“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” : हा समज खरा की खोटा? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


हिवाळा आला की सोबत गुलाबी थंडी, शेकोटी, पानगळ तर आणतोच पण सोबत वातावरणात एक रोमँटिकपणा आणत असतो.

ह्या रोमँटिकपणातून “कामोत्तेजना” तर होतेच होते. गुलाबी थंडीत एकमेकांना बिलगून एकमेकांची ऊब अनुभवायची असते. ह्यातून प्रणय घडतो. इतर कोणत्याही ऋतुपेक्षा हिवाळ्यात प्रणय होण्याचे प्रमाण अधिक असते. पण असं का असतं?

हिवाळा म्हणजे एकमेकांसोबत बिछान्यावर एकत्र खेळ खेळणे, एकमेकांना गोंजारणे, एकमेकांना बिलगून असणे. एका ब्लॅंकेटच्या मध्ये एकमेकांसोबत सहवासात असणे ह्या सर्व गोष्टी हिवाळ्यात घडत असतात.

 

what women wants after sex-inmarathi12
the-conscious-mind.com

हिवाळ्यात स्त्री पुरुष एकमेकांच्या अधिक जवळ येत असतात. हिवाळा ह्यामुळे रोमँटिकच ठरत नाहीतर समागम होण्यासाठी एक उत्तम काळ ठरतो.

“माणसाची सेक्स ड्राईव्ह हिवाळ्यात खूप जास्त असते” हा समज खरा आहे का? काय आहेत त्यामागची कारणे? वाचा..

१. शरीराची उष्णतेची गरज पूर्ण होते

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रणय करत असता, तेव्हा तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या शरीरातील ऊर्जा निर्मिती वाढते. त्यामुळे शरीराची उष्णता वाढत जाते.


 

ice-cubes-an-oral-sex-inmarathi
www.santuario-gesubambino.org

ह्या उष्णतेमुळे ऊब तर येते पण एकमेकांची संगत जास्त प्रिय वाटू लागते. ह्यामुळे ती ऊब अनुभवण्यासाठी बऱ्याचदा हिवाळ्यात मोठया प्रमाणावर प्रणय घडतो. उष्णतेची आणि कामानंदाची ह्या दोन्ही गरजा याने पूर्ण होतात.

२. तुम्ही प्रणयक्रीडेला अधिक काळ देऊ शकतात

उन्हाळ्यात प्रणय करताना बाहेरील वातावरणाचा परिणाम होत असतो. उष्णतेमुळे अधिक थकवा येत असतो. तसेच घामामुळे अंगाला चिकटपणा येत असतो. ह्यांमुळे प्रणय करताना प्रणयक्रीडा लवकर आटोपण्यावर भर दिला जातो. त्यामुळे प्रणय हा निरस होत असतो.

पण हिवाळ्यात मात्र उलट असतं.

एकमेकांची उब अनुभवणं जास्त गरजेचं बनते. त्यामुळे प्रणय क्रीडा ही अधिक खुलते, त्यामुळे प्रणय अधिक वेळ चालतो. त्यावर एकमेकांना जेवढा वेळ बिलगून राहता येईल तितका वेळ राहण्याचा अट्टहास असतो.

 

what women wants after sex-inmarathi10
newsweek.pl

३. एकमेकांना गोंजरण्यात अधिक मजा वाढते.

गोंजारणे ही खरंतर प्रणय झाल्यानंतर करण्यात येणारी क्रीडा आहे. त्यात एकमेकांना बिलगून पडून राहणे, केसात हात फिरवणे, चुंबन घेणे सारख्या गोष्टी होत असतात.

उन्हाळ्यात मुळात प्रणयानंतर ह्या गोष्टी शक्यतो होत नाहीत. ह्याचं कारण आहे दोन्ही एकदम थकलेले असतात, अंगाला घाम सुटलेला असतो. एकमेकांच्या जास्त जवळ झोपू शकत नाही.

पण हिवाळ्यात याउलट असतं, तुम्ही एकमेकांना बिलगून जास्त काळ राहता. प्रणयानंतरही तुम्ही एकमेकांना बिलगलेले असतात.

एकमेकांच्या शरीरातील ऊर्जा खेळवत राहण्यासाठी एकमेकांना चिटकून असता. एकमेकांना गोंजरण्यात तुम्ही संपूर्ण रात्र घालवू शकता. एकमेकांना बिलगून झोपू शकतात.

