स्त्रियांची “एकांतातील सुखप्राप्ती” – सेक्सकडे पहाण्याचा “असाही” दृष्टिकोन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


सेक्स किंवा प्रणय ही फक्त एक शारीरिक गरज आहे, हा निव्वळ गैरसमज आहे. ती एक मानसिक गरज देखील असते. लोकांना हा गैरसमज कसा होतो माहित नाही पण तिला फक्त शारीरिक गरज म्हणणाऱ्यांनी कदाचित प्रणयातील सर्व सुख अनुभवले नसावे.

प्रणयातील सुख मिळविण्यासाठीच रस्ता हा दुहेरी असतो, त्यात स्त्री-पुरुष या दोन व्यक्तिरेखा असल्याचं पाहिजेत असेही काही नाही.

 

sex-inmarathi
onlymyhealth.com

मैथुन हा असा एक प्रकार आहे जो एका व्यक्तीला फक्त स्वतःच्या सहवासात देखील हा आनंद मिळवून देतो.

यातही पुरुष आणि मैथुन सर्वश्रुत आहे पण स्त्री देखील या गोष्टी करू शकते आणि स्वतः सोबत काही ‘क्वालिटी’ टाइम घालवून एक अतिशय नितळ आनंद, सुख मिळवू शकते हे बऱ्याच जणींना माहित नाही.

आपण तरी या बाबतीत मागे राहून कधीच चालणार नाही कारण ‘कामसूत्र’ आपल्या पूर्वजांनी लिहिले आहे.

यातील कल्पनांचा विकास येथूनच झाला, त्यामुळे असलेल्या गैरसमजातून मोकळे होऊन प्रणयाकडे वेगळ्या आणि सुधारित दृष्टिकोनातून पहिले पाहिजे.

“प्रणय आणि स्त्री-सुख”

 

Sex-inmarathi
greatist.com

पुरुष आणि स्त्री यांमधील प्रणयसुख कोण जास्ती उपभोगतात असा प्रश्न कोणी केला तर साहजिक उत्तर मिळते ते म्हणजे ‘पुरुष’.


पुरुषांना तर असेच वाटतही असावे पण बऱ्याच स्त्रियांना देखील असेच वाटते हि एक निराशेची बाब आहे, स्त्रियांना हे माहित असू नये कि यातून सुख कसे मिळवता येऊ शकते.

फक्त पुरुष यातून समाधान मिळवू शकतात हा एक भाबडा समज आहे असे म्हणावे लागेल कारण प्रणयास “रती”सुख असेही म्हणतात.

प्रणयात मदन-रती (पुरुष-स्त्री) समान प्रमाणात सुखी होऊ शकतात. स्त्री हादेखील एक महत्वाचा घटक यात असतो. बऱ्याच वेळा हे सत्य दुर्लक्षित केले जाते तर काही ठिकाणी इतका विचार कोणी केलेलाच नसतो.

 

sex and women-inmarathi
everydayhealth.com

स्त्री यातून एक अव्यक्त सुख मिळवू शकते जे तिला योग्य प्रकारे प्रणय किंवा मैथुन केल्यावर मिळू शकते. स्त्रियांसाठी हे आरोग्यदायी ठरू शकते कारण ‘हार्मोनल इम्बॅलन्स’ हा प्रकार बऱ्याचदा दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतो.

जुन्या चित्रपटांमध्ये दाखवत असत की नायक किंवा एखादा पती आपल्या पत्नी कडे दुर्लक्ष करत असेल. पण ती त्या कामुक भावनांच्या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला थंड पाणी डोक्यावर घेताना वगैरे दाखवले जाते.

हो! बऱ्याचवेळा सुखाचा तो बिंदू ना गाठल्याने अशी अवस्था होऊ शकते की स्त्रीशरीर व मन त्यासाठी तळमळत राहते.

पण तिला हेच माहित नसते कि काही अंशी आपण देखील आपले सुख मिळविण्यास समर्थ आहोत. या गोष्टी दुर्लक्षिल्या जातात हा दिव्याखालचा अंधार आपण समोर आणूया..

“काय असतो सुखाचा परमोच्च बिंदू?”

 

sex and women-inmarathi01
lovesuccessfully.com

स्त्री लहान लहान गोष्टीत सुख मिळवू शकते असे असले तरी काही ठिकाणी काही विषयांमधये स्त्रिया सुख मिळविण्यास असमर्थ ठरतात. प्रणय ही त्यातील एक गोष्ट. प्रणयात बऱ्याचवेळा स्त्रिया मन मारतात असे दिसून येते, त्यामागे बरीच करणे असू शकतात.

