समाजात पॉप्युलर होण्यासाठी या कौशल्यांकडे काळजीपुर्वक लक्ष द्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण सगळ्यांसोबत कसे वागतो यावर आपले सामाजिक आयुष्य अवलंबून आहे. सर्वांमध्ये मिसळून राहणारी, प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्तीच आजच्या सामाजिक आयुष्यात यशस्वीपणे वावरू शकते.

जेव्हा आपण सामाजिक वातावरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक गोष्टींची मर्यादा पाळणे गरजेचे असते आपण कोणाशी बोलतो आहोत, आपली बॉडी लँग्वेज कशी आहे, आपली वेशभूषा कशी आहे आणि समोरच्या व्यक्तीला अपेक्षित विषय आपण मांडतो आहोत का या सर्व घटकांवर तुमचं सोशल लाइफ अवलंबून आहे.

 

friendship inmarathi

 

अनेक वेळी समोरच्या व्यक्तीला इतर काही गोष्टी अपेक्षित असतात, पण आपण अनावधानाने वेगळीच काहीतरी कृती करून बसतो अशा वेळी गैरसमज होऊ नयेत म्हणून आपण पुढाकार घ्यायला हवा.

यामुळे आपल्या सामाजिक आयुष्यातील प्रतिमेला उजाळा मिळतो. याचसोबत अनेक अशा लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

चला तर मग या लेखामध्ये जाणून घेऊया, सोशल वातावरणात यशस्वीपणे वावरणारे लोक अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतात त्यामुळे ते यशस्वी होतात.

 

१.  तुमचा श्रोता समजून घ्या  

श्रोता म्हणजे फक्त भाषणावेळी जाणून घ्यायची बाब नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील या घटकाची नितांत काळजी घेतली गेली पाहिजे. तुम्ही कोणा सोबत आहात या गोष्टीचे भान तुम्हाला नेहमीच असायलाच हवे.

 

office inmarathi
India business directory

 

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्‍यांसोबत असता तेव्हा त्यांना तुम्ही वेगळ्या प्रकारे वागणूक देता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठांसोबत असता तेव्हा त्यांच्याशी अदबीने आणि आदराने वागता.

या वागणुकीतील फरकाची जाणीव तुम्हाला इतरांपासून वेगळी प्रतिमा तयार करण्यास मदत करते.

 

२. इतरांच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करा

 

pk inmarathi

 

ही बाब तुम्हाला नवीन वातावरणामध्ये स्थायिक होण्यासाठी नक्कीच मदत करेल. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा नवीन ठिकाणी काम करता किंवा नवीन सोशल सर्कलमध्ये जाता तेव्हा या गोष्टीच्या आधारेच  तुम्ही इतरांसोबत चांगले संबंध ठेवू शकाल.

म्हणजेच समजा जर तुम्ही तुमच्या नवीन मित्रांना भेटत आहात तर त्यांना तुमचं मत न सांगता काही विषयांवरती त्यांचं मत तुम्ही ऐकून घ्या आणि मग त्यांना पटेल असेल अशा पद्धतीचे मत मांडण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमची मैत्री अधिक काळ टिकून राहील.

 

३. नवीन अनुभवांसाठी आणि व्यक्तींसाठी नेहमी तयार रहा

 

friends inmarathi
awara diaries

 

ही बाब तरुण व्यक्तींसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. मुख्यतः जेव्हा तुम्ही नवीन संस्कृतीमध्ये जाता तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला खटकू शकतात तेव्हा, सुरुवातीला या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा.

नवीन ठिकाणी कदाचित तुमच्यापेक्षा जास्त समंजस आणि क्षमता असलेली व्यक्ती आजूबाजूला वावरत असू शकते. त्यामुळे प्रत्येकाशी विनयशीलतेने संवाद साधा, प्रत्येकाचा आदर ठेवा.

अशा वावरामुळे तुम्हाला नवीन गोष्टी अधिक प्रभावीपणे शिकण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, तुम्ही जेव्हा नवीन ठिकाणी काम करत असाल तेव्हा प्रत्येकाशी अत्यंत आदरपूर्वक व्यवहार ठेवा यामुळे तुम्हाला प्रत्येक जण मदत करण्यास तयार असेल.

 

४. कुठल्याही समूहाला उद्देशून वक्तव्य टाळावे

 

RahulGandhi-inmarathi
newindianexpress.com

 

आपण सोशल लाईफ मध्ये जगताना नेहमी संयम बाळगायला हवा त्याही पुढे कुठल्याही घटकाबद्दल किंवा समूहाबद्दल टिपण करणे किंवा त्यांना उद्देशून काही बोलणे या गोष्टी टाळण्याची एका बुद्धीमान माणसाला नितांत गरज असते.

कारण अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात एका समूहाचा रोष स्वतःवरती ओढून घेऊ शकता.

उदाहरणार्थ, जर तुम्ही टीका करताना महिलांवरती एकसारखी टीका केलीत तर परिणामी काही दिवसांनी तुमच्या सोशल लाईफ वरती या गोष्टीचा परिणाम तुम्हाला होताना दिसेल.

अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीवरती मत देऊ नये यामुळे अनपेक्षित घटना टाळता येऊ शकतात.

 

५. तुमच्यातील सामाजिक संवेदनशीलता जपा

 

help inmarathi
friends6.0

 

याबाबतीत मात्र तुम्ही अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे कारण या त्या गोष्टी असतात ज्यांची तुम्ही इतरांकडून अपेक्षा करता. या गोष्टींमुळे अनेक वेळी व्यक्तीबद्दल आकस निर्माण होण्यास मदत होते.

याच गोष्टी आपणही पाळाव्यात जेणेकरून आपली प्रतिमा स्वच्छ राहील.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या मित्राची मदत हवी असेल त्यासाठी तुम्ही त्याला संपर्क केला आणि जर तो कुठल्या कामात व्यस्त असेल तर तेव्हा त्याला त्याचे काम पूर्ण करू द्यावे आणि मगच आपण त्याच्याकडे मदत मागावी.

 

६. दैनंदिन आचरणामध्ये आदर व्यक्त करणाऱ्या शब्दांचा वापर करा

आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये आपण एकमेकांचा आदर राखणे अत्यंत गरजेचे आहे आणि हा आदर आपण नेहमीच शब्दांमध्ये व्यक्त करत असतो. कुठलीही मदत केल्यानंतर आपण त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणणे म्हणजेच त्याने केलेल्या मदतीबद्दल आपण आदर व्यक्त करणे होय.

 

respect inmarathi
executive hunters

 

अशा आदर व्यक्त करण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत होते. लक्षात ठेवा शब्द हा आदर  इतर कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे.

त्यामुळे जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल नितांत आदर आहे पण तुम्ही तो व्यक्त करू शकत नसाल तर त्या व्यक्तीला तुमच्या मनातील आदर कधीच कळणार नाही.  त्यामुळे आदर शक्यतो शाब्दिक स्वरूपातच व्यक्त करावा.

 

७.  अनेक वेळी अशा काही घटना घडतात जेव्हा तुम्हाला काय करावे हेच सुचत नाही अशावेळी संयमाने आणि शांतपणे या सर्व गोष्टी हाताळणे गरजेचे आहे.

 

body language inmarathi
bollywood life

 

जर तुम्ही त्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत नसाल तर अत्यंत आदरपूर्वक ती गोष्ट त्यांना समजून सांगणे गरजेचे असते.

यामुळे होणारे गैरसमज टाळले जातात आणि तुमचे संबंध ही पहिल्यासारखेच राहतील.

 

८.  इतरांच्या आनंदामध्ये आनंद शोधणे

सामाजिक आयुष्यामध्ये वावरताना अनेक वेळी असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा व्यक्ती खूप आनंदी असतो आणि तुम्ही कदाचित त्याक्षणी दुःखी असाल.

अशावेळी त्या व्यक्तीच्या आनंदात आनंद शोधणे हे आपले कर्तव्य आहे आणि हा आनंद त्याच्यासाठी शब्दांमध्ये नक्की व्यक्त करा.

 

९. बॉडी लॅंग्वेज

 

body language inmarathi
youtube

 

हा घटक देखील इतर घटकांप्रमाणेच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही काय बोलता याचं प्रतिबिंब म्हणजे तुमचं शरीर होय. केव्हाही बसताना ताठ बसावे कारण मरगळलेलं शरीर हे थकलेल्या मनाचं लक्षण आहे.

जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असाल आणि जर तुम्ही आळस देत आहात किंवा मरगळलेल्या अवस्थेत बसलेले असेल तर लक्षात ठेवा यामुळे तुमच्या मीटिंग वर चुकीचा परिणाम होताना दिसेल.

त्यामुळे हा परिणाम टाळण्यासाठी आपली बॉडी लँग्वेज व्यवस्थित असणे गरजेचे आहे.

 

१०. आय कॉन्टॅक्ट

 

eye contact inmarathi
entrepreneur

 

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी कुठल्यातरी विषयावर बोलत आहात तेव्हा आपण विश्वासाने ती गोष्ट त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोललं पाहिजे यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला जाणवत राहील.

पण लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवत नसेल तर याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नाही.

कदाचित काही सांस्कृतिक फरकामुळे ती व्यक्ती तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करत नसेल. त्यामुळे पटकन कुठल्याही निष्कर्षावर न पोहोचता शांतपणे समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण म्हणणे ऐकून घ्यावे.

या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींची तुम्ही सामाजिक आयुष्यात वापरताना काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींमुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक उजळून दिसेल आणि या गोष्टींमुळे तुमच्याबाबत होणारे अनेक गैरसमजही दूर होतील.

त्यामुळे दैनंदिन आयुष्यात जगताना या गोष्टींचा विचार नक्की करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?