या लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का ? ते जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतामधील प्रत्येक धार्मिक स्थळाचे किंवा एखाद्या स्थळाचे एक वेगळे महत्त्व असते आणि याच वेगळ्या महत्त्वामुळे या स्थळांना प्रसिद्धी मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्थळाची माहिती देणार आहोत, जे आपल्या वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. हे कारण थोडे विचित्रच आहे. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध स्थळाबद्दल..

 

Lanka minar.Inmarathi
shayaribyheart.co.in

यूपीच्या जलौनमध्ये २१० फूट उंच लंका मिनार आहे. याच्या आतमध्ये रावणाच्या पूर्ण कुटुंबाचे चित्रण करण्यात आले आहे. याची खास गोष्ट अशी कि, या मिनारवर सख्खे भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊया, या मिनारामागे लपलेली गोष्ट..


या मिनाराला मथुरा प्रसादने तयार केले होते, ज्यांनी रामलीलामध्ये रावणाची व्यक्तीरेखा बरीच दशके साकारली होती. रावणाची व्यक्तीरेखा त्यांच्या मनावर एवढी काही बिंबली होते की, त्यांनी  रावणाच्या आठवणीमध्ये ही लंका मिनार तयार केली.

 

Lanka minar.Inmarathi1
shayaribyheart.co.in

१८७५ मध्ये मथुरा प्रसाद निगमने रावणाच्या स्मृतीमध्ये येथे २१० फूट उंच मिनार बनवली आहे, ज्याला त्याने लंका नाव दिले आहे. कस्तुरी, उडदाची डाळ, शंख आणि कवड्यांनी ही मिनार बनलेली आहे. या लंका मिनाराला बनवण्यासाठी जवळपास वीस वर्ष लागली.

त्या काळी या मिनाराला बनवण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपये एवढी रक्कम लागली होती, असे म्हटले जाते. स्वर्गीय मथुरा प्रसाद फक्त रामलीलाचे आयोजनच करत नसत, तर या रामलीलामध्ये रावणाची व्यक्तिरेखा स्वत:च साकारत असत. या रामलीलेमध्ये मंदोदरीची भूमिका घसीटीबाई नावाची एक मुस्लिम स्त्री साकारत असे.


या मिनारामध्ये १०० फूट कुंभकर्ण आणि ६५ फूट उंच मेघनाथची मूर्ती लावण्यात आलेली आहे. तिथेच मिनारच्या समोर भगवान चित्रगुप्त आणि भगवान शंकराची मूर्ती आहे. हे मंदिर अशाप्रकारे तयार करण्यात आलेले आहे कि, रावण आपल्या लंकेमधून भगवान शंकराचे २४ तास दर्शन घेऊ शकतो. या परिसरामध्ये १८० फूट लांब नाग देवता आणि ९५ फूट लांब नागीण प्रवेशद्वाराजवळ आहे, जी मिनाराची राखण करते.

 

Lanka minar.Inmarathi2
shayaribyheart.co.in

नागपंचमीला या परिसरांमध्ये भव्य जत्रेचे आयोजन करण्यात येते आणि दंगा पण लागतो. कुतुबमिनार नंतर भारताच्या सर्वात उंच मिनारांमध्ये लंका मिनार समाविष्ट आहे.

भावा – बहिणीने एकत्र जाणे निषिद्ध आहे.


या मिनाराच्या परिसरात भाऊ आणि बहिण एकत्र जाऊ शकत नाही. याचे कारण आहे की, लंका मिनाराच्या खालपासून वरपर्यंत चढाईमध्ये सात परिक्रमा करायच्या असतात, ज्या भाऊ – बहिण करू शकत नाहीत. ह्या फेऱ्या फक्त पती – पत्नीसाठी मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भाऊ – बहिणीला एकत्र येथे जाण्यास मनाई आहे.

असे हे मिनार देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि वर दिलेल्या कारणामुळे भाऊ – बहिणीला एकत्र येथे जाण्यासाठी मनाई आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?