एक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सहसा ट्रेनकडे आपण एक प्रवासाचं साधन म्हणूनच पाहतो. पण तो प्रवास सुखकर, आरामदायी असावा अशी देखील आपली अपेक्षा असते. सध्याची आपल्या देशातील रेल्वेची अवस्था पाहता अगदी फारच कमी रेल्वे प्रवासांमध्ये आपल्या मनाप्रमाणे प्रवास घडतो. असो, पण रेल्वेने लक्झरी प्रवास करण्याची मजाच काही और असते. तुमच्यापैकी देखिल अनेक जणांच स्वप्न असेल लक्झरी रेल्वेने प्रवास करण्याचं, जसं कि भारतात महाराजा एक्सप्रेस म्हणून आहे, आशिया खंडातील सर्वात महागडी आणि लक्झरीयस रेल्वे म्हणून तिचा नावलौकिक आहे. तुम्ही देखील ह्या ट्रेनबद्दल ऐकून असाल आणि विचार करत असाल कि एकदा तरी ह्याने प्रवास करायचा. तर मंडळी आज आम्ही तुमच्यासाठी अश्याच एका ट्रेनबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत, हि ट्रेन पाहिल्यावर तुम्ही म्हणाला महाराजा एक्सप्रेस बरोबर स्वप्नांच्या यादीमध्ये ह्या ट्रेनचंही नाव जोडावं.

जेव्हा कधी हाय स्पीड ट्रेनची चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम जपानचे नाव समोर येते. मात्र, जपानने आता स्पीडचा रोमांचला आणखी शानदार बनवले आहे. होय, जपान ईस्ट रेल्वेची पहिली लग्झरी बुलेट ट्रेन ट्रॅकवर उतरवली गेली आहे. या ट्रेनमध्ये इतक्या फॅसिलिटीज आहेत की, त्यातून प्रवास करणा-या पॅंसेंजर्सला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसल्याचे फिलिंग देते. 2 मजली इमारतीच्या या ट्रेनमधील अलिशान सुएटमधून यात्रा करण्यासाठी तिकीट दर १०,००० डॉलर म्हणजेच ६ लाख ४३ हजार रुपये इतके आहे.

train-suite-shikishima-marathipizza01
jrailpass.com

शिकी-शिमा नावाची ही दोन मजली ट्रेन टोकियोतून रवाना होऊन होक्काइदो आयलँडवर पोहचते.  ह्या दरम्यान ट्रेन सुमारे ३ हजार किमी अंतर कापते. ट्रेन पहिल्या दिवशी टोकियातून हकीनोह, दुस-या दिवशी नारु ते ऑनसेन, तिस-या दिवशी इकिनोसेकी आणि चौथ्या दिवशी होक्काइदो आयलँडवर पोहचते.


train-suite-shikishima-marathipizza02
popsugar-assets.com

ट्रायल दरम्यान तिचा वेग हळू हळू वाढविण्यात आला होता. त्यामुळे टोकिया ते यूजावा पर्यंत येण्या-जाण्याला दोन दिवस व दोन रात्री लागल्या. ट्रेनच्या प्रवासासाठी मार्चपासूनच बुकिंग सुरु झाले होते आणि संपूर्ण ट्रेन पुढील ८ महिन्यांसाठी बुक झाली होती हे विशेष!

train-suite-shikishima-marathipizza03
cdn.cnn.com

ह्या ट्रेनमध्ये १७ गेस्ट कंपार्टमेंट्स आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये फक्त दोन प्रवासी बसू शकतात.  प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बेडरूमसह दोन एयरकंडीशन्ड बाथरूम सुद्धा आहेत. दोन मजली ट्रेनमध्ये हॉटेल, रेस्टांरंट, स्पा, डान्स क्लब आणि जीम फॅसिलटीने लैस आहे.  पॅसेंजर्ससाठी त्यांच्या मनपसंतीचे जेवण खाण्यापासून ते महागडी दारूची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

train-suite-shikishima-marathipizza04
railwaygazette.com

पॅसेंजर्सचा खाण्या-पिण्याचा आणि सर्व फॅसिलिटीचा चार्ज ट्रेनच्या तिकीटातच सामील केला आहे. यासोबतच या ट्रेनमध्ये पॅंसेंजर्सच्या एंटरटेनमेंटसाठी खास व्यवस्था केली गेली आहे. ट्रेनमध्ये पॅंसेंजर्ससाठी एक हायटेक हॉस्पिटलची फॅसिलिटी आहे. ट्रेनमध्ये ऑटोमोबाइल एक्सपर्ट्सने पोर्शे, फेरासी, मेसेराटी कारच्या मॉडेलच्या धर्तीवर डिझाईन केले आहे.

train-suite-shikishima-marathipizza05
cntraveler.com

ह्यातून प्रवास करायला कोणाला नाही आवडणार…फक्त तिकीट परवडली पाहिजे…नाही का?

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *