शिवापूरच्या दर्ग्यातला बोटांनी दगड उचलण्याचा प्रकार: चमत्कार नव्हे, भौतिकशास्त्राचा अविष्कार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज जगात अनेक विस्मयकारक कलाकृती आहेत. या भव्य कलाकृतींचा निर्माण हजारो वर्षांपूर्वी करण्यात आला आहे.

या कलाकृतीत इजिप्तचे पिरॅमिड आणि अशी अनेक रहस्यमय ठिकाणं येतात ज्यांच्या रचना आपल्याला अचंबित करून टाकतात.

ज्या काळात गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे माहिती नव्हतं, ज्या काळात मटेरियल फिजिक्स काय होतं माहिती नव्हतं, आजच्या सारखी मॉडर्न मशिनरी नव्हती त्या काळात अश्या अनेक गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे.

परंतु ह्या वस्तूंचं बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्याला त्यामागचं विस्मयकारक विज्ञान समजेल.

भारतात देखील एक अशीच जागा आहे, ती पण आपल्या महाराष्ट्रात, पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड शिवापूर या ठिकाणी आहे.


शिवापुरला हजरत कमार अली दारवेश बाबांचा दर्गा आहे. हा दर्गा खूप वर्ष जुना आहे. हा दर्गा अनेक लोकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे.

 

qamar ali dargah-inmarathi
holidayiq.com

बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी सर्वधर्मांचे अनेक लोक दूरवरून या दर्ग्याला भेट देण्यासाठी येत असतात.

हा दर्गा एक जागृत देवस्थान आहे असं लोक मानतात. इथे जर बाबांकडे समस्येवर समाधान मागितलं तर त्या समस्येचं निराकरण होतं असं म्हणतात.

या बरोबरच दर्ग्यात काही वस्तू अश्या आहेत ज्या या दर्ग्याच्या जागृत अवस्थेचं प्रमाण देत असतात.

दर्ग्यात दोन विचित्र दगड आहेत. त्यातल्या एकाचं वजन ५५ किलो आहे आणि दुसऱ्याच ४१ किलो आहे.

जर अकरा लोकांनी त्यातल्या मोठ्या दगडावर हात ठेवला आणि नऊ लोकांनी लहान दगडावर हात ठेवला व एका विशिष्ट मंत्राचं उच्चारण केलं तर दोन्ही दगडं आश्चर्यकारक रित्या हवेत काही क्षणांसाठी २ मीटर पर्यंत हवेत तरंगू लागतात.

जणू गुरुत्वाकर्षण नसल्याची अनुभूती होते.

ही गोष्ट अनेकदा लोकांनी बघितली आहे. जगभरातील वैज्ञानिक शिवापुरला ह्याच कारणासाठी भेट देत असतात. परंतु अजूनही या आश्चर्यासाठी वैज्ञानिक कारण कोणीही देऊ शकलेलं नाही.

कोणाला माहिती नाही की ते दगडं तिथे कोणी ठेवले आणि अकरा, नऊ लोकच का लागतात हे सुद्धा कळू शकलेले नाही.

शिवापुरमध्येच त्या दर्ग्याच्या उद्यानात एक असाच आश्चर्यकारक दगड आहे. ज्याचं वजन ६२.५ किलो आहे.

सकाळच्या प्रार्थनेवेळी वेळी जेव्हा ११ पुजारी त्या दगडाभोवती रिंगण करून उभे राहतात आणि ज्या बाबाच्या नावाने दर्गा बांधण्यात आला आहे त्याचं नाव घेतात.

जेव्हा ते मंत्रोच्चारादरम्यान थोडा वरचा स्वर लावतात तेव्हा ते पुजारी केवळ एका बोटावर त्या दगडाला उचलू शकतात!

 

qamar ali dargah-inmarathi01
jagran.com

जेव्हा पुजारी आरती थांबवतात आणि मागे सरकतात तेव्हा दगड आपोआप खाली कोसळतो.

हे कसं होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, चला त्याचं उत्तर जाणून घेऊया…

जसं जादूचा प्रयोग हा बघणाऱ्याचा डोळ्यांसोबत केलेला छळ असतो. तसेच याबाबतीत आहे. दर्गा व त्याचा आसपासच्या परिसरात एक मेगालिथिक जनरेटर आहे, जो दर्ग्यातले काही सेवक वापरत असतात.

लोकांचं लक्ष जेव्हा संपूर्णतः त्या दगडाकडे असते तेव्हा त्यांना आसपासच्या कुठल्याच गोष्टींचा भास उरत नाही.

