पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आजवरचे सर्वात व्यस्त पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. रोज १८ तास काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी हे बिरूद मिळवले आहे.

InMarathi Android App

१७ सप्टेंबर रोजी मोदिजींनी ६६ व्या वर्षांत पदार्पण केले. उतारवयात सर्वसामान्यपणे व्यक्तीची काम-कष्ट करण्याची शक्ती कमी होते. परंतु नरेंद्र मोदी आजही पंचविशीतल्या तरुणासारखे अगदी उत्साहात देश सांभाळताना दिसतात.

स्रोत

नं थकता, अविरत काम करण्याच्या त्यांच्या जोशपूर्ण व्यक्तिमत्वाचे गुपित मात्र फारच कमी लोकांना ठावूक आहे. नुकतीच मिडीयाला प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदींनी स्वत:हून सांगितले की त्यांच्या या सुदृढ आरोग्यामागे ‘माकरुलाचा’ हात आहे.

हिमाचल मध्ये आढळणारे ‘माकरुला’ हा मशरूमचा प्रकार आहे.

भरपूर औषधी गुण असणाऱ्या या मशरूमचे नरेंद्र मोदी नं चुकता सेवन करतात.

 

narendra-modi-health-marathipizza01

स्रोत

नरेंद्र मोदींचा आहार शुद्ध सात्विक आणि शाकाहारी आहे. एकदा हिमाचल प्रदेशाला भेट दिली असताना त्यांच्या खाण्यात हे मशरूम आलं आणि मोदीजी या मशरूमचे फॅन झाले.

पुढे आरोग्यासाठी त्याचा असणारा बहुमुल्य उपयोग ऐकल्यानंतर त्यांनी रोज हे मशरूम खाण्याची सवय लावून घेतली.

 

narendra-modi-health-marathipizza03

स्रोत

या मशरूमची खास गोष्ट ही आहे की हे दुर्मिळ असून सहसा उपलब्ध होत नाही.

हे मशरूम मिळवण्यासाठी स्थानिकांना खूप कसरत करावी लागते. हिमाचलचे लोक व्यापाऱ्यांना हे मशरूम प्रति किलो ८ ते १० हजार रुपयांना विकतात.

हे व्यापारी त्यावर आवश्यक प्रक्रिया करून बाजारात प्रति किलो २५ ते ३० हजार रुपयांना विकतात.

‘माकरुला’  मशरूम सहसा फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आढळून येते.

 

narendra-modi-health-marathipizza04

स्रोत

‘माकरुला’ मशरूम शरीर संतुलित ठेवण्यास मदत करते आणि मोदींच्या उत्साहामागे माकरूलाचा हात आहे ही बातमी पसरल्यापासून ‘माकरुला’ चा बोलबाला प्रचंड वाढलाय म्हणे!

===

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 69 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *