' काही व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतात….! जाणून घ्या, त्यांच्या पर्सनॅलिटीचं सिक्रेट – InMarathi

काही व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतात….! जाणून घ्या, त्यांच्या पर्सनॅलिटीचं सिक्रेट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काही व्यक्तिमत्व ही खरंच खूप आकर्षक असतात. त्यांचं दिसणं, वागणं, बोलणं, चालणं हे सगळंच खूप खूप प्रभावी असतं. कधीकधी आपल्याला वाटतं की ही तर त्यांना मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. त्यांच्यात उपजतच हे गुणधर्म आले असावेत.

आपण पाहिलं तर प्रेसिडेंट केनडी, प्रिंसेस डायना यांची नावं मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी अजूनही चर्चेत आहेत. ते स्वतःच्या अस्तित्वाने आसपासचं जग भारावून टाकतात, पण त्यांच्याकडे अशी कोणती जादू असते की ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे जातं?

 

om shanti om inmarathi

 

चला तर मग पाहूया त्यांची काही वैशिष्ट्ये:

इतरांशी बोलताना ते प्रचंड आत्मविश्वासाने बोलतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहताच एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते.

दुसरं म्हणजे ते खूप चांगले कथाकार असतात. म्हणजे कुठलाही प्रसंग मस्त रंगवून सांगतात. त्यांच्या आयुष्यात घडलेला एखादा छोटासा प्रसंगही ते फार रंगवून रंगवून सांगतात.

त्यामुळे समोरचे लोक त्यांचं बोलणं मन लावून ऐकत राहतात. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ही त्यांची एक हातोटी आहे.

लोकांशी बोलताना ते अगदी ममत्वाने किंवा आपलेपणाने बोलतात. त्यांची अशी सहानुभूती दाखवणं लोकांना आकर्षित करतं.

ते दुसऱ्यांशी बोलताना नेहमी समोरच्याच्या (आय कॉन्टॅक्ट) नजरेला नजर देऊन बोलतात. त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. ते लोकांना आपलंसं करतात.

 

eye contact 1 inmarathi
bollycurry

 

आणखी एक त्यांच्यात गुण असतो तो म्हणजे दुसर्‍याचं म्हणणं ते लक्ष देऊन ऐकतात आणि काही वाटलं तर लगेच छान बोलून कौतुक करतात.

उत्तम बोलणं जसा एक महत्त्वाचा गुण आहे, तसंच लक्षपूर्वक ऐकणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे समोरच्या लोकांशी connect व्हायला मदत होते.

लोकांशी बोलताना ते आपली विनोदबुद्धी जागृत ठेवून बोलतात. त्यामुळे संभाषणात एक प्रकारचा मोकळेपणा येतो. हजरजबाबीपणा हा एक त्यांचा मोठा गुण असतो.

 

rang de basanti 1 inmarathi
hindustan times

 

अगदी कोणताही प्रसंग आला तरी असे लोक त्यातली पॉझिटिव्ह किंवा चांगल्या गोष्टी शोधतात. कधीही निगेटिव्ह बोलणं किंवा विचार करणं टाळतात, त्यामुळे ते अधिकच प्रभावी वाटतात.

हे लोक प्रचंड आशावादी असतात. कधीही दुसऱ्यांना दुखवत नाहीत, पण एखाद्या बिघडलेल्या गोष्टीतून चांगलं कसं काढायचं हे त्यांना जमतं.

या लोकांचा स्वतःवर प्रचंड विश्वास असतो, आनंदी राहण्याचा स्वभाव असतो आणि त्यामुळेच यांचे व्यक्तिमत्त्व खुलून येतं.

आपल्याला वाटतं की, या लोकांकडे सगळंच कसं पॉझिटिव्ह आहे? पण यांनी आपल्या सर्व कमकुवत गोष्टी झाकलेल्या असतात. काही गोष्टी स्वतःहून develop केलेल्या असतात.

जाणीवपूर्वक प्रयत्न करून अशा गोष्टी शिकता येतात. आजकाल personality development चे क्लासेस आहेत. त्यात अशा काही गोष्टी शिकवल्या जातात.

 

vicky kaushal inmarathi
deccan chronicle

 

केवळ नैसर्गिक किंवा तुमच्या बाह्यरूपावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून नसतं, तर तुमच्या अंतर्मनातून तुम्ही कसे वागताय, बोलताय याचाही खूप परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो.

म्हणजेच सगळ्यांकडेच बाह्यरूप नसलं तरी त्याला अधिक आकर्षक करणे मात्र आपल्या हातात आहे. त्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत.

आयुष्य हे नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आहे इतकं लक्षात ठेवलं म्हणजे बास. कारण त्यातूनच आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं.

सकारात्मक दृष्टिकोन, समाजात वावरण्याची आवड, सर्वांशी बोलण्याची आवड त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याला उत्तर शोधण्याची आवड यामुळे आपलं व्यक्तिमत्व आणखीन खुलून येतं.

आपण पाहतोच की सिनेस्टार, बॉलीवूड अभिनेते, नटनट्या यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाला लोक भूलतात. अगदी शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्या घराच्या समोर लोक त्यांची एक झलक दिसावी म्हणून कितीतरी वेळ उभे असतात.

 

Shah-Rukh-Khan
Finance Buddha

 

काही काही जण तर त्यांच्यासारखं दिसण्यासाठी त्यांची स्टाईल कॉपी करतात. म्हणजे त्यांच्यासारखे कपडे, हेअरकट अशा गोष्टी करतात. स्टार लोकांशिवायही अशी काही व्यक्तिमत्त्व आहेत की ज्यांच्या कार्याने संपूर्ण समाजाला प्रभावित केलं आहे.

भारतातच बघायचं झालं तर आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एक आकर्षक व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांनी पण आपली एक स्टाईल निर्माण केली होती…नेहरू शर्ट आणि त्यावर गुलाबाच फुल ही तेव्हाच क्रेझ होती.

 

Jawaharlal-Nehru inmarathi
wefornews,.com

 

इंदिरा गांधी पण एक आकर्षक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व्यक्ती होत्या. धडाकेबाज निर्णय, उत्तम वक्तृत्व शैली यामुळे त्याकाळात त्यांचा खूप प्रभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कुर्ता खूप फेमस झाला आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पण एक स्टाईल आपण पाहिली आहे. हातात रुद्राक्षाची माळ घालून ते भाषण द्यायचे आणि ते ऐकण्यासाठी लाखोंचा समुदाय जमा व्हायचा.

 

balasaheb-thakrey-inmarathi
anielpezarkar.wordpress.com

 

 

मध्ये क्रिकेटपटू धोनी सारखी hairstyle ठेवायची फॅशन आली होती. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

कुणाला आवडणार नाही चांगलं राहणं, प्रसिद्ध होणं? पण दुसऱ्याची कॉपी करून काहीच फायदा नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचं अस्तित्व काहीच उरत नाही.

त्यापेक्षा आपण स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करणे केव्हाही चांगलं. उगीच विवेकानंदांसारखे कपडे घातले आणि फिरलं तर कोणी विवेकानंद होणार नाही. त्यासाठी त्यांच्याइतकं वाचन, लेखन, विचार आणि भाषण प्रभावी असायला हवं.

 

 

म्हणून आपण आपली स्टाईल शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपल्याला काय चांगलं दिसेल आणि ज्यामध्ये आपण कंफर्ट फील करू असेच कपडे घालून तशा प्रकारचा व्यवसाय आपण निवडला पाहिजे.

जे काम करतोय ते मनापासून करायचं. मनात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मात्र ठेवायचा नाही.

मी हे करू शकेन का? मला हे जमेल का? असा विचार करायचा नाही. नेहमी सकारात्मक विचार आणि वागणं आचरणात आणायचं. तुमच्या मनात कितीही खळबळ असली तरी ती बाहेर दिसू द्यायची नाही.

 

alia bhatt 3 inmarathi

 

विनाकारण चिडचिड करून, राग व्यक्त करून तसा काही उपयोग होत नाही. म्हणूनच बाहेर दिसायला आपण जर शांत आणि हसतमुख दिसलो तर तो एक आपला प्लस पॉइंट ठरतो.

एखाद्याची कोणती गोष्ट नाही आवडली तर सौम्य शब्दात ती सांगता यायला हवी. समोरच्याच्या भावना न दुखवता हे करता यायला हवे.

नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि मुख्य म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची. आपण मनातून जितके आनंदी राहू तितके ते आपल्या चेहऱ्यावर दिसते आणि एक आकर्षक व्यक्ती होण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?