आर्मी युनिफॉर्मबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आर्मीचा युनिफॉर्म घालायला मिळून देशाची सेवा करणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण हा युनिफॉर्म घालायला मिळणे इतके सोपे नाही. त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. अनेक कसोटींवर खरे उतरावे लागते. अनेक परीक्षा पार कराव्या लागतात. हजारो इच्छुक उमेदवारांपैकी काहीच लोकांना आर्मी मध्ये निवडल्या जाण्याचा मान मिळतो आणि त्यांचे अनेक वर्ष असलेले आर्मी युनिफॉर्म घालायला मिळण्याचे स्वप्न साकार होते.

indian-army-uniform-marathipizza01
mensxp.com

आपल्या आर्मीचा जंगल camouflage युनिफॉर्म हा जंगल आणि झाडीच्या प्रदेशात काम करण्यासाठी म्हणून असा डिझाईन केलेला आहे. तसेच डेझर्ट camouflage युनिफॉर्म हा राजस्थानच्या वाळवंटाच्या प्रदेशाशी मिळताजुळता म्हणून डिझाईन करण्यात आला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांना भारतात आल्यावर त्यांचे पांढऱ्या रंगाचे समर ट्युनिक्स न्युट्रल टोन मध्ये म्हणजेच खाकी रंगात डाय करावे लागले होते. ही तात्पुरती गोष्ट नंतर १८व्या शतकात कायम करण्यात आली. १९०२ मध्ये Second Boer War दरम्यान संपूर्ण ब्रिटीश आर्मीने तपकिरी रंगाच्या युनिफॉर्म वर शिक्कामोर्तब केले. नंतर त्याच रंगाचा युनिफॉर्म भारतीय सैन्यासाठी सुद्धा फायनल करण्यात आला.

हा युनिफॉर्म काही साधा सुधा युनिफॉर्म नाही. ह्या युनिफॉर्मशी जोडल्या गेल्या आहेत भावना आणि देशाचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी! देशासाठी प्राण कुर्बान करण्यासारखा मोठा त्याग! ह्या युनिफॉर्मशी जोडली गेलीये शिस्त, सळसळता उत्साह! देशासाठी प्राणत्याग करण्यासाठी आयुष्य प्राणपणाने जगणे हे फक्त आर्मीमधले लोकच करू शकतात. ह्या युनिफॉर्मशी ह्या बरोबरच अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. हा युनिफॉर्म इतका खास बनवण्यामागे अनेक लोकांच्या कल्पना, खास टेक्नोलॉजी आहे. हा युनिफॉर्म असा बनवला आहे कारण आर्मीतल्या लोकांना त्यांच्या कपड्यांमुळे कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये. ह्या गोष्टी जगभरातले देश आणि त्यांच्या सेना फॉलो करतात कारण सैनिक देशाचे रक्षण करत असताना त्यांच्या कपड्यांमुळे त्यांच्या कामात कुठलाही अडथळा येऊ नये.

indian-army-uniform-marathipizza
quora.com

 

१. आर्मीच्या युनिफॉर्मला झिप नसतात, त्या जागी हुक असतात.

indian-army-uniform-marathipizza02
beinghearted.com

हल्ली आपल्याकडे झिपचा भरपूर वापर केलेल्या ड्रेसेसची फॅशन आहे. पण अमेरिकन आर्मी त्यांच्या सैनिकांच्या युनिफॉर्म मध्ये झिप लावण्याच्या सक्त विरोधात आहे. ह्याचे कारण आहे की युद्धाच्या काळात किंवा इमर्जन्सी मध्ये माती, चिखल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीत झिप अडकू शकते आणि त्यामुळे सैनिकाच्या जलद हालचालींवर मर्यादा येऊ शकतात.

मी स्पेशल ऑपरेशन्सविषयीचे अनेक किस्से ऐकले आहेत ज्यात वेल्क्रोच्या आवाजामुळे शत्रूला सैनिकांच्या पोझिशनचा अंदाज आला होता.

असे युएस आर्मीचे Mary Roach ह्यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेले आहे. रोच ह्यांनी अनेक वर्ष युएसच्या आर्मी मध्ये काम केले आहे.

 

२. अग्निरोधक कापडाचा वापर

indian-army-uniform-marathipizza03
indiamart.com

जगातल्या सर्व देशांच्या आर्मी आणि अर्थातच भारताच्या आर्मी ह्याची संपूर्ण काळजी घेतात की त्यांच्या सैनिकांचा युनिफॉर्म सर्व प्रकारच्या युद्धासाठी सक्षम असला पाहिजे. जगात युएसच्या आर्मीचे फायर सेफ्टी साठी सर्वात कडक नियम आहेत. टेक्सटाइल टेक्नोलॉजिस्ट, Margaret Auerbach ह्या एका मुलाखतीत सांगतात की

युएसच्या आर्मी मधील सैनिकांच्या युनिफॉर्ममधील एक एक धागा असा बनवलेला असतो की तो कितीही जास्त तापमानात नष्ट होता कामा नये. त्या युनिफॉर्म मधील प्रत्येक धाग्याचे ८०० डिग्री सेल्सियस वर टेस्टिंग केले जाते.

