बुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

शाळेत असो कॉलेजात असो की ऑफिसात, कोणी ना कोणी एकजण तरी असा असतो ज्याची उंची इतरांच्या तुलनेत कमी असते. आणि मग तो सर्वांच्या मनोरंजनाचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरतो.

ज्याला तुम्ही कधीही बुटक्या म्हणून हाक मारू शकता तर कधी दीड फुट,

ज्याला तू लहान आहेस तुला कळणार नाही असं म्हणून बाजूला सारू शकता,

सोबत उभं असताना त्याच्या डोक्यावर हात ठेवून उभं राहू शकता,

ज्याला तुम्ही प्रत्येक बाबतीत कमी लेखता, त्याच्या उंचीची खिल्ली उडवता…!

मग तो मुलगा असो का मुलगी, जर त्या व्यक्तीची उंची कमी असेल तर तिला अशीच वागणूक दिली जाते.

 

advantages of being short-inmarathi05
youngisthan.in

तरी देखील मित्र-मैत्रिणींच्या प्रत्येक टोळक्यात एक ना एक जण असा असतोच. एवढंच काय तर आपल्या चित्रपटांत देखील कॉमेडी रोल निभावणारे जे जास्तकरून हिरोचे मित्र दाखविले जातात, त्यांची उंची देखील कमीच असते. जसे की, जॉनी लिव्हर, राजपाल यादव वगैरे.

म्हणजे कमी उंची असणाऱ्या लोकांचा जन्मच जणू इतरांना हसविण्यासाठी आणि त्यांच्या छळाला बळी पडण्यासाठी होतो असे कदाचित असावे.

पण हे सोडले, तर कमी उंची असणाऱ्या लोकांमध्ये अनेक चांगले गुणही असतात.

तसेच त्यांची कमी उंची ज्याची आपण येता-जाता खिल्ली उडवत असतो, तीच त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरते.

अनेकदा त्यांना त्यांच्या ह्या कमी उंचीचा खूप फायदा होतो जो कदाचित उंच लोकांना कधी अनुभवता येऊ शकत नाही.

ह्याच संबंधी एक प्रश्न क्वोरा ह्या वेबसाईटवर विचारण्यात आला होता की, “कमी उंचीचे फायदे काय?” ह्यावर अनेकांनी आपले उत्तर नोंदविले.

ह्यात काहींची उत्तरे ही निगेटिव्ह तर काहींची पॉझिटिव्ह होती. ह्यापैकीच काही फायदे आहेत जे केवळ कमी उंचीचे लोकच अनुभवू शकतात.

ते कुठले आपण जाणून घेऊ :

 

advantages of being short-inmarathi04
wheretoget.it

१. कमी उंचीच्या लोकांना स्पेशली मुलींना इतरांसमोर सर्वात उंच दिसण्याची भीती न बाळगता हवी तेवढी हिल्स बिनधास्तपणे घालता येतात. जे उंच मुलींना खूप विचारपूर्वक घालाव्या लागतात.

जर उंच मुलींनी एखाद्या पार्टीमध्ये हिल्स घातल्या तर त्या हरणांच्या कळपात एखादा जिराफ उभा असावा अश्या दिसतात.

पण कमी उंचीच्या मुली ही भीती न बाळगता कितीही उंच हिल्स घालू शकतात.

२. माझी उंची माझ्या बॉयफ्रेंडपेक्षा जास्त असेल तर, ह्याची कमी उंचीच्या मुलींना कधीही भीती नसते.

जर आपल्याला एखादा मुलगा आवडला आणि त्याला देखील आपण आवडलो असेल, पण जर त्या मुलाची उंची तुमच्यापेक्षा कमी असेल तर हे कपल नक्कीच जरा वेगळं दिसतं.

मुलं आपल्यापेक्षा उंची मुलीला डेट करण्यास देखील दोनदा विचार करतात.

पण कमी उंचीच्या मुलींना ह्या समस्येला देखील सामोरे जावे लागत नाही. त्या कधीही कुठल्याही मुलाला डेट करू शकतात.

 

affair-short-inmarathi
youtube.com

३.कमी उंचीचे लोक हे इतरांना कधीही त्यांच्यासाठी धोका वाटत नाही. कमी उंचीचे लोक हे इतरांच्या नजरेत खूप गोंडस आणि चांगली असतात.

इतरांना कधीही असे वाटत नाही की ह्या लोकांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका असेल. त्यामुळे हे लोक नेहमी बचावले जातात.

४. कमी उंचीच्या लोकांना त्यांच्यापेक्षा उंच असलेल्या लोकांचे कपडे देखील होतात. कारण त्यांची उंची वाढत असते त्यामुळे त्यांचे जे कपडे त्यांना आता होत नाहीत ते हे कमी लोकांच्या कामात येतात.

कधीकधी तर एखादा ड्रेस हा उंच मुलींना खूप शॉर्ट होतो आणि मग तो ह्या कमी उंचीच्या मुलींना मिळतो.

 

advantages of being short-inmarathi01
quora.com

५. सर्वांना कमी उंचीची लोक नेहमी गोंडस वाटत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांची उंची.

त्यांच्या कमी उंचीमुळे ते इतरांच्या तुलनेत खूप गोंडस दिसतात.

६. जेव्हा प्रश्न उंचीचा असतो तेव्हा कमी उंचीचे लोक हे सर्वांच्या विनोदाचा विषय ठरतात.

म्हणजे त्यांच्या उंचीवरून कुणीही त्यांना काहीही म्हणू शकतं, त्यांची खिल्ली उडवू शकतात.

७. लपंडाव खेळताना कमी उंचीची लोक कुठल्याही लहानतल्या लहान ठिकाणी देखील लपू शकतात. जे इतरांना शक्य नाही.

कारण त्यांच्या उंचीमुळे त्याच्यासाठी हे शक्य होत नाही पण कमी उंचीच्या लोकांना हे करणे सहज शक्य होते.

८. कमी उंचीच्या लोकांना कुठलाही पलंग कधीही लहान होत नाही. ते लहानातल्या लहान पलंगावर अॅडजस्ट होऊ शकतात. पण उंच लोकांचे नशीब एवढे चांगले नसते.

आपण हॉस्टेलमध्ये नेहमी बघितले असेल की जे मुलं उंच असतात त्यांचे पाय नेहमी पलंगाबाहेर येतात.

पण कमी उंचीच्या लोकांना ह्या समस्येचा सामना देखील करावा लागत नाही.

९. कमी उंचीच्या लोकांना कुठल्याही टोळक्याला बळी पडावे लागले नाही. त्यांच्या कमी उंचीमुळे ते नेहमी शाळा-कॉलेजात ह्या टोळ्यांपासून बचावले जातात.

कारण त्यांच्या उंचीमुळे ते कोणालाही धोका वाटत नाही त्यामुळे त्यांच्याकडे अश्या टोळक्यांचं फारसं लक्ष जात नाही.

१०. जागा कमी असेल तर कमी उंचीच्या लोकांना कधीही कुणाला मांडीवर घ्यावं लागतं नाही तर लोकच त्यांना मांडीवर घेतात.

जर कुठे जायचं असेल आणि गाडीत जागा कमी असेल तर कमी उंचीच्या लोकांकडून कधीही कुणाला मांडीवर घेऊन बसायची अपेक्षा केली जात नाही.

 

advantages of being short-inmarathi02
quora.com

११. विमानातील इकोनॉमी सीट्समध्ये देखील कमी उंचीचे लोक खूप कम्फटेर्बल असतात.

इकोनॉमी क्लासमधील सीट्स ह्या जरा लहान आणि कमी जागेच्या असतात.

तरी देखील कमी उंचीची लोक ह्यात अगदी सहजपणे बसू शकतात जे उंच लोकांसाठी फार अवघड असते.

१२. कमी उंचीच्या लोकांना जिम्नॅस्टिक्स मध्ये देखील त्यांच्या कमी उंचीचा फायदा होतो. त्यांच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कमी असल्याने त्याचा त्यांना फार फायदा होतो.

हे सर्व फायदे त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात अनुभवले असतात आणि अनुभवत असतात ज्यांची उंची कमी असते.

लोकांनी कितीही त्यांच्या उंचीवरून त्यांची खिल्ली उडविली असली तरी त्यांच्यापासून त्यांचा कमी उंचीचे हे फायदे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही!

एव्हाना इतरवेळी त्यांच्या उंचीवरून त्यांच्यावर हसणारे लोक देखील कमी उंचीचे फायदे जाणून त्यांचा हेवा करू लागतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “बुटक्या लोकांना “देडफुट्या” म्हणून चिडवलं तरी त्यांच्या ह्या खास गोष्टी कुणीच नाकारू शकत नाही

 • August 2, 2018 at 7:05 pm
  Permalink

  टेस्ट

  Reply
 • August 2, 2018 at 7:29 pm
  Permalink

  मस्त

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?