पोराला सांभाळण्यासाठी रोज १५०० विटांचा डोंगर उचलणाऱ्या या आईची कहाणी अंगावर काटा आणते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आपलं आयुष्य एक मोठी शाळा आहे अस म्हणतात ते काही खोट नाही, हि शाळा आपल्याला जसे अधिकार शिकवते तसच, कठीण प्रसंग आला की खचून न जाता हतबल न होता त्या प्रसंगांना धीराने तोंड द्यायला, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडायलाही शिकवते.
आयुष्य जसं जसं वळण घेईल तस तस आपण परिस्थितीनुसार जगायला शिकत जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण अनेक मोठ्या पार पडत असतो जबाब्दार्यांपैकी एक मोठी जबाबदारी म्हणजे मुलं.
मुलांना वाढवणं सोपं नसतं आणि एकट्या आईने तर नाहीच नाही, त्यांना आई वडील दोघांची साथ, प्रेम, संरक्षण,संस्कार ह्यांची नितांत गरज असते.
पण दुर्दैवाने ह्यातल्या एकाची साथ नसेल तर सगळी जबाबदारी एकट्यावर येऊन पडते ज्यात त्याला जास्त कसरत करावी लागते. अनेक आघाड्यांवर एकट्याला लढाव लागत, पण म्हणतात ना की वेळ सगळं काही शिकवते.

पाण्यात पडला की माणूस पोहायला शिकतो म्हणतात, जसं सोन्याला तापवल्यावर सुरेख झळाळी प्राप्त होते. अगदी तसच विपरीत परिस्थितीत कठीण प्रसंगांना सामोरे जातांना आपल्याला आपल्या क्षमतांची खरी ओळख पटते.
आपण स्वतःला नव्याने ओळखाया लागतो, आणि अशात जर तुम्ही आई असाल तर हे वैशिष्ट्य आणखीनच अधोरेखीत होतात.
आपल्या मुलांसाठी त्यांच्या पोटापाण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी ती कुठल्याही दिव्यातून जायला तयार असते. अशावेळी ती इतर कशाची पर्वा करत नाही.
एक नामांकित फ़ोटोग्राफ़र श्री. आकाश ह्यांनी अशाच एका कणखर आईची कहाणी आपल्याशी शेयर केली आहे.
===
मी पाच मानिन्यांची गरोदर होते जेव्हा एके दिवशी माझा नवरा मला सोडून परागंदा झाला. मी खूप वाट पाहिली पण तो परतून आला नाही. इकडे मला काहीही समजत नव्हतं आता माझं कसं होणार?
मी स्वतःचं आणि माझ्या दोन मुलाचं रक्षण कसं करू? मी पार उध्वस्त झाले होते.

मला घरकामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता. पण अडचणी आणि त्रास सगळ काही शिकवतो, मुलाच्या जन्मानंतर मला हे काम मिळालं आणि मी येथे काम करायला लागले. मी जिथे काम करते तिथे माझ्या मुलीला हबीबी ला नेहमी माझ्या सोबत ठेवते, जेणेकरून काम करता करता मला तिच्या वरही लक्ष ठेवता येईल.
मी माझ्या मोठ्या मुलीला इथे ठेवू शकत नाही त्यामुळे तिला एका मुस्लीम अनाथआश्रमात ठेवले आहे.
मी रोज सकाळपासून संध्याकाळ पर्यंत इथे हर विटा तोडायचं काम करते. इथे मला १००० विटा तोडायचे १५० रुपये मिळतात. मी जेव्हा हे काम सुरु केलं तेव्हा पहिल्या दिवशी मी फक्त. ३० विटा तोडू शकले होते. हळू हळू सरावाने मी जास्त विटा फोडू लागले.
आता जास्तीत जास्त विटा फोडून जास्तीत जास्त पैसे कमावण्याकडे माझं लक्ष असते जेणेकरून मला माझ्या मुलांना चांगलं आयुष्य देता येईल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करता येतील.
मला त्यांना शाळेत घालायचं आहे, खूप शिकवायचं आहे त्यांना आपल्या पायावर उभं करायचं आहे.
म्हणजे त्यांच्या वाट्याला माझ्यासारखं खडतर आयुष्य येणार नाही म्हणजे त्यांना चांगला माणूस बनता येईल आणि आपल्या मनासारखे आयुष्य जगता येईल.

माझं नवरा चांगला माणूस नव्हता. तो दररोज घरी दारू पिऊन खूप उशिरा यायचा आणि मला रोज मारहाण करायचा, त्याला जुगाराचा नाद होता.
त्यात तो जेव्हा जेव्हा हरायचा तेव्हा त्याचा सगळा राग तो माझ्यावर काढत असे, शिव्या देत असे मारहाण करीत असे आणि मला हे सहन करावं लागायचं कारण तेव्हा माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता.
मला आधार देणारं कोणीही नव्हतं मी सात वर्षांची असताना माझं संपूर्ण कुटुंब गमावलं.
तो मला सोडून गेल्यावर जरी मी हादरले होते तरी आज मला ह्याचा आनंद आहे की माझा नवरा माझ्या आयुष्यात नाहीये. जे होत ते चांगल्यासाठी होते म्हणतात ना ते असं.
आता मी आनंदी आहे मी माझं काम करू शकते आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमवू शकते, आता मी कोणावर अवलंबून नाहीये.

स्त्री कधीही कोण्याही पुरुषावर अवलंबून नसते हे उशिरा का होईना माझ्या लक्षात आलंय, तीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकते, हवं ते मिळवू शकते, मानाने जगू शकते, आपल्या समस्या स्वतः सोडवू शकते, कोण्याही प्रसंगाला धीराने सामोरी जाऊ शकते.
पोटाची आग सर्व काही शिकवते अगदी अशक्याला शक्य करनंही. खरंच परिस्थिती सगळ शिकवते, काही शिकवो किंवा न शिकवो स्वतः च्या पायावर उभं राहाण जरी शिकलो ना आपण, तर मग आपल्याला काहीही अशक्य नाही.
===
आपल्या आजूबाजूला कित्येक अशा स्त्रिया आहेत ज्या वर्षानुवर्ष घरातल्यांचा छळ सहन करत राहतात. अगदी उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियाही ह्याला अपवाद नाहीत.

कारण एकच, आत्मविश्वासाची कमतरता, त्यात आणखी घरच्यांचं पाठबळ नसेल तर मग विचारायलाच नको. जे आहे त्यातच खितपत पडतात आणि आला दिवस ढकलत राहतात.
आपलीही वेगळी ओळख आहे हेच त्या मुळात विसरून जातात. आपलं अस्तित्व जपायला आपल्यापायाव्र उभं राहायला परिस्थितीने नाडल्या जाण्याची वाट कशाला बघायची.
भावनिक गुंत्यातून बाहेर येऊन स्वतःला शोधणं गरजेचं आहे. जर ठरवलं आणि निश्चय पक्का असेल तर दैवही आपली साथ देतं अगदी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असलात तरी. ह्या आईची हि प्रेरणादायी कथा आपल्याला हेच शिकवते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Please send me Contact Details. I want to talk with her.