याने त्याच्या पूर्ण सैन्याला ठार मारले होते.

 

६. या मंदिरात सर्व धर्मांचे लोक येतात. मंदिराचे चार दरवाजे चारही धर्माच्या एकतेच्या रुपात बनवले गेले होते.

 

७. इथे जगातील सर्वात मोठे लंगर लावला जातो.  जवळपास ७०००० लोक रोज मंदिरात जेवतात.

 

८. असे म्हणतात की, मुगल बादशाह अकबराने सुद्धा गुरूच्या या लंगर मध्ये सामान्य लोकांमध्ये बसून प्रसाद घेतला होता.

golden-temple-marathipizza03
sites.ndtv.com

 

९. या मंदिरात २४ तास हलव्याची व्यवस्था असते. अंदाजाप्रमाणे, इथे रोज २ लाख चपात्या बनवल्या जातात.

 

१०. या मंदिरात ३५ टक्के पर्यटक शीख धर्माचे नसून इतर धर्मांचे असतात.

 

११. या मंदिरात सामान्य लोकांपासून अरबोपती लोकांपर्यंत सामान्य माणसांपर्यंत सर्वजण सेवा करतात. ते बूट पॉलिश पासून ताटल्या ही साफ करतात.

 

१२. मानले जाते की, सरोवराच्या मधून निघणारा रस्ता हे दर्शवतो की मृत्यूनंतर ही एक यात्रा असते.

golden-temple-marathipizza04
eminenttravel.org

 


१३. सुवर्ण मंदिराचे कित्येकवेळा नुकसान करण्यात आले होते. परंतु भक्ती आणि आस्था यांचे केंद्र असलेल्या या मंदिराला परत घडवण्यात आले. असे म्हणतात की, १९ व्या शतकातील अफगाण हल्लेखोरांनी या मंदिराला पूर्णपणे नष्ट केले होते. तेव्हा महाराजा रणजीत सिंहानी याचे नुतनीकरण करण्याबरोबरच याच्या घुमटावर सोने चढवले.

 

१४. मंदिर केव्हा-केव्हा नष्ट करण्यात आले आणि केव्हा-केव्हा पुन्हा बनवण्यात आले, हे तिथे लावलेल्या शिलालेखांमुळे समजते.

 

१५. सुवर्ण मंदिर पहिल्यांदा दगड आणि विटांपासून बनवण्यात आले होते. नंतर यामध्ये सफेद संगमरवर वापरण्यात आले होते.

 

१६. सुवर्ण मंदिराच्या पायऱ्या वर नाही तर खाली जातात. ज्या माणसाला वरून खाली यायला शिकवतात.

 

१७. शिखांचे चौथे गुरु रामदासजी यांनी तलाव बनवण्याचे काम सुरु केले होते.

golden-temple-marathipizza05
ixigo.com

कधी पंजाब प्रांताला भेट दिलीत तर भारताची शान असलेल्या या सुवर्णमंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?