फेसबुक आपल्याला फसवतंय – इंटरनेट न्युट्रलिटी वाचवा – Save The Internet!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

Internet neutrality च्या विरोधात, फेसबुक आता आणखी पुढे गेलंय. गेल्या काही दिवसांपासून facebook ने “Free Basics” ह्या title खाली आपल्या सर्वांना एक नोटीफिकेशन पाठवायला सुरुवात केलीये. नोटीफिकेशन ही अशी दिसते:

InMarathi Android App

 

Free Basics_marathipizza

 

फेसबुकने internet.org च्या नावाने इंटरनेटवर स्तःची मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात टाकलेलं हे दुसरं पाऊल आहे. ह्यावेळी फेसबुक फार पुढे गेलं आहे, प्रत्येक फेसबुक प्रोफाईलला अशी नोटीफिकेशन्स पाठवून फेसबुकने TRAI ला हे दाखवायला सुरुवात केली आहे की बहुतांश भारतीय फेसबुकच्या ह्या उपद्व्यापाशी सहमत आहे. आणि आपण सामान्य भारतीय, फारसा रिसर्च नं करता “फ्री बेसिक” ह्या नावाला भुलून TRAI ला ईमेल्स पाठवत आहोत. आपली सर्वांच्या माहितीसाठी, नेट न्युट्रलिटी म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात:

नेट न्युट्रलिटी म्हणजे काय?

नावावरून समजू शकतं की इंटरनेट सुविधा न्युट्रल असावी अशी ही संकल्पना आहे.

आपण जेव्हा इंटरनेट access करतो तेव्हा आपण २ सेवा उपभोगत असतो. पहिली इंटरनेट कनेक्टीव्हीटी आणि दुसरी – ज्या वेबसाईटला आपण कनेक्ट होतो ती वेबसाईट/applications. म्हणजेच मोबाईलवर एअरटेल, व्होडाफोन, आयडिया इ टेलिकॉम कंपनीज (किंवा कंप्युटर / laptop वर विविध डोंगल्स, broadband कनेक्शन प्रोव्हायडर्स इ कंपनीज) आपल्याला “इंटरनेट कनेक्शन” उपलब्ध करून देतात आणि ह्या इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या मदतीने आपण फेसबुक, WhatsApp, फ्लिपकार्ट, Skype, विकीपेडिया इ वेबसाईट/applications access करतो. म्हणजे – इंटरनेट कनेक्शन आणि वेबसाईट/application ह्या दोन सेवा/सुविधा आपण उपभोगतो.

===
===

नेट न्युट्रलिटीचा अर्थ आहे – वेगवेगळ्या इंटरनेट कनेक्शन देणाऱ्या कंपनीजनी काही मोजक्याच वेबसाईट/apps ना प्रेफरन्स नं देत सर्व वेबसाईट/appsना सारखाच चार्ज, सारखीच स्पीड, सारखीच कनेक्टीव्हीटी द्यावी.

उदाहरणार्थ – मी माझ्या मोबाईलवर Airtelचं इंटरनेट वापरतो. मी flipkartवर जाईन किंवा amazon वर – सध्या Airtel नेटवर्क कुठलाही दुजाभाव नं दाखवता, ह्या दोन्हीही वेबसाईट्स सारख्याच स्पीडने लोड करून देतं. जर भविष्यात Airtel ने amazon सोबत कुठला प्रेफरन्शिअल ट्रीटमेंट मिळण्याचा करार केला तर काय होऊ शकतं ?

Airtel वरून amazonची वेबसाईट एकतर मोफत लोड होईल किंवा एकदम जलद गतीने लोड होईल पण – तुम्ही flipkart वर जाण्याचा प्रयत्न केलात तर एकतर तुम्हाला इंटरनेटचे पैसे मोजावे लागतील किंवा flipkart ची वेबसाईट खूप हळू हळू उघडेल. तुम्ही वैतागून flipkart बंद करून amazon वर जाल ! म्हणजेच तुमची flipkart च्या ऐवजी amazonवर जाण्याची choice ही तुमची स्वतःची नसून Airtel ने तुमच्यावर लादलेली असेल.

Airtel ने flipkart आणि amazon कडे तटस्थ – न्युट्रल – दृष्टीने नं बघितल्याचा हा परिणाम आहे. ह्याला म्हणतात नेट न्युट्रलिटी नसणं.

ह्याचे संभाव्य धोके अनेक आहेत. पहिला मोठा धोका, आपण वर बघितल्या प्रमाणे – गिऱ्हाईक वेगवेगळ्या वेबसाईटवर वस्तूंची प्रत, दर इत्यादी तपासून मग आपली निवड करतो. आपण हे comparison करण्यासाठीच इंटरनेट घेतो ! आपला तो हक्कच हिरावून घेतल्या जाणार आहे.

दुसरा मोठा धोका – सध्या आपापल्या क्षेत्रातील giants सगळ्या सर्विस प्रोव्हायडर्ससोबत असे प्रेफरन्शिअल ट्रीटमेंटचे करार करतील आणि मग नविन इंटरनेट उद्योजकांना प्रस्थापित होण्याची संधीच मिळणार नाही. उदाहरणार्थ, गृहीत धरा facebook आणि WhatsApp ने असे करार केले. काही वर्षांनी ह्यांच्यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या वेबसाइट्स आणि applications तयार झाले पण Airtel, Idea इ नी ह्या नवख्यांच्या सर्विस आपल्यापर्यंत नीट पोहोचूच दिल्या नाही…काय होईल? Competition खतम ! सगळीकडून मोजक्याच बलाढ्य उद्योजकांचा लाभ.

 

फेसबुकचं “Free Basics” हे नेट न्युट्रलिटीच्या विरोधात कसं काय आहे?

Free Basics द्वारे facebook चा हा प्रयत्न आहे की फेसबुकची सुविधा आणि फेसबुकद्वारे वापरल्या जाणाऱ्या निवडक applications आणि websites ला इंटरनेटवरचा मोफत access मिळावा. फेसबुकचा reliance सोबत करार करूनसुद्धा झालाय.

कल्पना करा – १० वर्षांपूर्वी Orkut ने असेच प्रेफरन्शिअल ट्रीटमेंटचे करार करून ठेवले असते, तर आज आपल्याला facebook मिळालंच नसतं.

ह्याबद्दल आपण काय करू शकतो?

सर्वप्रथम – facebookच्या Free Basics चं समर्थन बंद करा. इतरांना अनावधानाने समर्थन करण्यापासून थांबवा आणि mygov.in वर ह्या विषयावर आपलं मत नोंदवा. तुमचं मत ह्या लिंकवर नोंदवू शकता: mygov.in

ह्या विषयावर आणखी माहिती हवी असेल तर AIB चे “Save The Internet” हे ३ व्हिडिओ नक्की बघा.

 

===
===

 

 

 

Featured Image source: freepress.net

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *