एक असा चमचा ज्यातून अन्न बाहेर पडत नाही; दुर्बल व्यक्तींसाठी अनोखं वरदान !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
तंत्रज्ञानाने मानवाला अनेक उपयुक्त गोष्टी दिल्या आहेत, ज्यामुळे माणसाचं जीवन बऱ्यापैकी सहज आणि सुलभ झालं आहे. आजही असे अनेक नवनवीन शोध लागतच आहेत आणि मनुष्य जीवन अधिक समृद्ध होत आहे. असाच एक शोध लावला आहे लिफ्टवेयर नावाच्या कंपनीने! या कंपनीने शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी एक असा चमचा बनवला आहे ज्यातून अन्न खाताना अन्न बाहेर पडत नाही.
शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला किंवा म्हाताऱ्या माणसांना स्वत:च्या थरथरणाऱ्या हाताने अन्न खाताना भयंकर त्रास सहन करावा लागतो. चमच्याने अन्न खाताना वारंवार ते खाली सांडत, त्यामुळे अन्न तर वाया जातंच, सोबतच अन्न खायचा कंटाळा देखील येतो. हीच समस्या लक्षात घेऊन लिफ्टवेयर कंपनीने त्यासंबधी संशोधन सुरु केले आणि एका अनोख्या चमच्याचा शोध लावला.
कंपनीने हा चमचा अश्या प्रकारे बनवला आहे की ज्यामुळे हा चमचा व्यक्तीच्या हालचालीनुसार अॅडजस्ट करत चमच्यातील अन्न खाली पडू न देता थेट व्यक्तीच्या तोंडापर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. या उपकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक मोशन स्टेबलाईजिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे आणि जरी एखाद्या व्यक्तीचे हात थरथरत असतील तरी चमच्यातील अन्नाला खाली पडू देत नाहीत. त्यामुळे चमच्याने अन्न खाताना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
अश्याप्रकारे हा आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण चमचा शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे.
कंपनीने रिलीज केलेला या चमच्याची संकल्पना स्पष्ट करणारा हा विडीयो नक्की पहा
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.