' धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे दुर्लक्ष न करता या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री जगा – InMarathi

धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे दुर्लक्ष न करता या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री जगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“फक्त दहावी/बारावी/ग्रॅज्युएशन होऊ दे, मग बघ लाईफ सेट आहे…!” लाईफ सेट तर झाली पण त्यासोबत दगदगीचे जीवन बोनस म्हणून मिळाले. झोपा-उठा-काम करा-परत झोपा.!

२४ तासात या व्यतिरिक्त क्वचित काही तरी वेगळं होत असेल. सुट्टीचा दिवस असेल तर त्यातला अर्धा दिवस तर झोपण्यात जातो. हे आहे सामान्य चाकरमानी जणांचं डेली रुटीन.!

 

stress inmarathi

 

पैसा आजच्या युगात एक महत्त्वाचं एकक बनलं आहे. तोच पैसा कमावण्यासाठी आज प्रत्येक जण तंगडतोड मेहनत करताना दिसतो, त्याच मेहनतीमध्ये आपण स्वतःला विसरून जातो.

अविश्रांत मेहनतीमुळे आपण मधुमेह, उच्च रक्तदाबाला निमंत्रण पाठवतो. सततच्या मोबाईल/लॅपटॉप-कम्प्युटरच्या वापरामुळे डोळ्याचे आजार होतात. ऑफिस जॉबमुळे पाठीच्या मणक्याचे आजार, त्यात भर म्हणजे अपूर्ण झोप.असे नानाविध प्रकार सध्या या रेसमध्ये धावणाऱ्या प्रत्येकाच्या प्रोफाइल मध्ये दिसून येईल.!

मग या धकाधकीमध्ये स्वतःला वेळ द्यायचा तरी कसा?  वेळ काढून करायचं तरी काय? तर चला पाहूया, काही लहानसहान गोष्टी ज्याच्यामुळे रोजच्या धावपळीतदेखील आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या फिट ठेऊ शकतो.!

 

१. दिवसाची सुरुवात मेडिटेशनने (चिंतनाने) करा..!

 

meditation inmarathi

 

याचा फायदा असा की, दिवसभरात आपल्याला काय करायचं आहे याचं एक सामान्य टाईमटेबल तयार होतं. त्यानुसार, महत्वाची कामं ही टॉपला यायला सुरुवात होईल आणि लिस्ट कामं शेवटी ठेवता येतील.

आपोआप तुमच्या शेड्युलमध्ये तशी रचना लागून काम पूर्णत्वास जाण्यास मदत होईल.!

 

२. व्यायाम आणि योग

 

exercises Inmarathi
GoMama247

 

सकाळी उठून १०-१५ मिनिटं शरीरासाठी देण्यास काहीच हरकत नसावी…! “निरोगी शरीरात निरोगी मन वास करते..” उगाच नाही म्हणत असे.

व्यायामामुळे रक्ताभिसरण संस्था ऍक्टिव्ह राहतात आणि स्नायूंचे कार्य फ्लो मध्ये व्यवस्थित चालू राहते. रक्ताभिसरण संस्थेचा थेट संपर्क हृदय आणि मेंदुशी असल्याने दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते.

 

३. व्यायामाच्या वेळेस संगीताचा वापर

 

music-stress-reliever-inmarathi01
quora.com

 

शारीरिक हालचाली सुरू असताना मेंदू सुद्धा त्यात व्यस्त होऊन जातो, पण मेंदू हा तेवढ्या कामासाठी आपला काहीच भाग वापरत असतो. मल्टी टास्किंग हा मेंदूच्या व्यायामासाठी उत्तम.

व्यायाम करते वेळेस गाणी ऐकल्यावर श्रवण प्रक्रिया आणि शरीराचा व्यायाम यामध्ये मेंदू समप्रमाणात सहभागी होतो. एकूणच मेंदू जेवढा कार्यरत राहील तेवढं आपली शरीर सुद्धा त्याला पॅरलल काम करत राहतं.

 

४. स्वतःचं वेळापत्रक तयार करा.

 

planning Sequence InMarathi

 

जसं वर सांगितलं की, चिंतन करतेवेळेस आपलं एक साधं वेळापत्रक तयार होतं तर सेम त्याच वेळापत्रकानुसार काम करायला सुरवात करा. त्यानुसार कोणतंही काम स्कीप न करता ठरलेल्या रुटीन मध्ये आपली काम पूर्ण होत जातील.

सो, अर्धवट कामं राहणार नाहीत आणि त्याचा उगाचचं प्रेशर सुद्धा..!

 

५. खेळण्यासाठी वेळ द्या

 

mumbai pune mumbai inmarathi
imdb

 

आजकाल कार्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना वेळ घालवायला कॅरम, टेबलटेनिस आणि बुद्धिबळ याची सोया केलेली असते. त्याचा पुरेपूर वापर करा…!

काही ठिकाणी तर आउटडोअर गेम्सची पण व्यवस्था केलेली असते. कामाव्यतिरिक्त खेळात डोकं लावल्यावर कामाचा ताण सुद्धा कमी होईल आणि मन सुद्धा रमेल.

 

६. वाचन

 

Reading-inmarathi
pexels.com

 

 

पुस्तकाला माणसाचा खरा मित्र म्हणतात. एकटेपणा घालवण्यासाठीचा उत्तम मार्ग… ! मोठमोठ्या कादंबऱ्याचं वाचल्या पाहिजेत अशातला भाग नाही. हलकं-फुलक सवडीत वाचता येईल अशी पुस्तक कॅरी करण्यात काहीच हरकत नाही.

आजच्या डिजिटल युगात नंबर ऑफ पुस्तकांच्या पीडीएफ उपलब्ध आहेत. वाचनाने जो मानसिक ताण निर्माण झाला आहे तो घालवण्यासाठी खूप मदत होते…!

 

७. जुने मित्र-नातेवाईक यांच्याशी भेटीगाठी

 

friends inmarathi
awara diaries

 

स्ट्रेस रिलीजसाठी सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे मित्र. एक स्पोर्टिव्ह सिस्टम म्हणून मैत्री आयुष्यात कार्यरत असते. कितीही व्यस्त असाल तरी दिवसातून एकदा कोणत्या तरी मित्राला फोन करा. पूर्ण दिवस हसतखेळत जाईल.

सुट्टीच्या दिवशी भेटीचे प्लॅन बनवून आयुष्यात रंग भरायला काहीच हरकत नाही…!

 

८. काम न करण्याची एक स्पेसिफिक वेळ

 

me time inmarathi

 

कामावर लक्ष केंद्रित करणे हे स्वतःची काळजी न घेण्याचे उत्तम कारण आहे. दिवसातून एक वेळ अशी फिक्स करा की त्यावेळेत तुम्ही तुमच्या कंपनी एल्स कामाबद्दल काही बोलणार/करणार नाही. 

उदाहरणार्थ, सकाळी कुटुंबासोबत नाश्त्याच्या टेबलवर किंवा रात्री जेवतांना तुम्ही तो पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला द्याल. त्यावेळेस काम हे सेकेंडरी ठेवा. खूप रिलीफ मिळेल. ट्राय करून बघा.

 

९. लिहायला शिका

 

diarywriting
WriteDiary.com

 

आता लिहायला कोणाला येत नाही, पण लिहिणं म्हणजे कविता,कथा,शायरी किंवा तत्सम जोक.!

आजकल तर मिम्सचा जमाना आहे. जरा सिली पॉईंट वाटेल पण दुनियेकडे बघायचा आपला दृष्टिकोन यामुळे बदलतो..! साधा एक फॉर्व्हरडेड मीम आलं की आपण सगळं विसरून त्यावर हसतो.

लिहिण्याने स्वतःचे बंद झालेले, न उघडलेले दरवाजे ओपन होण्यास मदत होते. सुप्त गुण जर बाहेर आले तर  नवीन छंद जोपासण्यास कोणाला नाही आवडणार? अगदीच काही नाही तर रोजनिशी लिहा.

 

१०. आहार योग्य आणि वेळेत घ्या

balanced diet inmarathi
firstcry parenting

 

सकाळचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे वेळेवर आणि प्रमाणात घ्या. दुपारी सगळा ताण बाजूला सारून आहार घ्या. यामध्ये सगळ्या भाज्या, फळं यांचा समावेश असुदया.

योग्य मानसिकतेत घेतलेला आहार हा शरीराला हव्या तेवढ्या प्रमाणात एनर्जी आपोआप पुरवतो. 

 

११. टेक्नॉलॉजीशी थोडा दुरावा ठेवा

 

no mobile inmarathi
newslaundry

 

वर सांगितल्याप्रमाणे काम न करण्याच्या वेळेस मोबाईल, इंटरनेट यापासून स्वतःला थोडं अलिप्त ठेवा. मेल, व्हाट्सअँप याला रिप्लाय द्यायचाचं आहे, पण थोड्या वेळेसाठी ते लांब ठेवण्यास काय हरकत आहे?

अर्धा स्ट्रेस आपोआप तिथेच निघून जाईल.

 

१२. निसर्गाशी जवळीक साधा

 

andharban-jungle-trek-inmarathi
adventures365.in

 

सकाळी व्यायाम गार्डनमध्ये करा. जॉगिंग असेल किंवा योगा जे काही. सकाळच्या ताज्या हवेत निसर्गाच्या सानिध्यात जा.  विकेंडला ट्रेक, जंगल सफारी करण्यात काहीच हरकत नाही.

मित्रांसोबत नाईटआऊट चे प्लॅन तसे होतंच असतात. असाच एखादा निसर्गाच्या सानिध्यात जाणारा प्लॅन बनवा. रोजच्या दगदगीतुन नक्कीच बाहेर पडण्यास मदत होईल. 

 

१३. लास्ट बट नॉट लिस्ट, पुरेशी झोप

 

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

 

सगळे घोडे अडले आहेत ते इथे. झोपेचा खेळखंडोबा झाला की पूर्ण दिवस कसा जाणार हे वेगळं सांगायला नको. कमीतकमी ६-७ तास झोप तर हवीच..! त्याशिवाय शरीराचा मेंटेनन्स आणि बॅलन्स हा व्यवस्थित राहणार नाही.

वरच्या सगळ्या मुद्द्यांची अंमलबजावणी झाली तर रात्री परफेक्ट झोप येणार म्हणजे येणार.

तर, या छोट्या छोट्या गोष्टी नित्यनेमाने पाळून आपण आपल्या मानसिक सोबत शारीरिक अवस्था व्यवस्थित ठेऊन आपलं रेग्युलर रुटीन नक्की पार पाडू शकतो. ते ही विदाऊट एनी एक्स्ट्रा लोड.!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?