नकार देणं अवघड जातंय? ह्या पद्धती वापरून पहा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बहुतेकांना एक सवय असते. त्यांना प्रत्येकाची कामं करायची असतात. पण व्यक्तीला काही बंधनं असतात, मर्यादा असतात. आपण कितीही प्रयत्न केला सगळ्यांना खुश ठेवण्याचा तरीही आपण कुठेतरी अडकतो आणि समोरच्याला खुश करण्याच्या नादात आपण थकतो. स्वतःकडे लक्ष देणं ही एक दुय्यम गोष्ट होऊन जाते.

एक वेळ तर अशी येते जिथे आपल्याला कळतंय की आपल्याला सांगितलेली गोष्ट जमणार नाहीये. तरीही आपण “हो” म्हणत जातो. आणि आपल्याला काम जमलं नाही की समोरच्याला दुखावून जातो. नाही म्हणलं तर समोरची व्यक्ती आपल्यावर चिडेल का? आपले संबंध तुटतील का? ह्या पछाडून टाकणाऱ्या चिंता असतातंच. अश्या अवघड स्थितीत समोरच्याला दुखावण्यापेक्षा नकार देणं बऱ्याचदा चांगलं असतं. पण एव्हाना सवय लागलेली असते – “नाही कसं म्हणणार?” ?!

 

 

No way marathipizza

 

सोप्या पद्धतीने समोरच्याला न दुखावता नकार देतांना ह्या गोष्टी लक्षात ठेवा.

समोरच्याला झुलवत बिलकुल ठेवू नका.

yes-no-maybe marathipizza

 

समोरच्याला “मी कळवतो जरा वेळाने, करतो कॉल, भेटुन बोलू, नंतर सांगतो” अश्या प्रकारे टाळत असाल तर तुम्ही तुमचं त्या व्यक्तीशी असलेलं नातं आधीच धोक्यात घालत आहात. एकवेळ नकार पचवता येईल पण झुलवत ठेवणं समोरचा पचवू शकत नाही. म्हणूनच जर तुम्हाला नंतर कामाबद्दल खरंच गंभीर असाल आणि शक्य असेल तरंच त्यांना असं सांगा. त्यापेक्षा जमत नसेल तर तोंडावर सांगा की मी प्रयत्न केला भरपूर पण (ह्या कामासाठी) वेळ काढता येत नाहीये.


त्यांना तुमची खरी कारणं सांगा

 

talking marathipizza

 

तुम्ही तुमची बाजू त्यांच्यासमोर मांडू शकता. तुम्हाला खरंच दुसरं कोणतं काम आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कामात कसे अडकले आहात. तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा आहे. ह्यासारखी कारणे तुम्ही सांगून त्यांच्याशी प्रामाणिक राहू शकता. ती व्यक्ती जर तुम्हाला समजून घेणारी असेल तर तिला गोष्ट लक्षात येईल. ह्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज पडणार नाही.

त्यांना पर्याय सुचवा

 

option-marathipizza

 

कुणीतरी तुमच्याकडे काम घेऊन मदतीसाठी येतं त्यांना नाही म्हणणं एकवेळ सोपं असतं. ह्यासोबतच त्यांचं काम कुठे आणि कुणाकडुन होईल ह्यासाठी पर्याय सुचवणं आपली जबाबदारी असायला हवी. जरी माझ्याकडून होत नसलं तरीही तुझं काम अडणार नाहीये. त्यांच्या गरजेला पुरेल असा पर्याय सुचवून त्यांच्या निराशेला जरा कमी करता येईल.

नकाराची Guilt घेऊ नका

 

no-more-guilt marathipizza

 

स्वतःला प्राधान्य देणं हा काही गुन्हा नाहीये. तुम्ही स्वतःला महत्व देताना बाकीच्या जगाला तुम्हाला नकार द्यावा लागला तर त्यात गैर काहीच नाही. जेवढी गरज तुमच्या मित्रांना तुमची आहे त्याही पेक्षा तुम्हाला स्वतःची गरज जास्त असते. प्रत्येक वेळी आपण जीव तोडून सगळ्यांनाच मदत करायला पाहिजे असं नसतं.

ह्या साध्या गोष्टींमुळे तुमच्या मनावरचं दडपण कमी होऊ शकतं…आणि आवश्यक, योग्य तेव्हा “नाही” म्हणणं शक्य होऊ शकतं. समोरच्याला नं दुखावता…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *