अख्ख्या जगाने श्वास रोखला… आणि स्काय लॅब समुद्रात कोसळली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

नासाचे पहिले स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळातील प्रयोगशाळेचे नाव होते स्काय लॅब्स. स्काय लॅब हे नाव कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल तरी मागच्या पिढीतील अनेकांनी ह्या नावचा धसका जगभर घेतला होता.

स्काय लॅब हे अमेरिकेचं पहिल स्पेस स्टेशन १४ मे १९७३ ला शक्तिशाली अश्या Saturn V Rocket मधून सोडण्यात आलं.

७७,१११ किलोग्राम इतक प्रचंड वजन असणारी ही प्रयोगशाळा म्हणजे अमेरिकेच्या अवकाश तंत्रज्ञानाचा एक मैलाचा दगड होता. १९७३ ते १९७९ अशी सेवा दिल्यानंतर स्काय लॅब आपली कक्षा सांभाळू शकली नाही.

हळू हळू तिने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करायला सुरवात केली. १९७९ च्या काळात तंत्रज्ञान इतक प्रगत नसल्याने स्काय लॅब पृथ्वीवर कोसळणार ह्या बातमीने जगभर प्रचंड भीतीच असं वातावरण तयार झालं होतं.

पृथ्वीच्या वातावरणात ते कधी शिरणार, ते पृथ्वीवर कुठे पडेल ह्यावर काहीच नियंत्रण नसल्याने एकूणच प्रचंड गोंधळाची स्थिती झाली होती.

 

sky lab
NASA

शेवटी स्काय ल्याब ११ जुलै १९७९ रोजी पर्थ ऑस्ट्रेलियाच्या परिसरात कोसळली. वातावरणाच्या घर्षणाने अनेक गोष्टी जाळून गेल्या असल्या तरी स्काय लॅबचे २४ तुकडे जमिनीवर पडले.

स्काय लॅब मध्ये अवकाशात जाण्यासाठीचे तंत्रज्ञान होते पण परत खाली येण्याचे नाही.

स्कायलॅबला पृथ्वीभोवती फिरती प्रयोगशाळा म्हणून डिझाईन केले होते याचा मुख्य उद्देश मानवी शरीरावर दीर्घकाळात वजनरहित अवस्थेचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे हा होता.

नासाने त्यावेळी स्कायलॅबला पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापन करत मोठे यश मिळवले होते. परंतु स्कायलॅबचा कार्यकाळ संपल्यावर तिला यशस्वीरित्या पृथ्वीवर कसे उतरवायचे यावर दुर्दैवाने खूप दुर्लक्ष केले होते.

स्कायलॅब मानवरहित Saturn V Rocket  मधून सोडण्यात आले होते, हे त्या यानाचे शेवटचे मिशन होते, या यानाचा उपयोग पूर्वी चंद्र मोहिमांमध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर Saturn IB यानाच्या तीन मोहिमातून प्रत्येकी ३ अशा ९ अंतराळ वीरांना या स्काय लॅब मध्ये उतरवण्यात आले स्कायलॅबला उड्डाणाच्या वेळीच झालेल्या अपघातामुळे नुकसान झाले होते.

 

Saturn IB
Wikipedia

ज्यामुळे तिच्यामधील बरीचशी इलेक्ट्रिसिटी आणि सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण करणारे आवरण नष्ट झाले होते.

सुरवातीला ९ वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता मात्र मे १९७३ ते फेब्रुवारी १९७४ दरम्यानचे केवळ २४ आठवडे अंतराळवीर निवास करू शकले.

१९७८ मध्ये नासाच्या अभियंत्यांना स्टेशनची कक्षा वेगाने क्षीण होत असल्याचे दिसून आले. आता स्कायलॅब ही ७७ टन वजनी एक तोफ बनली होती.

ही स्कायलॅब पृथ्वीवर कोसळण्याच्या स्थितीत नासा कशाप्रकारे संप्पती आणि जीविताचे रक्षण करणार असा प्रश्न लोक विचारू लागले.

यावर नासाने स्कायलॅबला पुन्हा कक्षेत स्थापन करण्याचा प्रयत्न करणार व यासाठी एक नवीन अंतराळयानाच वापर करू आणि स्कायलॅबचे आयुष्यमान ५ वर्षाने वाढविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

यानंतरदेखील स्कायलॅब अंतराळ कच-याप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहील, मात्र ११ जुलै १९७९ ला स्काय लॅब झपाट्याने पृथ्वीकडे येऊ लागली.

 

skylab inmarathi
History.com

नासा अभियंत्यांनी स्कायलॅबचे बुस्टर रॉकेटस फायर केले जेणेकरूण ती हिंदी महासागरात कोसळेल. स्कायलॅबचा मोठा भाग हिंदी महासागरात कोसळला परंतु काही भाग पश्चिम ऑस्ट्रेलिया मध्ये कोसळला. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

स्कायलॅब कोसळल्यावर अमेरिकेत संतापाची लाट उसळली. अमेरिकन जनतेचा सरकारवरील विश्वास कमी झाला.

स्कायलॅब कशी कोसळते हे पाहण्यासाठी अमेरिकेत काही ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले होते त्यामध्ये संरक्षण साधन बंधनकारक करण्यात आले होते.

काही हॉटेल्सनी स्कायलॅब क्रॅश झोन केले होते. यावरुन असे दिसते की अमेरिकेत या प्रकरणाचे गांभीर्य नव्हते.

एकीकडे अमेरिकेत स्कायलॅब क्रॅश होण्याच्या पार्ट्या सुरु होत्या मात्र इतर देशांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. नासाने सुरवातीला स्काय लॅब कुठे आणि कधी पडणार हे सांगितलेच नव्हते.

नंतर हिंद महासागर आणि ऑस्ट्रेलियामध्ये ७४०० किलोमीटर मधील क्षेत्र संभाव्य म्हणून जाहीर करण्यात आले. तरी या क्षेत्राच्या जवळपास राहणारे लोक भयभीत झाले होते.

 

crash sky lab
David Reneke

अमेरिकन वृत्तपत्रामुळे लागली ऑस्ट्रेलियन युवकाला लॉटरी :

अमेरिकन वृत्तपत्रांना माहित होते की स्कायलॅब कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत कोसळणार नाही, त्यामुळे वृत्तपत्र खपासाठी अशी योजना जाहीर केली ज्यात स्कायलॅब कोसळल्यानंतर तिचा तुकडा ७२ तासात घेऊन येणा-याला १० हजार डॉलरचा इनाम जाहीर केला.

वर्तमानपत्राच्या दृष्टीने ही एक सुरक्षित खेळी होती. ही बातमी ऑस्ट्रेलियामध्येदेखील पोहोचू शकते याचा विचार वृत्तपत्राने केलाच नव्हता.

१७ वर्षीय स्टॅन थॉर्नटनच्या घरात स्काय लॅबचा एक तुकडा येऊन पडला आणि त्याने जास्त विचार न करता ७२ तासाच्या मुदतीच्या आत पोचण्यासाठी तडक सॅन फ्रांसिस्को एक्झामिनर वृत्तपत्राचे कार्यालय गाठले.

वृत्तपत्रानेदेखील जास्त आढेवेढे न घेता त्याला १० हजार डॉलरचे इनाम दिले.

थोडे इतिहासात डोकवूया..

ब-याच जणांना १९८६ च्या स्पेस शटल चॅलेंजरची दुर्घटना आठवत असेल.. त्यांना माहित असेल दुर्घटना झाल्यावर नासाने तुकडा न तुकडा शोधून काढण्यासाठी किती मेहनत घेतली होती जेणेकरून कुणी एखादा तुकडा आपल्या संग्रही ठेवून घेऊ नये.

अलीकडेच अपोलो १३ यानाचे हस्तलिखित गणितीय हिशोब जेव्हा जेम्स लोव्हलने लिलावात काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी नासाने याचे मालकी हक्क खरेदी करण्याची सूचना केली.

