शरद पवारांची १० वक्तव्यं: त्यांच्यातील ‘चाणक्य’ दर्शविणारी व आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महाराष्ट्रातील सर्वात सिद्धहस्त राजकारणी म्हणून शरद पवार यांना आपण सगळेच ओळखतो. आजवर अनेक विरोध पक्षातल्या राजकारण्यांनी, राजकीय विश्लेषकांनी, समर्थकांनी त्यांचे वर्णन “तेल लावलेला पैलवान” असे केले आहे.

 

sharad pawar marathipizza
indianexpress.com

पवार साहेबांच्या डोक्यात काय योजना असतात हे साक्षात ब्रह्मदेवालाही ठाऊक नसते असं गमतीने म्हणतात. तेही खरेच आहे म्हणा!

शरद पवारांच्या राजकीय खेळी, त्यांची मुत्सद्देगिरी तीन चार दशके महाराष्ट्र पाहत आला आहे. एखाद्या विषयावर त्यांची भूमिका किती ‘पोलिटिकली’ करेक्ट असते हेही आपल्याला माहित आहे.

मुरब्बी आणि कसलेल्या राजकारणी होण्यासाठी आवश्यक असणारे सगे गुण पवार साहेबांच्या अंगी आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

पवार साहेबांच्या याच भूमिका वेळोवेळी कशा बदलत गेल्या हे दाखवणारे काही बातम्यांचे फोटोज आम्ही वाचकाबरोबर शेअर करत आहोत, जे पहिले की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही.

१. ब्राह्मण, मुस्लिम, जैनांनाही आरक्षण?

 

pawar1-inmarathi
maharashtratimes.indiatimes.com

बेरजेचे राजकारण कसे करावे हे शरद पवार सोडून दुसरं कुणी जाणतं का?

तुम्हीच पहा ना, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठल्याच सामाजाला दुखवायचं नाही म्हणून सर्वोपकारी धोरण अवलंबत सगळ्याच समाजांना आरक्षण द्या असं म्हणताय पवार साहेब!

म्हणजे फक्त मराठ्यांनाच नाही तर ब्राह्मणः ५.५ टक्के, जैन, मुस्लिमः १०.५ टक्के इतके आरक्षण. असं झाल्यास महाराष्ट्रात एकूण ८० टक्के होणार आहे.

पण थांबा – हे पहा –

२. जातीवर आरक्षण नको

 

pawa4-inmarathi

थांबा थांबा, गोंधळात पडू नका! हेही वक्तव्य पवार साहेबांचंच आहे. तेही राज ठाकरे यांनी पुण्यात मोकळ्या मैदानावर त्यांची सुपरहिट मुलाखत घेतलेली तेव्हाचं आहे.

काय? दोन वेगवेगळ्या भूमिका कशा म्हणताय?

सांगितलं ना,

“पवार साहेबांच्या मनात जे चालू असतं ते खुद्द ब्रह्मदेवही जाणू शकत नाही.

३. देशाला आता रामायण महाभारताची गरज नाही!

 

pawar2-inmarathi

 

सरसंघचालक मोहन भागवतांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पवार साहेब काय म्हणतात पहा.. “रामायण महाभारताची देशाला काहीही गरज नाही!” तरी बरं, राष्ट्रवादीचे अपत्य असलेली संभाजी ब्रिगेड रामायण महाभारताचे संदर्भ घेऊनच द्वेषाची पेरणी करत असतात!

“ए कोण आहे रे तिकडे? कोण म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊनी रामायण महाभारतातल्याच गोष्टी सांगितल्या म्हणून? असं काही बोलायचं नाही. शांत बसा बरं!! शांत अगदी!!”

४. शरद पवार करणार ईद-ए-मिलादच्या मिरवणूकीचे नेतृत्व

 

pawa2-inmarathi
maharashtratimes.indiatimes.com

खरंय बरं का हे!

रामायण महाभारतासारखे भारतीय धर्मग्रंथ आता निरुपयोगी झाले आहेत, पण चौदाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम धर्माची आणि त्याच्या धर्मग्रंथात सांगितलेल्या सर्व प्रथांचा मान राखला गेलाच पाहिजे!

नाही का? मग? येताय ना मिरवणुकीला?

५. तिहेरी तलाक हा कुराणाचा आदेश

 

pawar2-inmarathi
deccanmirror.in

एकदा ईद ए मिलाद च्या मिरवणुकीचे नेतृत्व स्वीकारले ना, मग धड घेतले तर शेपूट कशाला सोडायचे?! म्हणून तिहेरी तालाकलाही मान्यता देऊन टाका.

