गझनवीने शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी कोरला कलमा, पण त्याचा हेतू सफल झाला नाही!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ब्रम्हा, विष्णू आणि महेश. या त्रिमूर्तींना या सृष्टीचे कर्ताधर्ता म्हटले जाते. आपल्याकडे ह्या तिघांची आराधना मोठ्या प्रमाणावर होते. ब्रह्मा चं एकच मंदिर असलं तरी विष्णू आणि शंकराची मंदिरं देशभर विखुरलेली आहेत.

InMarathi Android App

विष्णूची पूजा तर विविध प्रकारे – विडाच रूपांत केली जाते. विष्णू अवतारांमुळे विष्णू आराधना देखील बहुआयामी झाली आहे! भगवान शंकराचं मात्र तसं नाही!

 

shankar-marathipizza
guruprasad.net

शंकराची पूजा करायची झाल्यास बहुतेकवेळा त्यांच्या पिंडीची म्हणजेच शिवलिंगाची पूजा केली जाते. महादेवाच्या कितीतरी मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्तीऐवजी शिवलिंगाची पूजा केली जाते. हिंदूंच्या मनामध्ये त्यांना एक वेगळे स्थान आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शिवलिंगाबद्दल सांगणार आहोत, ज्याची पूजा फक्त हिंदूच नाही, तर मुस्लिम धर्मातील लोक देखील करतात. हे ऐकून तुम्हाला थोडे आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे.

 

Jharkhandi shivling.Inmarathi
patrika.com

 

गोरखपूर पासून २५ किलोमीटर लांब खजनी शहराच्या जवळ एक ‘सरया तिवारी’ नावाचे गाव आहे. येथे महादेवाचे एक शिवलिंग प्रस्थापित आहे. ज्याला झारखंडी शिव म्हटले जाते. येथे असे मानले जाते की,  हे शिवलिंग शेकडो वर्षापूर्वीचे आहे आणि हे शिवलिंग स्वतः प्रकट झाले आहे. हे शिवलिंग हिंदूंच्या बरोबरच मुस्लिम धर्मातील लोकांसाठी देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

 

शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार जेवढा हिंदूंना आहे, तेवढाच मुस्लिम धर्मातील लोकांना आहे, कारण या शिवलिंगावर इस्लामचा एक कलमा (पवित्र वाक्य) कोरलेले आहे.

महमूद गजनवीने केला होता याला तोडण्याचा प्रयत्न 

लोकांच्या म्हणण्यानुसार, महमूद गजनवीने याला तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्याने यावर उर्दूमध्ये ‘लाइलाहाइल्लललाह मोहम्मदमदुर्र् रसूलुल्लाह’ असे  लिहिले. जेणेकरून हिंदू या शिवलिंगाची पूजा करणार नाहीत. पण तेव्हापासून आतापर्यंत या शिवलिंगाचे महत्त्व वाढत गेले आणि आता दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये येथे हजारो भक्तांद्वारे या शिवलिंगाची पूजा करण्यात येते.

आज हे मंदिर धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण बनलेले आहे, कारण हिंदूंच्या बरोबरच रमजानमध्ये मुस्लिम बांधव देखील येथे येऊन अल्लाहची इबादत करतात.

 

Jharkhandi shivling.Inmarathi1
dainiksaveratimes.com

 

स्वयंभू आहे शिवलिंग 

असे म्हटले जाते कि, हे एक स्वयंभू (स्वतः तयार झालेले) शिवलिंग आहे. एवढे विशाल स्वयंभू शिवलिंग  संपूर्ण भारतामध्ये फक्त येथेच आहे. भगवान शंकरांच्या या मंदिरामध्ये जो भक्त येऊन श्रद्धेने देवाची पूजा करतो आणि आपली इच्छा देवापुढे मांडतो. त्या इच्छेला भगवान शंकर नक्की पूर्ण करतात.

 

Jharkhandi shivling.Inmarathi2
ajabgjab.com

 

येथील पोखरेमध्ये स्नान केल्यास बरा होतो त्वचारोग 

या मंदिराचे पुजारी आनंद तिवारी, शहरातील काझी वलीउल्लाह आणि श्रध्दाळू  जे.पी पांडे यांच्यानुसार, या मंदिरावर कितीतरी प्रयत्नांनंतर देखील कधीही छत लागू शकले नाही. या मंदिरातील भगवान शंकर खुल्या आकाशाखाली राहतात. अशी मान्यता आहे की, या मंदिराच्या बाजूला असलेल्या पोखऱ्याच्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे एक कुष्ठरोगाने पीडीत असलेला राजा चांगला झाला होता.

तेव्हापासून आपल्या त्वचेच्या रोगापासून मुक्त होण्यासाठी येथे लोक पाच मंगळवार आणि रविवार स्नान करतात आणि आपल्या त्वचेच्या रोगापासून मुक्त होतात.

 

Jharkhandi shivling.Inmarathi3
namanbharat.net

 

असे हे सर्वात वेगळे असलेले शिवलिंगाचे मंदिर त्याच्या या विशिष्ट वैशिट्यांमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. खूप दूरवरून भाविक खास या मंदिराला भेट देण्यासाठी येतात आणि भगवान शंकराची येथे येऊन मनोभावे पूजा करतात.

विशेष गोष्ट ही की शिवलिंगाची प्रतारणा करण्यासाठी महमूद गझनवीने त्यावर कलमा कोरला. पण महादेवाची लीला अगाध! त्याच शिवलिंगासमोर आज हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिमसुद्धा नतमस्तक होतात…!!!

हर हर महादेव!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *