हिऱ्याने बनलेला ग्रह ते सूर्याच्या १५ पट मोठा तारा : अवकाशातील ७ अचाट शोध

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अंतराळातील अनेक ज्ञात आणि अज्ञात गोष्टींनी माणसाला सुरवातीपासून कोड्यात टाकले आहे. विश्वाच्या अनंततेचा आणि अथांगत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न माणूस कित्येक पिढ्यांपासून करतो आहे. त्याच्या असामान्य बुद्धीच्या आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बळावर माणसाने अंतराळातील कित्येक अज्ञात गोष्टींचा शोध लावला. त्याची करणे शोधून काढली. तरी अजून कितीतरी प्रश्नांचा उलगडा व्हायचा बाकी आहे.

 

amazing-space-inmarathi
universe-beauty.com

काळाच्या असीम पटलावर कुठेतरी विश्वाचा जो उदय झाला, त्याची कारणे काय होती आणि त्याचा अस्त कधी आणि केव्हा होणार या बाबतीत तर पूर्ण माहिती कित्येक वर्ष शोध घेऊन अजून मिळालेली नाही. पण अशा काही आश्चर्यजनक आणि बुचकळ्यात टाकण्याऱ्या गोष्टी आहेत ज्यांचा शोध माणसाने लावला.

एखाद्या गोष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशाने काम करत असताना वेगळ्याच पण कितीतरी रोमांचकारक गोष्टींचा शोध शास्त्रज्ञांना लागला. त्या गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.

१. हिऱ्यापासून बनलेला ग्रह.

हा विनोद नाही! PSR J1719-1438 b किंवा पल्सर प्लॅनेट या नावाने ओळखला जाणारा एक ग्रह चक्क हिऱ्याचा बनलेला आहे. क्रिस्टल कार्बन हा पदार्थ आपण पाहतो त्या हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. २०११ साली या ग्रहाचा शोध लागला.

 

diamond-planet-inmarathi
youtube.com

शास्त्रज्ञाच्या मते. हा ग्रह म्हणजे आधी एक तारा होता. ताऱ्याचे संपूर्ण विघटन झाल्यानंतर त्याचा ग्रह बनला.

२. शीत तारा (कोल्ड स्टार)

अनेक विज्ञानपटात आपण पाहिलंय, की अंतराळवीर अंतराळात जाताना तिथल्या परिस्थितीला अनुसरून योग्य ती साधनसामग्री, कपडे, खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टी सोबत घेउन जातात. कारण पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातली नैसर्गिक परिस्थिती माणसाला तग धरण्यासाठी अवघड असते.

 

cold-star-inmarathi
ssl.com

पण शास्त्रज्ञांना अशा एका ग्रहाचा शोध लागलाय ज्याच्या पृष्ठभागावर सरासरी २७ टक्के साधारण तापमान असते. म्हणजे पृथ्वीवरच्या एका सामान्य दिवसाप्रमाणे. अर्थात या ग्रहावर तुम्ही फक्त खाण्याचे पदार्थ आणि पाणी घेऊन कुठल्याच साधनसामग्रीविना जाऊ शकता. काय म्हणता?

३. सूर्याचा पितृतारा (Sun’s Dad)

सूर्य हा अस्तित्वात असणाऱ्या तार्यांपैकी सर्वात मोठा तारा आहे हे आपण शिकलो आहोत. पण शाळेत शिकवली जाणारी ही गोष्ट आता कालबाह्य असणार आहे. सूर्यापेक्षा १५०० पट मोठ्या असणाऱ्या ताऱ्याचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे.

 

pulsar-companion-star-inmarathi
solarsystemdigest.com

सुर्याबाबत आपल्याला मिळालेली माहिती अद्याप मर्यादित आहे. अजून कित्येक गोष्टी जाणून घ्यायच्या बाकी आहेत. पण त्या शोधताना सापडलेल्या तार्याच्या अस्तित्वाने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे.

४. गॅर्गन्टॉन ब्लॉब

ब्लॉब म्हणजे काय असते ते आधी समजून घेऊ. थेंबाच्या किंवा बुडबुड्याच्या स्वरूपात घट्ट द्रवाचा अवाढव्य आकाराचा पुंजका म्हणजे ब्लॉब. टेलिस्कोपच्या सहाय्याने अवकाशाचे निरीक्षण करत असताना शास्त्रज्ञांना एक ब्लॉब दिसला.

 

blob-inmarathi
youtube.com

त्यावर संशोधन केले असता तो तब्बल २०० दशलक्ष प्रकाशवर्षे जुना असल्याचा स्फोटक निष्कर्ष समोर आला. हे माणसाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते. या ब्लॉबचा जन्म आणि मानवजातीचा पृथ्वीवर येण्याचा काल एकाच असल्याचे तज्ञ म्हणतात.

५. बाहेरच्या विश्वातील वीज

आपण पृथ्वीवरून विजा चमकल्याचे पाहतो. पण या विजा वेगळ्या आहेत. वीज असणारे इतर अनेक ग्रह अवकाशात अस्तित्वात आहेत. आणि या ग्रहांवरील वीज आपल्या परिमाणात मोजायची झाली तर ती आहे तब्बल ५० लाख फुक्टन.

 

outer-space-light-inmarathi
rvcj.com

म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मिल्की वे आकाशगंगे पेक्षा साधारण दीडपट मोठ्या आकाराच्या विजेच्या गोळ्याची कल्पना करा. गॅलेक्सी 3C303 च्या जवळ ही इतकी वीज असल्याचे निराक्षणात आढळून आले आहे.

६. पाण्याने भरलेला अवाढव्य ढग

पृथ्वीबाहेरच्या अवकाशात प्रचंड प्रमाणात पाणी असल्याचे शास्त्रज्ञांच्या पाहण्यात आले आहे. ज्याला ‘स्पेस क्लाउड’ असे नाव देण्यात आले. महत्वाचं म्हणजे सूर्यापेक्षा अंदाजे एक लाख पट मोठा असलेला पाण्याचा हा स्त्रोत अंतराळात नुसता फिरतो आहे.

 

rainy-cloud-inmarathi
regmedia.co.uk

ब्लॅक होल (हॉकिंगने शोध लावलेलं नव्हे) मधून उत्सर्जित होत असलेल्या पाण्याच्या वाफेतून या स्त्रोताची निर्मिती झाली असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

७. पृथ्वीसारखा दुसरा ग्रह.

पृथ्वीसारखी भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण असणारा आणि पृथ्वीपासून २१ प्रकाशवर्षे दूर असणारा एक ग्रह शास्त्रज्ञांना सापडला आहे. HD2191344b असे नाव देण्यात आलेला हा ग्रह २०१५ साली सापडला.

 

earth-like-planet-inmarathi
youtube.com

पण २१ प्रकाशवर्षे हे अंतरच एवढे आहे की माणूस या ग्रहापर्यंत एका आयुष्यात पोहोचू शकत नाही.

अवकाशाचा अभ्यास करत असताना लागलेले हे शोध साधारण नाहीत. मानवी कल्पनाशक्तीच्या बाहेरचे हे शोध आहेत. त्यामुळे या गोष्टींनी शास्त्रज्ञांनाही चक्रावून टाकले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?