' सौदी अरेबियाचं “गरूड” प्रेम – हॉस्पिटल्स, पासपोर्ट आणि बरंच काही ! – InMarathi

सौदी अरेबियाचं “गरूड” प्रेम – हॉस्पिटल्स, पासपोर्ट आणि बरंच काही !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

अरब… हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर येतो तो पैसा… Luxurious Lifestyle ही तर ओळख आहे अरबची आणि तिथल्या हुकूमशहांची…! इथल्या धनाढ्य लोकांची जीवनशैली तसेच त्यांचे छंद हे तर सर्व जगाला माहित आहेत.

ते त्यांच्या सोयीसाठी पैसा हा पाण्यासारखा वाहतात असं म्हटल्यास वावगं ठरू नये. या अरबी लोकांचा एक छंद आहे आणि तो म्हणजे गरुड पाळणे. गरुड (actually – ससाणा…जो गरूडापेक्षा लहान असतो…) पाळणे हा त्यांचा केवळ छंद नसून ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे.

 

black eagle InMarathi

 

पण या छंदासाठी ते असं काही करून बसतील यावर विश्वास बसत नाही. वाचून बघा तुम्हाला विश्वास बसतोय का ते…

अरब हा देश गरुड पाळण्यासाठी जगविख्यात आहे. अरब येथे गरुडांना पाळण्याची परंपरा ही ई.स. पर्व ३५०० पासून सुरु आहे. सर्व प्रथम याची सुरुवात इराक येथे झाली होती. तिथला एक राजा या पक्ष्यांसोबत ट्रेनिंग आणि शिकार करायचा अशी मान्यता आहे.

अरबची राजधानी अबू धाबी येथे एक रुग्णालय आहे, हे रुग्णालय दिसायला तस सामान्य रुग्णालयासारखंच पण तरी यात एक विशेषता आहे. ती म्हणजे हे रुग्णालय माणसांसाठी नसून ते गरुडांसाठी आहे.

 

UAE-falcon05-marathipizza
dailymail.co.uk

हो हे खरं आहे… या रुग्णालयात गरुडांचा उपचार होतो. “फाल्कन हॉस्पिटल” असे या रुग्णालयाचे नाव आहे. इथे तब्ब्ल १०७ कर्मचारी या गरुडांच्या सेवेसाठी तत्पर असतात.

इथे जेव्हा कुणी घायाळ किंवा आजारी गरुड येतो तेव्हा त्याला लगेचच एका सॉर्टींग रूममध्ये नेण्यात येतं, जेथे एक मेडिकल टीम त्याच वजन करून त्याच्या उपचारास सुरवात करते. हे रुग्णालय १९९९ मध्ये बनविण्यात आल होत, इथे दरवर्षी सुमारे  १२००० पेक्षा जास्त गरुडांचा उपचार होत असतो.

 

UAE-falcon02-marathipizza
cnn.com

आपल्याला जर ताप असला किंवा कुठल्याही छोट्या-मोठ्या आरोग्य संबंधी गोष्टींकरिता जेव्हा आपण दवाखान्यात जातो तेव्हा आपल्याला तिथे रांगेत लागून वा टोकन घेऊन आपला नंबर येण्याची वाट बघावी लागते.

तसेच या रुग्णालयात जर त्या गरुडाला आरोग्यासंबंधी काही सामान्य समस्या असेल तर त्याला देखील आपला नंबर येण्याची वाट बघावी लागते.

 

saudi-arabia-falcon-hospital InMarathi

 

पण जर एखादी सिरिअस केस आली तर त्याला गरुडाला लगेच ऑपरेटिंग रूममध्ये पाठविण्यात येत आणि मग तेथे असणारी डॉक्टरांची एक अनुभवी टीम त्या गरुडावर उपचार करते. या टीमला खासकरून कॉम्प्लेक्स आणि लांब ऑप्रेशन्ससाठी तयार करण्यात येते. उपचारानंतर या गरुडांना वातानुकूलित खोलींमध्ये रिकव्हरी करीता ठेवण्यात येते.

 

UAE-falcon03-marathipizza
dailymail.co.uk

मागील १५ वर्षांपासून या रुग्णालयाचा सर्व कारभार सांभाळणाऱ्या जर्मन पशुवैद्य मार्गरेट गेब्रियल मुलर यांनी सांगितले की, हे रुग्णालय तसेच काम करत जे इतर कुठलही सामान्य माणसांच रुग्णालय.

आधी इथे येणाऱ्या गरुडांना स्क्रीनिंग रूममध्ये नेण्यात येते, जिथे त्यांच्या कंडिशनवरून हे ठरविण्यात येत की, त्या गरुडाला इतर कुठल्या तपासण्यांची गरज आहे की नाही, तसेच त्यांना ओप्राशन ची गरज आहे की नाही हेही इथेच ठरविण्यात येत. 