 

what women wants after sex-inmarathi
in.news.yahoo.com

४. तुमच्या शरीरात आनंद देणारे हार्मोन्सचा वावर वाढू लागतो

हिवाळा हा तुम्हाला आनंदी राहण्यासाठी बेस्ट कारण राहू शकतो.

हिवाळ्यात थंडीमुळे तुमच्या बॉडीत व्हिटॅमिन डी ची कमतरता ह्या दिवसात जाणवत असते. ह्या कमतरतेमुळे तुम्ही अगदी चादरीचे थर जरी अंगावर घेतले तरी तुम्हाला झोप लागणार नाही. पण ह्यावर सर्वोत्तम उपाय कोणता असेल तर तो आहे “सेक्स” !

हो. प्रणय करताना तुमच्या बॉडीत वेगवेगळे हार्मोन्स उत्सर्जित होत असतात. जे तुमच्या बॉडीतील हाडांच्या वेदना क्षमन करतात. ज्यामुळे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा त्रास जाणवत नाही.

ऑक्सिटोसिन आणि एंडोट्रोपीन हे त्या हार्मोन्सचे नाव आहे. तज्ञ डॉक्टरांचा मते गोंजारताना, प्रणय क्रीडा करताना व प्रत्यक्ष प्रणयादरम्यान शरीरात ह्या हार्मोन्सचा फ्लो खूप जास्त असतो.

 

foreplay-in-sex-inmarathi
herintalk.com

ह्यामुळे शरीर उष्ण तर राहतं सोबत व्यक्ती आनंदी राहू शकते. ह्याचा चांगला परिणाम रोग प्रतिकार क्षमतेवर पण होत असतो.

५. स्त्रियांना सॉक्स घालून प्रणय केल्यावर ऑर्गाजम येतो

तुम्ही जर तुमच्या हाता पायातील ग्लोव्हज आणि सॉक्स घालून प्रणय कराल तर तो तुम्हाला जास्त आनंद देईल!

ऐकायला विचित्र वाटेल पण २०१३ साली नेदरलँडच्या ग्रोनियन विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार त्यात भाग घेतलेल्या ८०% महिलांना त्यांच्या पार्टनर सोबत सॉक्स व गरम कपडे हातात पायात घालून प्रणय करतांना जबरदस्त मजा येत होती.

५०% महिलांच्या मताप्रमाणे ते परिधान नाही केले तरी हरकत नाही पण केले तर मजा वेगळी असते!

 

what women wants after sex-inmarathi01
freepik.com

याचा सरळ अर्थ निघतो की सॉक्स घातल्याने महिलाना ऑर्गाजम येतो. ह्याचं कारण काय आहे याचा शोध अद्याप वैज्ञानिक लावत आहेत.

६. हिवाळ्यात प्रणय केल्याने बाळाचा जन्म हा वर्षाच्या एका चांगल्या महिन्यात होतो

जर एखाद्या स्त्री पुरुषाने नोव्हेंबर डिसेंम्बर ह्या काळात प्रणय केला तर त्या जोडप्याला होणारा पुत्र हा जून व त्याचा पुढच्या महिन्यात जन्माला येतो.

त्या काळात जन्माला येणाऱ्या मुलाला भरण पोषणासाठी योग्य वातावरण असलेला पावसाळा हा ऋतू तर भेटतो. सोबतच त्यांच्या मुलाला शाळेत दाखला भरण्याचा वेळी येणारी वयाची अडचण पण उरत नाही !!!!

 


what women wants after sex-inmarathi03
ourmomentoftruth.com

त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या महिन्यात सेक्स करणं हे सर्वच बाबतीत चांगलं ठरत असतं. अगदी पारिवारिक दृष्ट्या देखील चांगलं ठरत असतं.

७. आजारी पडण्याचा धोका कमी होतो

२००४ साली विलकीस विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हिवाळ्यात घडणाऱ्या सततच्या प्रणयाने इम्युनोग्लोबलीन A , ह्या प्रतिजैविकाच शरिरातील प्रमाण वाढीस लागतं आणि ह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वधारते.

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असते अश्या वेळी हिवाळ्यात केलेला प्रणय हा वरदान ठरत असतो.

 

couple-sex-inmarathi
theindianexpress.com

अश्याप्रकारे ह्या हिवाळ्यात आपल्या पार्टनर सोबत प्रणयाचा आनंद घ्यायला विसरु नका. कारण त्याचे खूप सारे शारीरिक, मानसिक आणि पारिवारिक फायदे आहेत.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?