एक असा भ्रम निर्माण केला जातो की गुरुत्वबलंच अस्तित्वात नाही.

 

 

आपण तथ्यावर नजर टाकू, ११ माणसं मोठ्या दगडाला स्पर्श करतात आणि ९ माणसं लहान दगडाला स्पर्श करतात आणि काही जोरजोरात मंत्रोच्चार करतात आणि दगड दोन मीटर पर्यंत हवेत वर उचलला जातो.

जणू ग्रॅव्हिटी अस्तित्वातच नसते.

आजूबाजूच्या वेव्ह एनर्जीचा जेव्हा गुरुत्वीय बलाशी संबंध येतो. तेव्हा रेझोनन्सच्या सिद्धांता नुसार भौतिक रासायनिक गुणधर्म असलेलं O – H ( पाणी) आणि Si-O ( सिलिकॉन) यामुळे दगडात एनर्जीचा संचार होतो.

जेव्हा ९ किंवा ११ अथवा जास्त लोक त्या दगडाला स्पर्श करतात तेव्हा ते त्या दगडातील गुरुत्वीय बलाचा सरळ संबंध एलास्टिक ऐकोस्टिक लहरींशी आणतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा संक्रमण होते.

 

qamar ali dargah-inmarathi02
amazingindiablog.in

मेगालिथिक ऊर्जेची निर्मिती ही पाण्याचा भौतिक रासायनिक गुणधर्मांशी संबंधित आहे. जर प्रत्येक मनुष्याच्या शरीरात 75% पाणी आहे.

तसेच जोरजोरात केलेल्या मंत्रोच्चारांनी एलास्टिक अकॉस्टिक लहरींच्या प्रसाराला चालना मिळते व पाण्याचा तसेच सिलिकॉनच्या भौतिक रासायनिक गुणधर्मांत ट्रान्झिशन स्टेट तयार होते.

यामुळेच दगडाच्या वरच्या सपाट भागाला स्पर्श केल्यावर आणि जोरजोरात मंत्रोच्चार केल्यावर या एलास्टिक अकोस्टिक एनर्जीचं त्या दगडातील संक्रमण वाढतं.

या एनर्जीमुळे Si-O च्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात थोडा बदल होतो आणि त्याचं रूपांतर एका मेगालिथिक जनरेटरमध्ये होतं.

दगडाचा आकार आणि प्रकृती बघून, प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेव्हजची साईज बघितली जाते. एनर्जीच होणारं संक्रमण एक परफेक्ट परस्पर विरोधी फोर्स निर्माण करतं जे एका चुंबकीय बलाच्या निर्मितीसाठी पूरक ठरते.

===

हे पण वाचा :

या गावात मागील ४०० वर्षांपासून एकही बाळाने जन्म घेतला नाही, कारण एक हास्यास्पद अंधश्रद्धा!

ह्या ११ अंधश्रद्धा वाचून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही

===

शिवापुरच्या दर्ग्यात दगडांचं हवेत तरंगण हे एक द्योतक आहे की, प्राचीन काळी लोकांना विज्ञानाची माहिती होती आणि अश्याच मेगालिथिक एनर्जीचा मदतीने पिरॅमिड आणि इतर मोठं मोठल्या वास्तूंची निर्मिती करण्यात आली असावी.

जर तुम्ही कधी शिवापुरला गेलात तर या दर्ग्याला नक्की भेट द्या आणि या वैज्ञानिक चमत्काराची अनुभूती नक्कीच घ्या.

पण हे कटाक्षाने लक्षात घ्या की तिथे दावा केला जातो त्याप्रमाणे हा दगड बोटाने उचाल्ण्यामागे कुठल्या बाबाचा चमत्कार नसून प्रयोगसिद्ध विज्ञान आहे.

भारतात अनेक धार्मिक ठिकाणी तुम्हाला यासारखे अनेक प्रकार दिसून येतील.

 

indian-superstitions-inmarathi
patrika.com

दिव्य शक्तीच्या चमत्कारापासून ते बोटाने उचलणाऱ्या दगडापर्यंत. जिकडे तिकडे चमत्कार. आणि श्रद्धा असणारे भाविक त्यावर भाबडेपणाने विश्वास ठेवतात.

या चमत्कारांच्या मागे कुठल्याही दैवी शक्तीचा प्रताप नसून हे शुध्द विज्ञान आहे हे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगत राहण्याची नितांत गरज आहे.

===

हे पण वाचा :

हसताय ना? हसायलाच पाहिजे ! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १

हिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *