“सेक्स विथ स्ट्रेन्जर” : अनोळखी व्यक्ती बरोबर केलेला संभोग “लाभदायक” असतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतात प्रणय – रोमान्स की गोष्टच भयंकर “टॅबू”. इतकी की जन्मजन्मांतरींचे सोबती असणाऱ्या नवरा बायकोसुद्धा चोरून, लपून एकमेकांना मिठी मारतात, हात हातात घेतात.

साध्या प्रणयाची ही कथा. मग संभोगाचं काय विचारता!

 

one night stant sunny leone inmarathi

मोठ्या शहरांमध्ये खुराड्यागत असणाऱ्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील जोडप्याचं सेक्स लाईफ अतिशय कठीण असतं.

जमेल तेव्हा, शक्य होईल तसं “उरकून” घेण्याचं प्रकरण असतं. मग मैथुनातील आनंद, त्यातील उत्कटता अनुभवणार कशी?!

ही भारताची वस्तुस्थिती आहे. कामसूत्र आणि वात्सायनाच्या देशाचं हे आजचं वास्तव आहे.


 

The arab country sex culture.Inmarathi3
cloudfront.net

लग्न झालेल्या जोडप्यांचं हे वास्तव. लग्न नं झालेल्यांचं काय…! आणि ते जर अनोळखी असतील तर…!

काय विचार करेल आपला समाज?!

पण विज्ञान काय म्हणतं ह्याबद्दल…?!

‘अनोळखी व्यक्तीसोबत केलेला संभोग अधिक आनंददायक असतो’ असा निष्कर्ष काढणारा एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. Archives of Sexual Behavior ह्यांनी केलेल्या प्रयोग व अभ्यासावर नजर टाकल्यास आपल्याला वाटेल की, अनोळखी व्यक्तींबरोबरचा संभोग “लज्जास्पद” वाटू नयेच –


उलट त्यातून होणारे लाभ आपण समजून घ्यायला हवेत!

अर्थातच हे संशोधन भारतीय भूमीवर झालेले नाही. अन अनोळखी व्यक्ती सोबत सेक्स अथवा संभोगाची शक्यताच ती किती?

असा विचार करतो तोच लक्षात आलं ते म्हणजे ऑनलाइन/ब्लाइंड डेटिंग साईट्सची आपल्याकडे वाढत असलेली प्रसिद्धी.

तरुण वर्गात ह्या साईट्स भलत्याच लोकप्रिय ठरताहेत. टिंडर सारखे अँप्स यावर महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या उड्या पडताहेत.

भारतासारख्या देशात सेक्स या विषयावर बोलणं देखील वर्ज्य असताना आपल्या भावनांना अशा प्रकारे तरुण वाट मोकळी करून व्यक्त होऊ देत असतील तर यात चुकीचं ते काय?

 

indian-couple-marathipizza02
ak3.picdn.net

आधी आपण हे संशोधन काय म्हणते ते पाहूया.

काही शेकड्यात महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रश्न विचारून आणि मानसशास्त्रीय अभ्यासातून हे संशोधन या निष्कर्षावर आले आहे की,

जेव्हा एखादी व्यक्ती (स्त्री अथवा पुरुष) अनोळखी व्यक्ती सोबत संभोग करते त्या वेळी ती अधिक आनंदी असते.

याची कारणे देताना ते म्हणतात –

जेव्हा संभोगादरम्यान दोन्ही व्यक्ती अनोळखी असतात तेंव्हा त्यांना “आपण समोरच्या व्यक्तीचे पूर्ण समाधान करू शकलो नाही तर”, “आपल्या पूर्ण क्षमता वापरू शकलो नाही तर” अशा प्रकारचे एक दडपण असत नाही.

पण सोबतची व्यक्ती ओळखीची असेल, तर हे दडपण अगदी सहज, नकळतपणे येतेच.


शिवाय, अनोळखी व्यक्तीबरोबर संभोगाच्या वेगवेगळ्या पद्धती देखील अनुभवू शकता येते.

जर समोरच्या व्यक्ती चे पूर्ण समाधान झाले नाही, तर त्याचा न्यूनगंड बाळगायची गरज उरत नाही.

कारण या व्यक्तीला तुम्ही ओळखत नसता आणि पुन्हा भेटण्याची शक्यता देखील जवळजवळ नसतेच.

बऱ्याचदा ओळखीच्या व्यक्ती किंवा पती/पत्नी सोबत संभोग करताना पूर्वग्रह अथवा एकमेकांबद्दल असलेल्या समाजातून व आपली आहे ती प्रतिमा टिकवण्यासाठी नवीन काही प्रयोग करण्याचे टाळले जाते. आपल्याला नेमके काय हवे हे सांगितले जात नाही. अशावेळी मनाची कुचंबना देखील होऊ शकते.

 

indian-couple-marathipizza00
scoopwhoop.com

प्रेम व्यक्त करण्याच्या माध्यमावर अशाप्रकारे बंधने येऊन त्यातील सुख हरवून बसण्याची शक्यता असते.

अनोळखी व्यक्ती सोबत संभोग करताना “त्या व्यक्तीला काय वाटेल”, “तिला हे आवडेल की नाही”, “ती व्यक्ती काय म्हणेल” हा विचार मनात येत नाही. 

त्या ऐवजी स्वतः अधिकाधिक शरीर सुख उपभोगणे – दृष्टीने अशा संबंधाकडे दोन्ही व्यक्तींकडून पाहिले जाते, असे हे संशोधन म्हणते.

शिवाय दोन्ही व्यक्ती आपापल्या इच्छेने एकत्र येत असल्याने कुणावरही जबरदस्ती होण्याचा प्रश्न येत नाही.

हे झाले संशोधनाबद्दल.


परंतु भारतीय समाजाच्या दृष्टीने विचार करता अनोळखी व्यक्ती सोबत संभोग ही गोष्ट एका वेगळ्याच मुद्द्यावर येऊन थांबते.

पाश्चात्य देशात आणि भारतीय देशातील मूल्यव्यवस्थेत मूलतः काही फरक आहेत. विवाहपूर्व संबंध आणि विवाह बाह्य संबंध यांना समाजाच्या लेखी चुकीचे समजले जाते.

विवाह बाह्य संबंध स्वीकारणारे अथवा विवाह पूर्व संबंध स्वीकारणारे किती पती पत्नी अथवा पालक आपल्याकडे आहेत?

 

couple-sex-inmarathi
theindianexpress.com

मुळात भारतीय समाजमन अनेकांशी शारीरिक संबंध स्वीकारेल का? शिवाय यातील क्लिष्टता आणखी वेगळी उरते. समजा अशा अनोळखी व्यक्तींमध्ये संभोगानंतर प्रेम उत्पन्न झाले तर?

शारीरसंबंधाकडे तटस्थपणे पाहण्याची दृष्टी दोघांतील एकालाही नसेल तरी जो गोंधळ उडेल तो साधा असणार नाही. या संशोधनात हे गृहीत आहे की त्या व्यक्ती परत कधीच भेटणार नाही आहेत, पण हे कितपत शक्य आहे?

अशी व्यक्ती पुन्हा समोर आलीच तर भूतकाळातील प्रसंगाची आठवण त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाही कशावरून?

अन याहून कठीण म्हणजे, आधी आलेल्या संबंधाची वाच्यता करेन म्हणून जर ब्लॅकमेल करणे सुरू झाले तर दुसऱ्या व्यक्तीला सामोरे जाव्या लागणाऱ्या परिस्थितीबद्दल नकोच बोलायला.

 

couple-arguing-inmarathi
dawn.com

शिवाय जोपर्यंत तुम्ही फक्त शरीरसुख म्हणून या कडे पाहता तोपर्यंत सगळं ठीक आहे नाहीतर, होणाऱ्या भावनिक गुंतागुंतीने तुमची डोकेदुखी आणखी वाढेल असही हे संशोधन सांगतं.

समोरची व्यक्तीही फक्त मजा म्हणून या एकवेळच्या संबंधाकडे पाहत असेल तर ठीक आहे पण त्याहून जास्तीची अपेक्षा तुमची डोकेदुखी बनू शकते. तेंव्हा जरा जपून.

फक्त भरतापूरता विचार केला तर, भारतात जिथे ‘लिव्ह-इन’चा स्वीकार व्हायला एवढा विरोध होतो, तिथे विवाह पूर्व किंवा विवाहबाह्य अशा एका वेळे पुरत्या संबंधाला समाज मान्य करेल अशी शक्यता देखील दिसत नाही.


शिवाय त्यातुन उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबी आणखी वेगळ्या असतील.

 

couple-fight_inmarathi
antekante.com

या प्रकारच्या संबंधांना नेमकं कोणत्या प्रकारात टाकायचं हा प्रश्न देखिल उपस्थित होईल. नवीन विचाराच्या पिढीला हे ‘माय बॉडी माय चॉईस’ च्या धर्तीवर अगदी मनमोकळा कारभार असेल पण समाज अशा बदलांना सहजी स्वीकारत नाही.

त्यामुळे असे संबंध लपवून ठेवण्यातच व्यक्तीच हित आहे.

आणि मजा किंवा बदल म्हणून करायला गेलेल्या गोष्टीतून आनंद मिळणे दूर ती गोष्ट लपवण्यातच ऊर्जा खर्च व्हायची.

अन अशा अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता देखील आहेच, तेंव्हा ऐकायला लक्ष्यवेधी वाटत असली तरी अशी ‘वन नाईट स्टँड’ गोष्ट भारतासारख्या देशात कितपत व्यवहार्य आहे हे ज्याने त्याने ठरवावे.


पण जर असा प्रसंग आलाच तर ‘प्रोटेक्शन’ आठवणीने (वापरायला) विसरू नका.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?