‘बॉस’ असावा तर असा ; कर्मचाऱ्यांसाठी १५ दिवसांची मोफत ट्रीप

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


चाकरमान्यांच्या आयुष्यातील सर्वात नावडता मनुष्य कोण असा प्रश्न विचारल्यावर एकदिलाने सर्वांच्या मुखातून एकच उत्तर निघेल, ‘माझा बॉस’..!

नोकरी करणाऱ्यांच्या मानसिक सुखाची अगदी चाळण करून सोडणाऱ्या या “बॉस” नामक प्राण्यामुळे अवघा नोकरवर्ग त्रस्त आहे. कितीही मेहनत घ्या पण या बॉसचं कधीच समाधान होत नाही. बरं काही चांगल्या कामाचं कौतुक करायचं झाल्यास पाठीवरच्या थापेशिवाय दुसर काही देणारच नाही हा…!!

( हे सुद्धा वाचा: हे ५ प्रॉब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले असतात. )

हे बॉस नावाचं ग्रहण सर्वांच्याच मागे लागत असही नाही, नोकरी करणारे काही लोक इतके नशीबवान असतात त्यांना अगदीच प्रेमळ ‘बॉस’ मिळतो. जो आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची कदर करतो आणि त्याबद्दल त्यांच्या यथोचित गौरव देखील करतो.

असाच एक प्रेमळ बॉस म्हणजे “सावजी ढोलकिया”

tour-for-employee-marathipizza01

स्रोत


हिरे व्यापार जगतात “सावजी ढोलकिया” हे नाव तसं सुप्रसिद्ध ! सुरत आणि मुंबईमध्ये श्री रामकृष्ण एक्सपोर्ट या कंपनीच्या नावाने ते व्यापार करतात. त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर गाढ विश्वास !  त्यांच्यामुळेच आपला व्यापार सुस्थितीत आहे असे ते मानतात. कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या याच प्रेमापोटी कंपनीतर्फे दरवर्षी सर्व कर्मचाऱ्यांना ते एका टूरवर पाठवतात.

२०१६ या वर्षी देखील तब्बल १५ दिवसांची सुट्टी जाहीर करत आपल्या परिवारासह त्यांनी जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना उत्तराखंडची सफर घडवून आणली. अचंबित करून सोडणारी गोष्ट ही कि या सर्व सुट्ट्या Paid होत्या. अर्थात कर्मचाऱ्यांना या १५ दिवसांचा पगार भरून सुद्धा मिळाला. या टूरवर येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सावजी ढोलकिया यांनी संपूर्ण ट्रेनमधील सर्व एसी तिकिटे Book केली. यासाठी तब्बल ९० लाखांचा खर्च आला होता.


त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले कि,

सावजी ढोलकिया यांना आम्ही ‘काकाजी’ या नावाने हाक मारतो. ते एखाद्या कुटुंबातील सदस्यासारखे आमच्यावर प्रेम करतात. त्यांनी आम्हाला घडवलेली ही टूर म्हणजे त्यांचे आमच्यावर असणारे अपार प्रेम सिद्ध करते.

केवळ टूरच नाही तर मेहनती कर्मचाऱ्यांना अनेक फ्लॅट्स आणि चारचाकी गाड्यांची भेट देऊन देखील सावजी ढोलकिया यांनी यापूर्वी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

tour-for-employee-marathipizza02

स्रोत

सावजी ढोलकिया यांचे हे उदाहरण एका आदर्श बॉसला शोभावे असेच आहे.

कर्मचाऱ्यांमुळे मी आहे ही भावना जेव्हा प्रत्येक बॉसच्या मनी निर्माण होईल तेव्हाच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नशिबी प्रेमळ बॉस येईल. तोवर जे पदरी पडलंय त्यातच सुख मानण्याशिवाय गत्यंतर नाही!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 68 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?