छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

इंद्र जिमि जृम्भा पर
बांडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुल राज है

पवन बरिनाह पर
संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर
राम द्विजराज है

दावा दृमदंड पर
चिता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है

तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है!

काय सुरेख वर्णन केलंय कवी भूषण यांनी महाराजांचं !

 

छत्रपती शिवाजी महाराज…आपल्या मराठी बांधवांसाठी, आपलं “बंधुत्व” प्रस्थापित करण्यासाठी हे नावंच पुरेसं आहे.

 

shivaji-maharaj-fetured original marathipizza

स्त्रोत

अखंड महाराष्ट्रात असा कोणी सापडणार नाही, ज्याला, ‘’काय रे? शिवाजी महाराज माहिती का ?‘’ असं विचारल्यावर “नाही” उत्तर येईल असं – आमच्या अस्तित्वाशीच जोडलं गेलेलं नाव.

एरवी जातीपातीमधे विभागलेला महाराष्ट्र – तुम्ही जातीने कोणीही असा – कुणा समोरही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करा, एकसाथ, एकदिलाने स्फुरण चढल्याशिवाय राहणारच नाही.

चला तर मग, महाराजांविषयी थोडंसं जाणुन घेऊया…!

छत्रपती शिवाजी महाराज…

जन्म :- 19 फेबृवारी 1630

जन्मस्थळ :- किल्ले शिवनेरी

माता :- राजमाता जिजाऊसाहेब

jijamata-marathipizza

 

पिता :- शहाजीराजे भोसले

अपत्य :- संभाजी, राजाराम, सखुबाई, रानुबाई, अंबिकाबाई, राजकुमारीबाई

प्रमुख शत्रु :- आदिलशाही, निझामशाही, कुतुबशाही, मोघलाई.

सैन्य विस्तार :- घोडदळ – 40000, पायदळ —50000,  पश्चिम तटावर आरमार बांधणी.

 

काही उल्लेखनीय बाबी —

  1. जनतेचा राजा – “जाणता” राजा
  2. मराठा साम्राज्याचे संस्थापक
  3. मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती
  4. अष्टप्रधान मंडळाचे संस्थापक
  5. भारतीय नौदलाचे जनक
  6. गनिमी काव्याचे जनक
  7. एकमेवाद्वितीय राजा ज्याने स्वतःचा महाल बांधला नाही !
  8. शिवशक कालगणनेचे सुरुवात केली
  9. स्वराज्याची राजमुद्रा, स्वतंत्र नाणी
  10. शककर्ता, क्षत्रियकुलावंतस् इ. बिरुदे

 

महाराजांविषयीचे काही उल्लेखनीय उद्गार

 

‘’ लाख मेले तरी चालतील, पन लाखांचा पोशिंदा जगलाच पाहीजे’’

— बाजीप्रभु देशपांडे

 

‘’हा तानाजी जिवंत असताना महाराज स्वतः मोहिमेवर जानार? आधी लगीन कोंढाण्याचं, अन् मंग माझ्या रायबाचं’’

— तानाजी मालुसरे

 

“Shivaji is one of the greatest national saviour who emancipated our society & our HINDU dharma, when they were faced with threat of total destruction. He was peerless hero, a pious & God-Fearing King & verily a manifestation of all virtues of a born, Leader of men described in our ancient scriptures”

— Swami Vivekanda

 

शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप ।

शिवरायांचा आठवावा साक्षेप, भुमंडली।।

— समर्थ रामदास स्वामी

 

छत्रपतींनी उभं केलेलं “स्वराज्य”

 

shivaji maharaj empire marathipizza

स्त्रोत

स्मरणातील शिवाजी महाराज :

Shivaji Maharaj-marathipizza

17 एप्रिल 1961 (स्त्रोत)

 

Shivaji Maharaj-marathipizza

राज्याभिषेकाचं 300 वं वर्ष (स्त्रोत)

 

Shivaji maharaj Stamp 1980 marathipizza

 

21 एप्रिल 1980 (स्त्रोत)

तर मग – होऊन जाऊ देत –

छत्रपती शिवाजी महाराजांचा…विजय असो…विजय असो…विजय असो…!

: ओंकार जोशी

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

4 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल : काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?