एका खोलीतून दुसऱ्या खोलीत ज्या कामासाठी गेलो होतो ते कामच विसरलो, तुमच्यासोबत पण असं होतं का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो आणि अचानक आपण त्या खोलीत कुठल्या कामासाठी आलो आहोत हेच विसरुं जातो. हे आपल्यापैकी अनेकांसोबत होत असतं. त्यानंतर आपल्यालाच कळत नाही की आपण कसं का विसरलो. हे आपल्यासोबत नेहेमीच घडत असतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की असं का होतं.

 

forget things-inmarathi
zdnet.com

एखादं काम करायला जाणे आणि तिथे गेल्यावर विसरून जाणे, एखादी वस्तू कुठे ठेवली आहे हे विसरून जाणे, माहिती असूनही जवळच्या लोकांचेही नाव तोंडात न येणे, असं सर्व रोजच आपल्या सोबत घडत असतं. जास्तकरून असं तेव्हा होतं जेव्हा आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो. आणि जेव्हा आपल्यासोबत असं होतं तेव्हा नक्कीच आपल्या डोक्यात एक विचार येतो की, आपल्याला विसरण्याचा आजार तर नाही ना झाला?

म्हणजेच Alzheimer झाला की काय असे आपल्याला वाटत असते. पण काळजी करायची काहीही गरज नाही. कारण University of Notre Dame मध्ये झालेल्या एका शोधात हे दिसून आलं आहे की हे अगदी सामान्य आहे, हे सर्वांसोबतच होत असतं.

अश्या परिस्थितीत आपला मेंदू अचानक झालेल्या समोरील दृश्यांमधील बदलाशी संघर्ष करत असतो. मेंदूच्या ह्या स्थितीला ‘Doorway Effect’ म्हणतात. रिसर्चर्सनी असा दावा केला आहे की अशी स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा आपण एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असतो.

 

forget things-inmarathi03
scoopwhoop.com

रिसर्चर्सच्या मते जेव्हा आपण आपल्या समोरील दृश्ये बदलतो तेव्हा आपला मेंदू काही गोष्टींना विसरून जातो. ह्यासाठी वास्तविक वातावरण आणि आभासी वातावरण (व्हिडीओ गेम्स)चे अनेक लोकांवर परीक्षण केले. यात असं दिसून आलं की, लोक जेव्हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असतात तेव्हा ते वस्तूंना विसरतात पण जर ते एकाच खोली ये- जा करत असतील तर ते विसरत नाहीत.

ह्यावरून हा निष्कर्ष निघाला की, जेव्हा लोक खोली बदलतात तेव्हाच असं होतं, त्यासाठी वातावरण हे वास्तविक असो किंवा आभासी त्याने काहीही फरक पडत नाही.

ह्यावरून हे देखील दिसून आले की, जेव्हा आपण एक सीमारेषा पार करतो त्याचा आपल्या विचार करण्यावर तसेच निर्णय घेण्याच्या क्षमतेवर खूप मोठा परिणाम होतो.

 

forget things-inmarathi01
mytwins.gr

ह्या शोधाचे प्रमुख Gabriel Radvansky ह्यांच्यानुसार एका चॅप्टर मार्कर प्रमाणे Doorway Effect आपल्या डोक्यातील जुन्या एपिसोडला संपवत जात आणि एक नवीन एपिसोड मेंदूमध्ये सुरु होतो. ह्यामुळे जुन्या गोष्टींना आठवणे काठी होऊन जाते.

म्हणजेच खोली बदलताना किंवा एखादी जागा बदलताना आपल्या विचार सेपरेट होऊन जातात म्हणून आपल्याला ते विसरल्या सारखं वाटतं. ह्यानेच आपली विचार क्षमता आणि निर्णय क्षमता प्रभावित होते. पण आपल्याला वाटत असते की आपली स्मरणशक्ती कमी झाली आहे.

 

forget things-inmarathi02
quora.com

ह्यावर उपाय म्हणजे कुठलेही काम करण्याआधी शांतपणे बसून त्यावर विचार करावा, कारण नेहेमी घाईघाईने केलेल्या कामांच्या बाबतीत असं घडत असतं. पण हा कुठलाही आजार नाही हे महत्वाच आहे.

त्यामुळे जर ह्यानंतर जर तुम्ही कुठली गोष्ट विसरलात तर स्वतःला विसरभोळे समजू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?