एकदम झकास-फिट राहण्याचा, जगातला “एक नंबर”चा, अतिशय सोपा उपाय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

आपल्या रोजच्या जीवनामध्ये एकदम फिट आणि निरोगी राहण्यासाठी आजकाल सर्वच लोकांचा अवेअरनेस वाढलेला आहे.
फिट राहण्यासाठी लोक – वेगवेगळ्या प्रकारचे डायट (दीक्षित डायट, ऋजुता दिवेकर डायट), जिमची मेंबरशिप, रोज फिरायला जाणे, रनिंग, योगासने करणे असे नानाविध प्रकार करत असतात.
परंतु या सर्व गोष्टी करत असताना अगदी आपल्या हातात असलेली सोपी गोष्ट मात्र आपण बऱ्याचदा दुर्लक्षित करतो.
ही सोपी गोष्ट जर तुम्ही नीट पाळली तर तुमचे आरोग्य अगदी व्यवस्थित राहील, आणि ती म्हणजे पाणी…!

“जल ही जीवन है…” हे वाक्य आपण नेहमीच वाचतो. पण आज आहारात पाणी हा घटक कसा आवश्यक आहे, याबाबत थोडक्यात माहीती.

आपल्या वजनाच्या ५०% ते ६०% पाणी शरीरास मिळायला हवे. सरासरी २-३ लिटर पाणी प्रतिदिवस मिळायला हवे.

त्यापैकी १% कमी झाल्यास तहानेची जाणीव होते. ५% कमी असल्यास मांसपेशीचे क्षमता कमी होते. आणि २०% कमी पाणी मृत्युस कारणीभुत ठरते.

पाण्याची कार्ये :

 

water health-inmarathi02
everydayhealth.com

१) पाणी हे सार्वभौमिक विलयक (universal solvent) आहे. त्यामुळे शरारातील सर्व क्रियांमध्ये महत्वाचे ठरते.

२) शरीरातील सोडीयम, पोटॅशिअमचे नियमन करून पाणी electrolyte balance नियमित ठेवते.

३) शरीरातील पाणी शरीराचे तापमान नियमीत ठेवते.

ऊदा – ऊन्हाळ्यात शरीराचे वाढणारे तापमान घामाद्वारे कमी केले जाते.

४) तहान लागल्याबरोबर पाणी पिण्याची सवय मेंदुला कार्यक्षम ठेवते.

५) शारीरीक क्षमता वाढवण्याबाबतही पाणी महत्वाचे कार्य करते. कारण शारीरीक कष्ट करताना मांसपेशीना oxygen पुरवण्याचे कार्य पाणी करत असते.

 

water health-inmarathi05
allure.com

६) पाणी पिण्याने शरीर hydrated राहते व त्वचा देखील त्यामुळे तजेलदार राहते.

७) Blood Urea Nitrogen हे महत्वाचे toxin असते. मात्र ते पाण्यात विलयीत होण्यामुळे kidneys मध्ये जाऊन मुत्राद्वारे बाहेर पडते. अशाप्रकारे पाणी ऊत्सर्जनास (excretion) मदत करते.

८) योग्य प्रमाणात पाणी पिल्यास आतड्यातील क्रिया योग्यप्रकारे होतात. पाणी कमी पिल्यास मलातील पाणी आंत्राद्वारे शोषल्या जाते व बद्धकोष्ठता होते.

पाणी कमी पिल्यास दिसणारी लक्षणे :

 

water health-inmarathi03

 

१) सतत तहान लागणे

२) मुत्राचा रंग गडद होणे

३) ओठ व जीभ कोरडी पडणे

४) झोप न येणे

५) अन्नावर वासना न जाणे (nausea)

६) शिरःशुल (Headache)

७) भ्रमितावस्था (confusion)

८) हातपायांना मुंग्या येणे.

ही सर्व लक्षणे तर आपण पाहीलीच…

पण “पाणी योग्य प्रमाणात पिण्याची सवय कशी लावावी??”

काही छोट्या, सोप्या टिप्स :

 

water health-inmarathi07
organicfacts.net

१) लिंबू, संत्री, मोसंबी यांच्या फोडी टाकल्यास पाण्याला चव तर येतेच पण detoxification लाही मदत होते.

२) पाण्याची बाटली कायम सोबत ठेवावी.

३) पाण्याची बाटली अशी घ्यावी ज्यावर मिली लीटरच्या खुणा असाव्यात. ज्यामुळे दिवसभरात किती पाणी पिले हे कळेल. तसेच आजकाल हे track करणारे apps ही आले आहेत. ते देखील आपण वापरू शकतो.

४) जेवण करताना आपण liquids घेऊ शकतो. उदा. ताक

५) मधल्या वेळांमध्ये नारळपाणी, लिंबुसरबत, कोकम सरबत, ग्रीन टी यांचे सेवन करू शकतो.

आता आयुर्वेदानुसार थोडी माहिती पाहु…

 

water health-inmarathi06
viivilla.no

पाणी पिण्याबाबत काही नियम आयुर्वेदात वर्णन केले आहेत.

१) पाणी नेहमी खाली बसुन प्यावे. अन्यथा संधीवाताचा त्रास होतो.

२) पाणी हळु हळु प्यावे.

३) झोपेतून ऊठल्यावर सर्व प्रथम पाणी प्यायल्यास पचनसंस्थेचे विकार होत नाहीत. त्याला “ऊषःपान” असे म्हणतात.

४) तांब्याच्या भांड्यातील पाणी अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहे. रात्रभर ताम्रपात्रात पाणी ठेवुन सकाळी अनशापोटी प्यावे. त्यामुळे वात, पित्त, कफ सर्व दोषांचे शमन होते.

५) तसेच गरम पाणी पिणे हे ही ऊपयुक्त असते. त्यामुळे चरबी कमी होते. तसेच थंड पाण्यापेक्षा लवकर पचन होते.

६) प्रकृतीनुसार, जेवताना कधी पाणी प्यावे यावर आयुर्वेदात विश्लेषण आहे.

वात प्रकृती :

 

water health-inmarathi01

 

जेवणानंतर १ तासाने पाणी प्यावे.

१/२ लिटर गरम पाण्यात ३ पुदीन्याची पाने, अर्धा चमचा बडीशेप टाकुन हे पाणी दिवसभर थोडे थोडे पित रहावे.

पित्त प्रकृती

जेवण करताना थोडे थोडे पाणी प्यावे.

१/२ लिटर गरम पाण्यात १/४ चमचा बडीशेप, २ गुलाबकळ्या, १ लवंग टाकुन दिवसभर हे पाणी पित रहावे.

कफ प्रकृती

१/२ लिटर गरम पाण्यात ३ तुळशीची पाने, अद्रकाचे २ बारीक काप, १/४ चमचा जीरे, १/२ चमचा बडीशेप टाकुन दिवसभर हे पाणी पित रहावे.

नवीन वर्षाची सुरुवात होत आहे…
त्यामुळे healthy डायट, जिम, रोज फिरायला जाण्याची सवय, रनिंग, योगासने या सर्व गोष्टी तर तुम्ही कराच, परंतु अगदी आपल्या हातात असलेली, सोपी गोष्ट – म्हणजेच योग्य वेळी भरपूर पाणी पिणे ही गोष्ट जर तुम्ही नीट पाळली,  वरील सर्व माहीतीचा समावेश तुमच्या दैनंदिनीत केला, तर तुमचे आरोग्य अगदी व्यवस्थित राहील…

 

Stay-hydrated inMarathi

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “एकदम झकास-फिट राहण्याचा, जगातला “एक नंबर”चा, अतिशय सोपा उपाय…

  • July 1, 2019 at 10:45 am
    Permalink

    किमान शुद्ध मराठी लिहिणारे content writer तरी नौकरी वर ठेवा “जेवन”,”पिल्यास ” कशाला भाषेवर बलात्कार करता ?

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?