या ४ आयडीया वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारताची अर्थव्यवस्था सद्यस्थितीत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला कच्च्या तेलाचे भाव आणि त्यामुळे होणारा खर्च, हा सर्वात मोठा खर्च आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने, सामान्य माणसाला विकल्या जाणाऱ्या डिझेल पेट्रोलच्या किमती आता दर पंधरा दिवसांना बदलत ठेवण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. हे बदलणार भाव आपल्या देशासाठी ही अत्यंत आवश्यक आहेत, परंतु तुम्हा-आम्हा सारख्या सामान्य जनतेला मात्र या सतत चढ-उतार होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या भावांनी मात्र हैराण केले आहे..

मुंबईत पेट्रोलची किंमत ८०.४२ रुपये झाली आहे. तसेच डिझेलची ही सारखीच परिस्थिती आहे. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामन्य नागरिक त्रस्त आहेत.

 

petrol-price-hike-inmarathi
india.com

सध्या मुंबईत पेट्रोलचा भाव ८०.४२ रुपये आहे. तर राजधानी दिल्लीत ७४.८२ रुपये आहे.

जर तुम्हाला या वाढत्या किंमती पासून होणारा त्रास सुसह्य करायचा असेल तर तुम्हाला खालील कृतींचा अवलंब करावा लागेल. या कृतींचा अवलंब केल्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो. अर्थातच तो जास्त नसला तरी समाधानकारक तरी आहे.

१) तेल वितरण कंपनीच्या ऑफर :

 

petrol-offers-inmarathi
businesstoday.in

जर तुम्ही रोज पेट्रोल डिझेल गाडीत टाकत असाल अथवा तुमच्या वाहनांमुळे इंधनाचा जास्त खप होत असेल तर तुम्ही तेलवितरण कंपनीच्या ऑफर्स वर लक्ष ठेवलं पाहिजे.

इंडियन ऑइल कंपनी अतिरिक्त रिवार्डसच्या नावाने लॉयल्टी प्रोग्राम चालवत आहे. यातून पेट्रोलियम फ्लिट ऑनर्स ला रिवार्ड दिला जाणार आहे. या ऑफर्स बद्दल अधिक माहिती घेऊन तुम्ही फायदा उचलू शकतात.

२ ) डेबिट आणि क्रेडिट कार्ड चा वापर :

 

petrol-on-vard-inmarathi
newindianexpress.com

डेबिट आणि क्रेडीट कार्ड चा वापर करून इंधनावर सवलत मिळवता येऊ शकते. फ्युएल सरचार्जच्या रुपात त्याला सूट दिली आहे. याव्यतिरिक्त अनेक बँकांमध्ये इंधन खरेदीसाठी स्पेशल कार्डस सादर करण्यात आले आहेत.

यांचा वापरावर डिस्काउंट देखील मिळत आहे. तब्बल ०.७५ पैश्याचा डिस्काउंट मिळणार आहे. पण यासाठी कॅशलेस व्यवहार करणे आवश्यक आहे.

३ ) मोबाइल वॉलेटचा वापर करू शकतो :

 

paytm_indian_oil-inmarathi
gadgets.ndtv.com

आपल्या माहितीसाठी मोबीक्विक मोबाईल वॉलेटच्या वापर केल्यावर पेट्रोल डिझेल वर १०% ची घसघशीत सूट तुम्ही मिळवू शकतात. ही सूट सुपर कॅशचा स्वरूपात मिळणार आहे.

यामध्ये कमीतकमी ५० रुपयाचा पेट्रोलची खरेदी अनिवार्य आहे. सुपर कॅश मधल्या ५% चा वापर इंधन खरेदी साठी करू शकतात.

४ ) भीम अँप :

 

bhimapp-petrol-inmarathi
ntnews.com

भीम अँप प्रत्येक महिन्याला ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देते. जास्तीतजास्त transaction साठी प्रोहोत्सहित करण्यासाठी ही योजना आहे. हे अँप डाउनलोड केल्यावर पहिल्या वेळच्या पेट्रोल खरेदीवर ५१ रुपये कॅशबॅक मिळते.

तर या काही क्लुप्त्या वापरून तुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या साध्या सोप्या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि तुमच्या खूप खर्च करणाऱ्या मित्रांना तर नक्की सांगा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “या ४ आयडीया वापरून मिळवा स्वस्त पेट्रोल…

  • May 28, 2018 at 10:34 am
    Permalink

    Namaskar, I regularly read your blogs on FB and find them quite interesting. Currently there is lot of noise around the fuel prices. It would be interesting to read if you can provide some objective commentary/ analysis about these rising prices. Does the high tax structure really compensate for some development schemes which are advertised or is it just filling the government coffers? Does it help to reduce the fiscal deficit? How does it stand in comparison to UPA government? Appreciate if you can post on your FB account (Omkar Dabhadkar, Sourabh Ganpatye) which is more easily accessible and read by many.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?