पांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पुस्तकं हे आपले जन्मभराचे सोयरे आहेत. पुस्तक आपल्यासाठी एक ज्ञानाचा खजिनाच नाहीतर आयुष्यातील एक दीपस्तंभ आहे.

 

coffe-book-inmarathi
pinterest.com

पुस्तकं ही पिढ्यान पिढ्या संक्रमित होत असतात. बऱ्याचदा आपल्या आजोबांनी घेतलेल्या पुस्तकांना आपण वाचत असतो.

ती जुनी पुस्तकं, त्यावर ते जुन्या शाईतील प्रिंटिंग, त्यांचा पानांची झालेली झीज, पानांचा पिवळा रंग, हे सर्व बघून आपलं मन त्या पुस्तकाच्या काळात रमत असतं.

पण बऱ्याचदा आपल्या मनात हा विचार येतच असतो की ही पुस्तकं, इतक्या वर्षांपासून आपण हाताळतोय, ती जेव्हा पहिल्यांदा आपण विकत घेतो तेव्हा त्यांची पानं ही शुभ्र असतात.

त्या पुस्तकांना एक वेगळाच वास असतो. जो आपण साठवून ठेवत असतो. पण कालांतराने ही पुस्तकाची पानं पिवळसर होत जातात. त्यांच्यातील सुगंध हरवतो.

जरी आपण ती कितीही काळजीपूर्वक हाताळली तरी देखील असं होतं असतं. पण त्या मागचं कारण काय आहे? का कालांतराने ह्या पुस्तकांना पिवळसर रंग येऊ लागतो?

 

sacred-books-inmarathi
media.winnipegfreepress.com

तर ते आपण या लेखात जाणून घेऊयात …

कागद हे ज्या झाडाच्या लाकडापासून बनवले जातात. त्या झाडाच्या लाकडात सेल्युलोस आणि लिग्निन हे दोन पॉलिमर असतात. लिग्निन पॉलिमर पानांचा रंग पिवळा पडण्यास कारणीभूत ठरत असते.

लिग्निनचा रंग हा नैसर्गिकरीत्या काळा असतो. ज्यामुळे झाडाच्या लाकडाला कडकपणा येत असतो.

लिग्निन हे सूर्यप्रकाश व हवेच्या संपर्कात आल्यावर त्या लिग्निगमध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया चालू होत असते. जेव्हा हे लिग्निन सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येताच यातील घटक विघटित होतात आणि नैसर्गिकरित्या याचा जैविक घटकांचे विघटन होते.

यातील फेनॉलीक ऍसिडसचे उत्सर्जन ह्या संपूर्ण रासायनिक प्रक्रिये दरम्यान होत असते. ज्यामुळे कागदाचा रंग पिवळा होण्यास सुरुवात होते.

हा पिवळसरपणा येण्यास आपल्या हाताळणीपेक्षा पुस्तकाचा बाह्य वातावरणाशी आलेला संबंध जास्त कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे वापरामुळे पान पिवळी पडतात हा भ्रम आहे.

तरी हा प्रश्न उभा राहतो की ह्या पानांना पिवळ पडण्यापासून रोखायचं कसं?

आज ऍसिडमुक्त कागदाची निंर्मिती केली जाते. हे करण्यासाठी झाडाच्या लाकडातील लिग्निन काढले जाते. ह्यांमुळे आधुनिक कागद जुन्या कागदांपेक्षा दीर्घ काळ टिकतो.

एक अजून रासायनिक प्रक्रिया केल्यावर लिग्निन झाडातून काढणे शक्य होते परंतु ह्या पद्धतीने तयार केलेल्या कागदाची किंमत जास्त असते.

 

papermaking-inmarathi
breakingnews.ie

ह्यामुळेच वृत्तपत्र हे लवकर पिवळे पडू लागतात कारण त्यांची निर्मिती मोठया प्रमाणावर होत असते. त्यासाठी लागणाऱ्या कागदाची किंमत ही कमी असते. छपाईची देखील किंमत कमी असते.

त्यामुळे आपल्याला वृत्तपत्र हे दीर्घकाळ जपून ठेवता येत नाही. त्याचा संग्रह करणं अपेक्षित नसतं, उलट त्याचा उपयोग हा एक दिवसासाठीच असतो हे लक्षात घेऊन त्याची निर्मिती केली जाते. त्यांची पेपर क्वालिटी जपणं मुळात अपेक्षित नसतं.

परंतु पुस्तकांच्या बाबतीत तसं नसतं.

बहुतांश पुस्तकं ही वर्षानुवर्षे संग्रही राहावी म्हणून विकत घेतली जातात. त्यासाठी लागणारा कागद हा उत्कृष्ट प्रतीचा असतो. लवकर पिवळा पडणार नाही याची विशेष काळजी त्यात घेतलेली असते.

त्यांची किंमत त्यामुळेच जास्त असते. खासकरून कडक पृष्ठाच्या पुस्तकांची!

मग आता प्रश्न उभा राहतो जी जुनी पुस्तक आहेत त्यांचं संवर्धन कसं करायचं ?

ऐतिहासिक जी जुनी पुस्तकं अथवा दस्तावेज आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांना स्टेबल, ऍसिडमुक्त वातावरणात ठेवलं पाहिजे.

ती जागा ही पूर्णतः कोरडी हवी, काळोखात हवी, तसेच किडे – वाळवी – उंदीर ह्या अश्या जीवापासून सुरक्षित हवी.

ह्यासारखी पुस्तकं आज मोठं मोठ्या ग्रंथालयात, म्युझियम मध्ये संवर्धनासाठी ठेवण्यात आली आहेत. तिथे एका विशिष्ट तापमानात, ऍसिड व जीव जंतू मुक्त वातावरणात संवर्धित करण्यात आली आहेत.

 

 

जर तुमच्याकडे देखील अशी ऐतिहासिक पुस्तकं व दस्तावेज असतील तर तुम्ही देखील ती अश्याप्रकारे जपून ठेवली पाहिजे. कारण इतिहासाच गहाळ झालेलं एक पान त्याचा चेहरा मोहरा बदलून टाकत असतं.

आपल्या भविष्यकालीन पिढीसाठी ह्या ऐतिहासिक पुस्तकांच संवर्धन गरजेचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “पांढऱ्याशुभ्र पुस्तकाची पाने कालांतराने पिवळी पडण्यामागे हे कारण आहे

 • December 26, 2018 at 2:42 pm
  Permalink

  Khupach chhan

  Reply
 • December 26, 2018 at 3:32 pm
  Permalink

  ज्या ज्या ठिकानी वाचनालय असते त्या ठिकान्याचा परीसर चांगला असतो. असा माझा अनुभव आहे.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?