सेक्स बद्दलचे अपुरे ज्ञान, अपुरी वेळ ,निरुत्साही साथीदार, आरोग्यविषयक तक्रारी, प्रणयातील नाविन्यता, धावपळ किंवा मूड नसताना सेक्स करणे इत्यादी..

पण जेंव्हा दोघेही अगदी पुरेपूर आनंद मिळवत असतील तेंव्हा एक वेळ अशी येते की स्त्री आणि पुरुष दोघेही त्या सुखाच्या परमोच्च बिंदूजवळ पोहोचलेले असतात.

ज्याला ऑरग्याझ्म म्हटले जाते.

ज्याने त्यांना त्या प्राण्यातील सर्व सुख व समाधान उपभोगता येते. तिथे त्यावेळच्या प्रणयाची सांगता होते.

बऱ्याच स्त्रिया अजूनही यापर्यंत पोहोचत नाहीत. पण या बिंदू पर्यंत पोहोचणे सोपे होऊ शकते.

“सुखापर्यंत पोहोचण्याचे काही मार्ग”

 

sex and women-inmarathi02
huffingtonpost.com

स्त्री ही सुखाच्या परमोच्च बिंदूजवळ पोहोचू शकत नसेल त्यामागे दोष फक्त स्त्रीचा नसतो, कदाचित तो साथीदाराचाही असू शकतो. प्रणयात स्वार्थ साधून चालत नाही, इथे विचार दोघांचाही केला पाहिजे पण कोणी साथीदार असो व नसो त्या बिंदू पर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग स्त्री कडे असतो तो म्हणजे हस्तमैथुन.

स्त्री एकटी असताना किंवा कोणी प्रणय साथीदार सोबत असताना देखील, हा प्रकार अवलंबता येतो. ज्यामुळे ती त्या बिंदू पर्यंत पोहोचू शकते. ऑरग्याझ्म ही वयात आलेल्या प्रत्येक स्त्री ची एक शारीरिक आणि मानसिक गरज असते, जी भागवली जाण्याचा मार्ग सापडणे आवश्यक असतं.

हस्तमैथुन हा त्यातल्या त्यात त्यांसाठी सोपा मार्ग ठरू शकतो.

ही एक नैसर्गिक क्रिया आहे आहे. लैंगिक शिक्षण किंवा मोठ्या व्यक्तींकडून आपणास ते माहित होतेच, पण बऱ्याचवेळा ते नैसर्गिकरित्या मुलामुलींना समजते. यात काही गैर नाही. कुतूहलापोटी चुकीच्या मार्गी लागण्यापेक्षा आपल्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधणे केंव्हाही चांगले, काय म्हणता?

“ऑरग्याझ्म आणि एकांत”

 

sex and women-inmarathi03
glamour.com

एखादी स्त्री जेंव्हा एकांतात असते तेंव्हा ती अगदी सुरक्षित असते असे म्हणतात. ती स्वतःबद्दल जास्ती विचार करते, शरीराचा-मनाचा-सुखाचा आणि हि वेळ तो सुखाचा मार्ग चालण्यास अगदी योग्य ठरते.

स्वतः एकांतात वेळ घालविल्याने स्त्री खूप आनंद आणि समाधान मिळवू शकते कधी कधी ते तिने तिच्या जोडीदारासोबतही मिळवले नसेल इतके असते.

कारण एकांतात ती हवा तितका वेळ यासाठी वापरू शकते जे बऱ्याचवेळा प्रणयात जोडीदाराकडून मिळवता येत नसते. एका सर्वेनुसार स्त्रिया एकांतात जास्ती सुख मिळवू शकतात असे निदर्शनात आले आहे.

यात मनमर्जी चालते म्हणून असावे पण बेस्ट ऑरग्याझ्म हा एकांतच मिळवून देऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे देखील म्हणणे आहे.

ऑरग्याझ्म मिळविणाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात कारण प्रत्येकाचा ‘कंफर्ट झोन’ हा वेगवेगळा असतो.. स्त्री नक्कीच आपला आनंद यासोबत शोधू शकते.

यातून कसल्याच वाईट शक्यता देखील नाहीत फक्त काही पॅरामिटर्स जपले गेले पाहिजेत.

 

lust stories sex masturbation women

स्वतःचा विचार करणं किंवा ऑरग्याझ्म बद्दल विचार करणं यात काही अतिशयोक्ती नाही फक्त एक मानसिक आनंद म्हणून त्याकडे पहिले तरी न्यूनगंड येणार नाही.

शेवटी काय.. भले यातही आहेच..

“स्वार्थ पहा… स्वत्व जपा.. आनंद मिळवा”


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?