‘दारू’बद्दलच्या या अतर्क्य अंधश्रद्धा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दारू म्हणजेच मद्य आपल्याकडे आज ही वर्ज्य मानले जाते. त्यामुळे घरच्यांपासून चोरून वगैरे मद्यपान करण्याची प्रथा आजही अविरत सुरु आहे! मग कधी पार्टीमध्ये वगैरे जास्त झाली की चढलेली नशा उतरवण्यासाठी आपण काहीबाही शक्कल लढवतो.

अश्या या दारूबद्दल काही अफवा देखील समाजात पसरल्या आहेत. ज्यांचा शोध कोणी लावला ते देवालाच माहित!

अश्याच काही अफवांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मद्यपानाबद्दल अधिक जागरूक व्हाल अशी आशा आहे.

 

rumours-about-alcohol-marathipizza01

स्रोत

दारूच्या पूर्वी बियर पिल्याने माणसला लवकर नशा चढते

 

rumours-about-alcohol-marathipizza02

स्रोत

खरं तर तुम्ही पहिली बियर पिता किंवा दारू पिता याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही जास्त प्रमाणत ढोसली की तुम्हाला चढणार हे निश्चित!

तुमची एकदा का दारू किंवा बियर सहन करण्याची क्षमता संपली की तुमचं डोक गरगरायला लागणार, समोर काय घडतंय त्याकडे लक्ष लागणार नाही. एकंदर काय तुम्ही सरळ सातवे आसमान पर पोचणार!

फक्त बियर पिल्याने वजन वाढतं

 

rumours-about-alcohol-marathipizza03

स्रोत

कोणतंही मद्य घ्या त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरिज असतात. त्यामुळे तुम्ही वाईन, वोडका, दारू, बियर जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या शरीरातील कॅलरीजमध्ये वाढ होणार आणि तुमची ढेरी सुटण्यास सुरुवात होणार !

हँगओव्हर उतरवायचा असल्यास भरपूर कॉफी प्या

 

rumours-about-alcohol-marathipizza04

स्रोत

तुमचा हँगओव्हर म्हणजेच चढलेली नशा उतरवायची असेल तर शरीरातील मद्याचा प्रभाव कमी होणे अत्यावश्यक आहे. परंतु जेव्हा तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी पिता तेव्हा शरीरातील मद्याचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया संथ होते. त्यामुळे कॉफी पिल्याने काहीच फायदा होत नाही.

तुम्हाला हँगओव्हर उतरवायचा असेल तर गुपचूप झोपून राहा. काही तासांनी हळूहळू मद्याचा प्रभाव कमी होईल आणि तुम्ही नॉर्मल व्हाल.

 

दारू पिल्याने मेंदूवर परिणाम होतो

 

rumours-about-alcohol-marathipizza05

स्रोत

दारू पिल्याने तुमची विचार करण्याची प्रक्रिया मंदावते हे खरं…पण त्यामुळे मेंदूवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. दारू तुमच्या मेंदूमधील नर्व्हस सिस्टमवर तात्पुरता प्रभाव करते जेथून आपला मेंदू हाताळला जातो.

त्यावर प्रभाव झाल्याने काही काळ आपण नशेत असतो. परंतु जसजसा मद्याचा प्रभाव कमी होतो, तसतशी नर्व्हस सिस्टम देखील पूर्वी सारखी कार्यरत होते.

 

दारू आणि एनर्जी ड्रिंक्स मिक्स करून प्याल्याने लवकर नशा चढते

 

rumours-about-alcohol-marathipizza06

स्रोत

एनर्जी ड्रिंक्स मध्ये कॅफेन असतं, त्यामुळे तुम्ही दारू आणि एनर्जी ड्रिंक्स मिक्स करून जास्त प्रमाणत प्याल्यात तर कॅफेनची नशा चढते. कॉफीमध्ये देखील कॅफेन असते. त्यामुळे हँगओव्हर उतरवण्यासाठी कॉफी पिल्याने काहीही फरक पडत नाही.

 

उलटी केल्याने नशा उतरते

 

rumours-about-alcohol-marathipizza07

स्रोत

उलटी केल्याने पोटातील दारू तुमच्या शरीराबाहेर पडते खरी, पण तुमच्या रक्तात मिसळलेली दारू मात्र बाहेर पडत नाही. त्यामुळे उलटी केल्याने काही प्रमाणत डोक शांत होत परंतु पूर्ण नशा उतरण्यासाठी काही काळ जावा लागतो.

तर अशी ही दारू आणि अश्या या दारूबद्दलच्या अफवा !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?