तुम्हाला माहित आहे का? डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


लेखाचं शीर्षक वाचून थोडं चक्रावला असाल ना? तुम्ही म्हणालं काहीही सांगू नका. डेटॉल हे आरोग्याच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही डेटॉलची सगळी प्रोडक्ट वापरतो आणि तुम्ही म्हणताय की डेटॉलमध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी! अजूनही विश्वास बसत नसेल तर हे सत्य आज जाणून घ्याच.

एक गोष्ट लक्षात घ्या की, ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. डेटॉल हा एक ब्रँड आहे, त्यामुळे आपल्याला वाटत की प्रत्येक प्रोडक्टमध्ये डेटॉल असतंच, पण असं असायलाच हव असही नाही.

इथे म्हणायचं हे आहे की डेटॉलच्या कोणत्याच प्रोडक्टमध्ये डेटॉल नसते.

Detto-marathipizza01

स्रोत

डेटॉल antiseptic liquid जे आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये असतं ते एक antiseptic solution म्हणून भारतात प्रचंड प्रसिद्ध आहे. (हे आहे मूळ डेटॉल!) आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की, डेटॉल हे काही नैसर्गिक रसायन नाही ते Chloroxylenol या घटकापासून बनते.

खाली दिलेली ही आहे पूर्वीची मूळ डेटॉल antiseptic liquid ची बाटली यात तुम्हाला सर्वात वर active ingredient मध्ये Chloroxylenol चा उल्लेख आढळेल. अशीच एखादी नवीन प्रकारातील डेटॉल antiseptic liquid ची बॉटल उचलून पहिलीत तरी त्यावर तुम्हाला  Chloroxylenol या घटकाचा उल्लेख दिसेल.

 

Detto-marathipizza03

स्रोत


हे डेटॉल आपली जखम स्वच्छ करण्यापासून ते या जखमेला निर्जंतुक करण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच आपल्या त्वचेला देखील जंतूपासून दूर ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळेच डेटॉल वापरलं की, आपण सुरक्षित आहोत अशी आपली श्रद्धाचं आहे म्हणा ना!

 

Dettol-marathipizza04

स्रोत

आता या antiseptic liquid डेटॉलमध्ये डेटॉल (Chloroxylenol) असतं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याला देखील आपण डेटॉल म्हणूनच संबोधतो.

या antiseptic liquid डेटॉलला जसा वास येतो तसाच वास डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्ट्सना म्हणजेच साबणापासून ते फरशी साफ करायच्या सॅनीटायजर्सपर्यंत प्रत्येक प्रोडक्टला येतो, त्यामुळे असा समज होतो की, डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टमध्ये डेटॉल आहे आणि हे सर्व प्रोडक्ट शरीराच्या सुरक्षेसाठी काम करतात.

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, डेटॉलच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. त्यात तुम्हाला मूळ डेटॉलमधील Chloroxylenol घटकही दिसणार नाही. याचाच अर्थ काय डेटॉलमध्ये ‘डेटॉल’ नसतंचं!

 

Detto-marathipizza05


स्रोत

आता तुमच्याही लक्षात आलं असेल की केवळ डेटॉल या नावाचा डेटॉल ब्रँडने किती मोठा फायदा करून घेतला. नाव आणि मूळ डेटॉल सारखा येणारा सुवास सोडला तर मूळ डेटॉल आणि डेटॉल ब्रँडच्या इतर प्रोडक्टमध्ये काहीही समानता नाही. याच नावामुळे आणि वासामुळे डेटॉल अगदी हातोहात विकले जाते.

विश्वास बसत नसेल तर डेटॉल ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट उचला आणि त्यात कुठे Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसतो का ते सांगा.

१०० टक्के खात्रीशीर सांगतो की डेटॉल antiseptic liquid ची बॉटल वगळता कोणत्याही डेटॉल ब्रँडच्या प्रोडक्टवर तुम्हाला  Chloroxylenol या नावाचा उल्लेख दिसणार नाही. ही गोष्ट सिद्ध करेल की डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच.

 

Dettol-marathipizza06

स्रोत

आता याचा अर्थ असा देखील काढू नये की, डेटॉल नसलेल्या या इतर प्रोडक्ट्समध्ये डेटॉल (Chloroxylenol) नसल्यामुळे ते निरुपयोगाचे आहेत, तुम्ही वापरत असलेले डेटॉल हे खास तुमच्या शरीराच्या सुरक्षेसाठीच बनवले जातात, फक्त ते डेटॉल (Chloroxylenol) पासून बनलेले असतात हा समज चुकीचा!

ईथे डेटॉल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मूर्ख ठरवण्याचा किंवा त्यांना फसवलं जातंय हे दाखवून देण्याचा उद्देश नाही किंवा डेटॉल या ब्रँडची इमेज खराब करण्याचाही प्रयत्न नाही. मार्केटिंग कशी केली जावी याचे उत्तम उदाहरण म्हणून डेटॉल ब्रँडचा दाखला दिला एवढच. त्यांच्या या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचं कराव तेवढ कौतुक कमीच आहे..!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on “तुम्हाला माहित आहे का? डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी!

  • June 16, 2017 at 8:05 am
    Permalink

    मुळात या आर्टीकल ला वाचताना मला हसू येत आहे.डेटाॅल हे एक ब्रॅंड नेम आहे त्याच्या अंडर त्यांचं पहिलं प्राॅडक्ट हे एक अॅंटीसेप्टीक लिक्विड होतं.प्रत्येक फाॅरम्युलेशन मधे ते क्लोरोझायलेनाॅल असेलच असं काही नाही कारण प्राॅडक्ट प्रमाणे फाॅरम्युलेशन आणि त्यात वापरण्यात येणारे अॅंटीसेप्टीक घटक बदलत असतात.its no big deal.राहीलं फसवण्याचं तर लोक इथे प्रत्येक औषधाच्या गोळीचा सुद्धा substitute असतो हे जाणतात.एखाद्या ब्रॅंड ने एक ओडर असलेला घटक किंवा ओडर फक्त कंटीन्यू केली म्हणजे ही त्यांची चाॅईस होती.बाकी how chloroxylenol affects aquatic life and how its fatal when swallowed हे लिहीलंत तर बरं होईल कारण त्याचे दूरगामी परिणाम आपल्याच पर्यावरणावर होत आहेत कदाचित ते तुमच्यासाठी less important आहे so you are writing such stuff.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?