त्यामुळे हे ऐकायला विचित्र वाटेल की स्कायलॅबचे अगदी थोडे मोठे तुकडे अमेरिकेत आहेत. तर दक्षिण-पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या बालाडोनिया संग्रहालयात स्कायलॅबचे दोन मोठे तुकडे आहेत.

 

Balladonia
Aussie Towns

एकावर लाल मोठ्या अक्षरात “SKYLAB” तर दुस-यावर “Airlock/Danger.” असे लिहलेले आहे. एस्पेरन्स, ऑस्ट्रेलिया, संग्रहालयात स्कायलॅब ऑक्सिजन टँकचे दोन भाग आहेत.

आज स्कायलॅबचे तुकडे खरेदी करणे शक्य आहे. आज नासाचा दावा आहे की स्कायलॅबचे कोणतेही खंड युनायटेड स्टेट्सची मालमत्ता आहे, मात्र स्पेस स्टेशन क्रॅश-लँड झाल्यानंतर एजन्सीने मालकीची अंमलबजावणी केली नाही.

खरं तर, मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरच्या नासाच्या अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियन लोकांनी पुरविलेल्या अनेक नमुन्यांची तपासणी केली ज्यांनी त्यांना शोधून काढले. त्यांच्या प्रामाणिकपणाची पुष्टीही केली आणि त्यांना त्यांच्या शोधकांकडे परत दिले.

तत्कलीन वर्तमानपत्रांच्या दाव्यानुसार आंतरराष्ट्रीय करारानुसार अमेरिका त्या वेळी तुकड्यांचा दावा करू शकला असता मात्र त्यांनी त्यावेळी ज्याला सापडले त्याची मालमत्ता असा दृष्टीकोन स्वीकारला होता.

ब-याच ऑस्ट्रेलियन लोकांनी त्यांना सापडलेल्या तुकड्यांची माहिती अमेरिकन अधिका-यांना दिलीच नाही.

स्पेस स्टेशनने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच स्फोट होऊन जळाले त्यामुळे बहुतांश तुकडे आकाराने लहान होते. ब-याच शोधकर्त्यांना ही पैसे कमविण्याची संधी वाटली त्यांनी ते जतन करून नंतर विकण्याचा निर्णय घेतला.

आजही ऑनलाईन स्कायलॅब टूथपेस्ट, स्काय लॅब टिफिन असे प्रॉड्कटस विक्रीस आहेत.

 

Sky ab tooth paste
LiveAuctioneers

यावरून असे दिसून येते की नासाने स्पेस स्टेशन उभारण्याच्या घाईमध्ये सुरक्षा मानके आणि स्कायलॅबला पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याची योजना याकडे दुर्लक्ष केले.

पैशांचा अभाव असे कारण यावेळी देण्यात आले. मात्र यामुळे खूप मोठी जीवितहानी होऊ शकली असती तसेच लॅब पडण्याच्या आधी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्या आणि स्पर्धा यामुळे या प्रकरणाचे अजिबात गांभीर्य नव्हते असेच दिसून येते.

असे असले तरी स्कायलॅब प्रकल्प अगदीच फेल गेला नाही. स्कायलॅबमध्ये अंतराळवीर असण्याच्या १७१ दिवसात स्कायलॅबने पृथ्वीला २४७६ प्रदक्षिणा घातल्या. तर २००० तास वैद्यकीय आणि शास्त्रीय प्रयोग केले

सूर्याचे १२७००० तर पृथ्वीचे ४६००० फोटो काढले. तर सोलर फ्लेअर म्हणजे सौर वादळाचे यशस्वी चित्रण केले. जे मानवरहित यानाद्वारे करणे अशक्य होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अख्ख्या जगाने श्वास रोखला… आणि स्काय लॅब समुद्रात कोसळली…

  • July 17, 2019 at 2:34 pm
    Permalink

    Storm Area 51 यामागे काय गूढ आहे आणि त्याचा परग्रहावरील माणसाशी असलेले संबंध यावर लेख हवा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?