हे तर झाले अमेरिकेच्या युनिफॉर्मबद्दल! सुदैवाने भारतीय सैनिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय आर्मीने सुद्धा टेक्नोलॉजीकडे लक्ष देऊन सैनिकांचा गणवेश जास्तीत जास्त सुरक्षित कसा करता येईल ह्यासाठी पाऊले उचलणे सुरु केले आहे. ह्या वर्षी आपल्या सैनिकांना जो गणवेश मिळणार आहे तो संपूर्णपणे fire resistant असेल. तसेच ह्या गणवेशावर chemical व nuclear reactions सुद्धा होणार नाहीत. म्हणजेच आपले शूर सैनिक हा गणवेश घातल्यानंतर chemical व nuclear reactions पासून सुरक्षित राहतील. तसेच आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी फायरप्रुफ knee-pads वर सुद्धा संशोधन सुरु आहे.

 

३. हाय परफॉरमन्स बूट

indian-army-uniform-marathipizza04
Lettradeindia.com

आर्मीसाठी काम करणे म्हणजे सर्वात कठीण काम आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये सतत सजग राहून काम करावे लागते. देशाचे रक्षण करावे लागते. कुठल्याही ठिकाणी कशाही वातावरणात शारीरिक मेहनत करावी लागते शिवाय मानसिक संतुलन सुद्धा कायम ठेवावे लागते. म्हणूनच कुठल्याही देशात आर्मी मध्ये काम करणे हे सर्वात कठीण आहे. म्हणूनच अशा वेळी सैनिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांचे बूट हे उत्तम दर्जाचे असणे आवश्यक असते. म्हणूनच आर्मी आपल्या सैनिकांसाठी उत्तम प्रकारचा गणवेश व शूज देण्याच्या प्रयत्नांत असते.

सिंगापूर आर्मीने तयार केलेले आर्मी शूज युनिवर्सल स्टैंडर्ड्सच्या मापदंडाप्रमाणे ‘Din 1’ ते ‘Din 3’ च्या श्रेणीत येतात.

‘Din 1’ चा अर्थ आहे water resistant तर Din 3’ चा अर्थ आहे fire and water resistant.

परंतु दुर्दैवाने आपल्या आर्मीने अजून तरी आपल्या जवानांच्या शूज कडे फारसे लक्ष दिले नाही ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. इंडियन आर्मीसाठी जी कंपनी शूज बनवते त्या कंपनीच्या एका सूत्राने हि माहिती उघड केली आहे की

भारतीय सैनिकांसाठी जे शूज बनवले जातात त्यात कुठलेही सेफ्टी स्टैंडर्ड्स नाहीत. शिवाय जे लेदर ह्या शूजच्या निर्मितीसाठी वापरले जाते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते व शूजचा सोल PVC पासून तयार केला जातो, जेणे करून शूजची किंमत स्वस्त राहील.

ही अत्यंत धक्कादायक व खेदाची गोष्ट आहे की जे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता तासनतास उभे राहून देशाचे रक्षण करीत असतात, त्यांच्या पायांच्या सुरक्षेशी कोणालाही देणे घेणे नाही.

 

४. बटन्सचा वापर अजिबात होत नाही

indian-army-uniform-marathipizza05
indiamart.com

आर्मीच्या सैनिकांच्या गणवेशात बटन्सचा वापर केल्या जात नाही. आर्मीच्या गणवेशात बटन्सचा वापर फार पूर्वीपासूनच थांबवण्यात आला होता. कारण असे लक्षात आले की युद्धाच्या दरम्यान बटन्स अतिशय अडचणीचे ठरू शकतात कारण ते सहज निघू किंवा तुटू शकतात. तसेच बटन्स लावत बसण्यात जवानांचा अनमोल वेळ खर्ची पडतो, कारण ज्या ठिकाणी ते काम करत असतात त्या ठिकाणी एका क्षणात सुद्धा होत्याचे नव्हते होऊ शकते. तसेच युद्धाच्या दरम्यान बटन्स सैनिकांच्या सुरक्षेत अडथळा होऊ शकतात, असे दिसून आल्याने आर्मीच्या गणवेशात बटनांचा वापर केल्या जात नाही.

आज आपण आर्मीच्या युनिफॉर्म विषयी जाणून घेतले. हा युनिफॉर्म घालायला मिळणे अतिशय गौरवाचे तसेच जबाबदारीचे काम आहे. म्हणूनच हा युनिफॉर्म घालणाऱ्या आपल्या शूर सैनिकांची सुरक्षा आणि कम्फर्ट बघणे अतिशय आवश्यक आहे. अजूनही भारतात आपल्या जवानांच्या सुरक्षेची काळजी फारशी चांगली घेतली जात नाही असे दिसून येते. हे लोक आपल्या प्राणांची बाजी लावून डोळ्यात तेल घालून आपले व देशाचे अहर्निश रक्षण करीत असतात त्यांच्याच सुरक्षेची व कम्फर्टची काळजी न घेता येणे हा शुद्ध कृतघ्नपणा आहे. हि परिस्थिती बदलायला हवी. ह्या काही गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्या जवानांचे अनमोल प्राण विनाकारण धोक्यात येत आहेत हे विसरून चालणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?