 

saudi-arabia-falcon-hospital 1 InMarathi

सामान्यतः लहान मुलांसाठी उपचार आणि प्रतिबंध करण्यात येतात तीच प्रक्रिया या गरुडांसाठी देखील वापरण्यात येते. इथे ज्याप्रकारची सोय आणि उपचार या गरुडांना देण्यात येते ते इतरांना अवास्तव वाटू शकतं – पण युएईमधील लोकांसाठी हा पक्षी राष्ट्रीय अभिमान आणि परंपरेचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यांची एवढी काळजी घेणं आम्हाला जास्त वाटत नाही, असेही मुलर म्हणतात.

 

saudi-arabia-falcon-hospital 2 InMarathi

 

युएईच्या कित्येक घरांमध्ये गरुडाचं स्वतःचं बेडरूम असतं ज्याला रुस्टस असे म्हणतात. कित्येक घरांत तर ते आपल्या मालकासह त्यांच्याच खोलीत झोपतात. एवढंच काय तर या पक्ष्यांचं इथे स्वतःचं पासपोर्ट देखील आहे आणि काही अमीर गरुड पालक तर आपल्या गरुडांना बिसिनेस क्लासनी प्रवास करवतात.

 

UAE-falcon04-marathipizza
cnn.com

हे गरुड पालक आपल्या गरुडाची स्वतःच्या मुलांप्रमाणे संगोपन करतात.

या रुग्णालयात केवळ अबू धाबी येथीलच नाही तर सऊदी अरब, कतार, कुवैत और बहरीन येथील गरुडांना देखील येथे उपचारासाठी आणण्यात येत. त्यामुळे हे रुग्णालय आता येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. याचा विचार करता येथील रुग्णालय प्रशासनादेखील आठवड्यातील दोन दिवस पर्यटकांसाठी हे रुग्णालय खुलं ठेवण्यात येईल असा निर्णय घेतला.

 

saudi-arabia-falcon-hospital 3 InMarathi

 

हे सर्व वाचून किती आनंद होतो ना?! म्हणजे एक असा देश जिथे गरुडासारख्या पक्षीसाठी एवढं आलिशान, सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय असणं हे आपल्यासाठी जरा न पचण्यासारखंच ना… हे वाचून नक्कीच त्या धनाढ्य अरबींच कौतुक करावंसं वाटतं असेल ना तुम्हाला…

पण काय तूम्हाला त्याच अरब देशात राहणाऱ्या गरीब आणि मजुरांची परिस्थिती माहितीये? या देशात एका पक्ष्याला एवढा मान दिला जातो, त्याला आपल्या पोटच्या पोरांसारखं वागवल्या जात, त्याची एवढी काळजी घेतली जाते… हे खरच त्या पक्ष्याच्या प्रेमापायी की केवळ आपला मोठेपणा दाखविण्यासाठी, आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी…? पुढे वाचल्यावर तुमच्याही मनात हाच प्रश्न उभा राहील…

 

saudi-arabia-falcon-hospital 6 InMarathi

 

अमेरिकेच्या मानवाधिकार स्वयंसेवी संस्थेनुसार, युएईमध्ये तिथल्या श्रमिक कामगारांसोबत अतिशय दुर्व्यव्हार केला जातो आणि तो निरंतर चालूच आहे. तिथे घरकामासाठी असणाऱ्या महिला कामगारांना इतर क्षेत्रातील कामगारांना लागू असलेल्या नियमांतून वगळण्यात आले असून त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच तेथील स्थलांतरित बांधकाम कामगारांनाही गंभीर शोषणाचा सामना करावा लागतो आहे.

 

saudi-arabia-falcon-hospital 4 InMarathi

इथल्या कामगारांना बांगला देश, पाकिस्तान आणि भारत अशा देशातील गरीब लोकांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून त्यांना दुबई आणि यूएईच्या इतर देशांत पाठवले जाते.

एकदा ते इथे आले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाच रूपांतर हे भयावह अश्या नरकात होत. इथल्या उच्चपदस्थ परदेशी लोकही ह्या परिस्थितून वाचत नाहीत. मात्र येथील स्थानिक अरब लोक ऐशोआरामात जगत असतात.

 

saudi-arabia-falcon-hospital 5 InMarathi

 

कधी विचार केलाय की मंदी, बेकारी वगैरेंची छळ या अरब देशातील लोकांना का बसत नाही. कारण ते तसं होऊच देत नाहीत.

तिथली मंदी, बेकारी यासारख्या गोष्टींना केवळ तिथल्या गरीब कामगारांना सोसावे लागते. या देशात अजूनही हुमशाही चालते त्यामुळे आजही तिथे कामगारांना गुलामासारखीच वागणूक दिली जाते, त्यांचा मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यात येते.

या छागमगत्या धनाढ्य देशाची ही एक अशी काळी बाजू आहे जिथे दूरदूरपर्यंत आशेचा किरणही त्या कामगारांना दिसत नाही…!

या देशात गरुडाला तर फार महत्व आहे पण माणसाला नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?