वीजेच बील पाहून घाम फुटतोय ? वाचा वीज बिल कमी करण्याच्या परफेक्ट टिप्स.!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सामान्य व्यक्ती म्हटली की काटकसर ही येतेच. पण सध्याच्या फास्ट जगात सोयीसुविधा वापरायच्या म्हटल्या, की त्या काटकसरीकडे कानाडोळा करावा लागतो.

उदाहरणार्थ, एका मध्यमवर्गीय घरात टीव्ही, वॉशिंग मशीन,एसी,३-४ मोबाईल फोन (फास्ट चार्जिंग होणारेे), इस्त्री,गिझर असतातच.आणि ही उपकरणे वापरायची म्हणजे तेवढाच विजेचा वापर सुद्धा येतो. आता महानगर म्हटल्यावर प्रति युनिट चार्ज पण त्याच हिशोबाने बसतो.

 

amlprintingservices.com

 

आणि एकूणच या सगळ्याचा भुर्दंड बसतो तो थेट खिश्यावर.! त्यामुळे महिन्याच्या एक तारखेला हाती बिल घेऊन डोक्यावर हात लावणा-यांची संख्या मोठी असते, तुम्हीही याच कोंडीत अडकता ? मग आता वाढत्या बिलाची चिंता सोडा.

जाणून घेऊया, काही छोट्या छोट्या कृतीने विजेचं बिल कसं कमी करता येईल याच्या ट्रिक्स.!

१. जनरल ट्यूबलाईट-बल्ब ऐवजी सिएफएल-एलइडीचा वापर.

 

led lighting

 

सिएफ एल बल्नब व्याने बाजारात आले तेव्हा भरपूर महाग होते. नंतर सरकारी अनुदान, वाढलेलं उत्पादन यामुळे त्यांच्या किमती आवाक्यात आले. सीएफएल-एलईडी सध्या ट्यूब/बल्ब पेक्षा २० ते ३०% वीज कमी घेते.

२. ट्यूब, बल्ब यावर बसलेली धूळ वेळोवेळी साफ करणं.

 

word press.com

धूळ खात पडलेली प्रकाश देणारी उपकरण त्यांच्या नॉर्मल वीज वापरपेक्षा ५०% वीज जास्त घेतात. वेळोवेळी साफ करून उपकरणांचं आयुष्य देखील वाढेल आणि अकारण वीज वापर पण टळेल.

३. घरात जर एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज सारखी इलेक्ट्रिक मोटर बेस उपकरण असतील तर त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग करावी.

अतिरिक्त लोड मुळे मोटरची वर्किंग एफीसीऐंसी कमी होते.ज्याचा फरक थेट वीज वापरावर पडतो.

४.एसीचे फिल्टर महिन्यातुन एकदा साफ करावे. अस्वच्छ फिल्टर एसीच्या चिलिंग युनिटवर अतिरिक्त लोड निर्माण करतो.

 

youtube.com

 

५.नवीन एसी बसवायचा विचार करत असाल, तर सेंट्रलाईज एसीचा पर्याय निवडावा. खर्चिक सौदा असतो.पण सामान्य एसीच्या मानाने सेंट्रलाईज एसी खोली थंड लवकर करते.

६.एसीचं तापमान २४° वर नियमित ठेवायचा प्रयत्न करावा.

जेवढं तापमान आपण कमी करू तेवढा एसीच्या कम्प्रेसरवर लोड येतो.परिणामी विजेचा वापर तिथे जास्त होतो.

 

bajaj finserv

 

तसंही सरकार बाजारात नव्याने येणाऱ्या एसीचं तापमान २४° कॉन्स्टंट ठेवायच्या विचारात आहेच.

७. फ्रीजच्या दरवाज्याला असणारे रबर सील व्यवस्थित घट्ट असावी याची काळजी घ्यावी.

फ्रीजला असणारी कॉइल वेळोवेळी साफ करावी. कमीतकमी दोन महिन्यातून एकदा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यातून हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. अन्यथा विनाकारण वीज वाया जाते.

 

the family handyman

 

८. वर सांगितल्याप्रमाणे ज्या उपकरणाला मोटर आहे, तिथे हवा खेळती राहील (व्हेंटिलेशन) याची काळजी घ्यावी.

कोणत्याही उपकरणावर अतिरिक्त लोड आला की विजेचा वापर त्या उपकरणाकडून जास्त होत असतो.

९.मोबाईल/लॅपटॉप यांचा वापर चार्जिंगला लावून टाळावा.

चार्जिंग-ड्रेनिंग या दोन्ही प्रोसेस एकाच वेळी तिथे होत असतात. यात बॅटरी ड्रेनिंगची प्रोसेस वेगात होत असते.

 

masterfile

 

मोबाईल/लॅपटॉपची बॅटरी यामुळे खराब होण्याची शक्यता देखील जास्त असते.

१० .बाजारात सध्या स्मार्ट फॅन उपलब्ध आहेत. जिथे सामान्य फॅन फुल्ल स्पीडमध्ये चालताना ४५ वॅट वीज कंज्युम करतो तिथे स्मार्ट फॅन फक्त २८ वॅट घेतात.

थोडे महाग असतात पण लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट आहे.

 

orient electric

 

११. सीआरटी टीव्ही खरंच आता काळाच्या आड गेले आहेत. त्यात त्याचा वीज वापरसुद्धा अतिरेकी. सीआरटी टीव्ही एलईडी टीव्हीने रिप्लेस करणे वीज बचतीकडे नक्कीच स्मार्ट पाऊल असेल.

१२. जर जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरत असाल तर ही काळजी नक्की घ्या.

फ्रीज मधलं जेवण अँज इट इज गरम करू नका.

जेवायच्या १०-१५ मिनिट आधी ते फ्रिजमधून बाहेर काढा मग ओव्हन मध्ये गरम करा.

 

UERC

 

१३.इलेक्ट्रिक गिझरला पर्याय म्हणून बाजारात गॅस गिझर सुद्धा आले आहेत.

पर्यायाने स्वस्त आणि कॉस्ट रिड्यूसिंगसाठी उत्तम.

१४.वॉशिंग मशीन वापरत असाल तर ती पिक अवर्स मध्ये वापरून नये. म्हणजे १०-७ या वेळेत.

मशीन फुल्ल लोड वर वापरा पण ओव्हर लोड नको.

 

Freeimages.com

 

आठवड्यातून एकदा नो वॉश डे पाळण्यात काहीच हरकत नाही.

१५.घरातील वायरिंग.

नवीन घर घेते वेळी केलेली वायरिंग कित्येक वर्षे अँज इट इज वापरणे हे देखील वाढत्या वीज वापरामागच एक कारण आहे.

जुन्या झालेल्या वायरिंग,इमप्रॉपर अर्थीग या गोष्टी सुद्धा थेट परिणाम करतात.

 

construction review online

 

१६. टीव्ही,कॉम्प्युटर स्टँड बाय मोड वर न ठेवणं.

टीव्ही,कॉम्प्युटर बंद केला की आपण त्याच शक्यतो मेन स्विच बंद न करता तसंच ठेऊन देतो. त्यामुळे त्यांना वीजप्रवाह हा चालूच असतो. त्यांची बॅकग्राउंड ला ऑपरेशन चालु राहते.

सो जेव्हा टीव्ही पाहून झाल्यावर रिमोट ने बंद केल्यानंतर त्याच मेन स्विच बंद करावे.अँज वेल पीसी शट डाऊन केल्यानंतर त्याचे मेन स्विच नक्की बंद करा.

सेम नियम मोबाईल चार्जिंग वेळेला सुद्धा.!

 

WikiHow

 

मोबाईल चार्ज झाला की त्याचा प्लग आठवणीने बंद करावा.

१७.सोलर एनर्जीचा वापर.

महाग पर्याय आहे.पण सरकारसुद्धा पुढाकार घेऊन सबसिडी देत आहे.एकदा का सोलर सिस्टीम इन्स्टॉल केली की निदान १५ वर्ष तरी स्वछ ऊर्जेचा मोकळा सोर्स वापरायला उपलब्ध होईल.

 

Inverse

 

१८.लास्ट बट नॉट लिस्ट.

गरज असेल तेव्हाच उपकरणे वापरावी आणि विजेचा अपव्यय टाळावा.

आता थोडं वीज बिलं आकारतात कसं ते पाहूया.!

एमएससीबीई ३० युनिट वापरला ४० पैसे चार्ज आकारते. १०० युनिट पर्यंत १.९० रुपये.१००-३०० युनिट ३.४० आणि ३०० युनिट च्या वर ४.५० रुपये.

सर्व्हिस प्रोव्हायडर नुसार दर बदलत जातात.

 

pintrest

 

तर,

१०० युनिटच्या वर जरा जरी वापर गेला तर थेट चार्ज दुप्पट होतो. जिथे २५०-३०० रुपये बिल यायला हवं ते ५०० च्या घरात जातं.

आता युनिट नुसार आपल्या घरातले उपकरणे बघूया.

फ्रीज,एसी हे थंड करणारे उपकरणेच १०० च्या आसपास युनिट कंज्युम करतात.

वॉशिंग मशीन २० युनिट.

फॅन,ट्यूब लाईट मिळून १५-२० युनिट.

एकूणच,

आपल्या घरात असलेले उपकरणे, आपण त्याचा करत असलेला वापर आणि त्यांचा होणार वीज वापर यावरून आपण आपलं बिल किती यायला पाहिजे आणि वास्तवात बिल किती येत आहे याचा अंदाज येतो.

 

decoration trends

 

सो,

थोडी काळजी,थोडी स्मार्ट चॉईसने आपण विजेचा होणारा अतिरिक्त वापर आपण टाळू शकतो.

पर्यायाने वाढीव लाईटबिलावर पण नियंत्रण येईल.!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?