“काय म्हणालात, शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी परंपरा वगैरे? काहीही बोलू नका हो!”

६. अजून पाच वर्षे देशात मोदी सरकारच असावे

 

pawar5-inmarathi

 

आता गुजरातचा शिष्य थेट बारामतीत येऊन पवार साहेबांचे राजकीय शिष्यत्व बिनशर्त मान्य करतो म्हटल्यावर आणखी काय अपेक्षित आहे नाही का?

“पवार साहेब माझे राजकीय गुरु आहेत” असे मोदींनी म्हटले, आणि आपल्या शिष्याच्या प्रेमाला जगात पवार साहेबांनीही देशात प्ध्चे पाच वर्ष तरी मोदींचेच सरकार असावे अशी इच्छाही जाहीर करून टाकली!

आहे की नाही असामान्य शिष्यप्रेम?!

७. एकत्र या, भाजप नावाची आपत्ती घालवली पाहिजे!

 

pawar2-inmarathi
tv9marathi.com

 

“ओह वेट! वरची बातमी काहीतरी वेगळीच होती का? असेल बुवा. आपल्याला काय?!”

“पण वरती तर मोदी सरकार अजून पाच वर्ष तरी टिकायला हवं म्हणतायेत ना साहेब?”

“याचं उत्तर दिलंय ना वरतीच! पवार साहेबांच्या मनात काय चाललंय हे खुद्द ब्रह्मदेवही जाणू शकलेला नाही.”

८. ‘भीमा कोरेगाव’ दंगलीमागे पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना; पवारांचा हल्लाबोल!

 

pawar1-inmarathi

भीमा कोरेगावचा हिंसाचार ही सरत्या वर्षातली महाराष्ट्राने अनुभवलेली सर्वात गंभीर आणि दुर्दैवी घटना. पवार साहेब या बातीत प्रतिक्रिया देताना काय म्हणतात पहा,

“भीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही हिदुंत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन तीन-चार दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगत आहेत.”

 

pawar1-inmarathi

आपल्या भूमिकेबाबत पवार साहेब इथे पुरेसे स्पष्ट दिसत आहेत. भीमा कोरेगाव दंगलीत हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे असे त्यांचे मत आहे. हरकत नाही.

पण – हे काय –

९. भीमा-कोरेगाव हिंसाचाराला कोणतीही संघटना जबाबदार नाही; पवारांचे घुमजाव

 

pawar1-inmarathi

 

आता ही भूमिका घेताना नक्की काय विचार केला असेल बर साहेबांनी? आणि असंही नाही की हे कुठल्याश्या वृत्तवाहिनीशी बोलताना दिलेलं मत आहे.

महाराष्ट्र सरकारने भीमा कोरेगाव संदर्भात जी अधिकृत समिती स्थापन केली त्या समितीसमोर बोलताना शरद पवार हे म्हटले आहेत.

यावरून वाचकांनी काय तो निष्कर्ष काढावा!

शेवटी या आधुनिक चाणक्याच्या राजकारणावर कमेंट करणारे आपण कोण पामर, नाही का?!

१०. राष्ट्रवादीच्या तिजोरीत खडखडाट!

 

pawar1-inmarathi

 

लावासा, सिंचन घोटाळा.. वगैरे वगैरे. असं हसायचं नाही ह गालातल्या गालात. तुम्हाला ना, पवार साहेबांच्या संघर्षाची जाणच नाही बघा!

ही झाली पवार साहेबांच्या असामान्य चाणक्यनीतीची काही उदाहरणे.

खरंतर ही एवढीच नाहीत. पवार साहेबांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीची अशी अगणित उदाहरणे देता येतील. सुज्ञ वाचकांच्या ती ध्यानातही असतील.

पण साहेबांंच्या चाणक्यनीतीला मर्यादा नसल्या तरी आमच्या लेखणीला आहेत!

म्हणून थांबतो!

(आमचे मित्र पियुष कश्यप, ह्यांनी हे सर्व फोटो फेबुकवर शेअर केले, आणि आम्हाला हा लेख लिहिण्यास प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे आभार!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “शरद पवारांची १० वक्तव्यं: त्यांच्यातील ‘चाणक्य’ दर्शविणारी व आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवणारी!

  • December 5, 2018 at 8:58 pm
    Permalink

    राजकारणातिल आदर्श

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?