योगगुरु बाबा रामदेव यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या धक्कादायक गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतात रामदेवबाबा कोणाला माहित नाहीत असे होणार नाही. पतंजलीचे नाव घेतले की रामदेव बाबा डोळ्यासमोर येतात आणि रामदव बाबांचे नाव घेतले की पतंजलीचे प्रोडक्ट डोळ्यासमोर दिसतात. असो थट्टेचा विषय बाजूला ठेवला तर हे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही की रामदेव बाबांनी केवळ भारतातच नाही तर जगभरात योगप्रसार केला आहे.

त्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात आदर आहेच. पण या व्यक्तीबद्दल मध्यंतरी काही धक्कादायक गोष्टी (आरोप?) उघड झाल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेबद्दल जनमानसात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

चला जाणून घेऊया त्या धक्कादायक गोष्टी!

 

baba-ramdev-marathipizza01
mapsofindia.com

१. बाबा रामदेव हे आठवी इयत्तेनंतर घरातून पळून गेले होते आणि  तरीही त्यांच्याकडे भारतामधील चार विद्यापीठांमधून डॉक्टरेटची पदवी आहे.

 

२. बाबा रामदेव यांनी भारतासाठी आणि जगासाठी आयुर्वेदिक औषधे आणि योगाची नवीन द्वारे खुली केली. पण याचा त्यांनी व्यवसाय केला आणि त्यातून त्यांनी तब्बल ३० अब्ज एवढी संपत्ती कमावली आहे.

 

३. बाबा रामदेव त्यांच्या योगाच्या वर्गामध्ये पहिल्या रांगेत मध्ये बसण्यासाठी ५०००० एवढे शुल्क आकारतात, तसेच त्यामागील रांगेतील खुर्च्यांवर बसण्यासाठी ३०००० एवढे तर शेवटच्या रांगेत बसण्यासाठी १०००० एवढे शुल्क आकारतात.

 

baba-ramdev-marathipizza02
newsofdelhi.com

४. बाबा रामदेव यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात योगाच्या सहाय्याने, एड्स आणि कर्करोग हे रोग बरे करता येतात असा दावा केला होता, परंतु जेव्हा याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी आपले विधान बदलले आणि स्पष्ट केले की, त्यांनी फक्त योगाने एड्सशी लढण्यासाठी मदत होते असे सांगितले होते.

 

५. बाबा रामदेव यांनी दावा केला होता की बालपणात त्यांच्या शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि ऋषी दयानंद यांचे विचार वाचल्यानंतर त्यांचे आयुष्य पालटले.

पण एक गोष्ट लगेच लक्षात येते की त्यांचे उजवे कपाळ हे डाव्या कपाळापेक्षा मोठे आहे आणि त्यांचा उजवा डोळा हा डाव्या डोळ्यापेक्षा मोठा आहे. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची उघडझाप हि डाव्या डोळ्यापेक्षा कमी होते.

असे असूनही लहानपणी अर्धांगवायूचा झटका आल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही.

 

६. बाबा रामदेव यांचे जवळचे सहकारी आणि वर्गमित्र आचार्य बाळकृष्ण यांची गुन्हा करुन नेपाळ मधून पळून आल्याच्या आणि बनावट पासपोर्ट खरेदी करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे कायद्याचे उल्लंघन करण्याच्या आरोपावरून चौकशी केली गेली होती.

 

baba-ramdev-marathipizza03
topyaps.com

७. बाबा रामदेव यांनी शपथ घेतली होती की ते कधीही राजकीय क्षेत्रात सहभागी होणार नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्यांचे अनेक प्रसिद्ध राजकीय नेत्यांशी आणि पक्षांशी जवळचे संबंध आहेत.

 

८. २०११ साली बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानात भ्रष्टाचाराविरुद्ध केलेल्या आंदोलनातून पळ काढला, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी स्वत:भोवती झटपट सलवार कमीज लपेटले आणि आपले डोके ओढणीने झाकून घेतले.

पण त्यांच्या भल्या मोठ्या दाट दाढीने त्यांना संकटात आणले, ती ओढणी सारखी त्या दाढीमध्ये अडकत होती. त्यामुळे त्यांचे बिंग फुटले.

 

९. एका बाजूला बाबा रामदेव आदर्श भारताचे स्वप्न बघत आहेत, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या फार्मसीवर काही आरोप देखील आहेत की, त्यांची फार्मसी अशा गोळ्यांची विक्री करण्याचा दावा करते, ज्या घेतल्यानंतर केवळ मुलेच जन्माला येतात.

 

baba-ramdev-marathipizza04
rvcj.com

१०. बाबा रामदेव यांनी असा प्रचार केला होता की, प्राणायम हा जगभरातील आजारांवर औषध मुक्त असा उपचार आहे. असे असूनही खुद्द त्यांची स्वत:ची कंपनी दिव्य फार्मसी आजही अनेक आजारांवर २८५ औषधे आणि इतर उत्पादन बनवते. या फार्मसीची उलाढाल तब्बल ११०० कोटी रुपये आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “योगगुरु बाबा रामदेव यांच्याबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या धक्कादायक गोष्टी!

  • July 19, 2017 at 5:02 pm
    Permalink

    Kadi Muslim community badhal ani tycha Muslim moulvi badhal pan maheti dy

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?