अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाळवंटात उभं रहातंय “जगातील सर्वात मोठं शहर”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सौदी अरेबिया हा देश त्याच्या नियमांमुळे आणि तेथील लोकांच्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. हा देश श्रीमंत देशांपैकी एक देश मानला जातो. येथे खनिज तेलाच्या खूप मोठमोठ्या विहिरी आपल्याला पाहण्यास मिळतात. येथे सगळीकडे झगमगाट दिसून येतो. येथे उंचच उंच इमारती देखील पाहण्यास मिळतात.  या देशातील खूप भाग हा वाळवंटाने आच्छादलेला आहे. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पण तेल किंमतीमध्ये झालेल्या उतरंडीमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या देशाने तेल कामगारांना देण्यात येणारे मानधन कमी केले आहेत.

 

Saudi arabia's New city.Inmarathi
businessinsider.in

या सर्वांमुळे अर्थवव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अलीकडील काही वर्षात सौदी अरेबियाचे सरकार शेकडो चौरस मैलच्या वाळवंटाचे नवीन शहरामध्ये रुपांतर करणार आहे आणि त्यावर काम देखील सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पातून लोकांना रोजगाराचे नवीन साधन मिळेल आणि अर्थव्यवस्थेला कच्चा तेलापासून दूर नेता येईल आणि देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून राहणार नाही. सौदी अरेबियातील हे शहर २०२० पर्यंत बांधण्याचे ठरवले आहे. या बांधल्या जाणाऱ्या शहराला नॉलेज इकॉनॉमिक सिटी असे नाव देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, या सौदी अरेबियामध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन शहराबद्दल.

 

Saudi arabia's New city.Inmarathi1
businessinsider.in

हा नवीन शहर उभारण्याचा प्रकल्प सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. जी अर्थव्यवस्था फक्त तेलावर आधारील आहे, तिचा भार कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. तेलाच्या किंमती काही प्रमाणत कमी झाल्यामुळे असे करण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने घोषणा केली की –

सरकार ५०० बिलियन डॉलर्सचे मेगा शहर उभारणार आहे.ज्याचं नाव “निओम” असेल.

 

Saudi arabia's New city.Inmarathi2
arabnews.com

२०१८ च्या सुरुवातीला २८१ मैलाची रेल्वे लाईन प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. यावरून हरमाइन हाय स्पीड रेल्वे रहिवाश्यांना मक्का आणि जेद्दा येथे प्रवास करण्यास सक्षम बनवणार आहे.

 

Saudi arabia's New city.Inmarathi3
businessinsider.in

सौदी अरेबियाच्या सरकारचा असा दावा आहे की, या “विकास कामा” मुळे २०,००० नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि १५,००,००० लोकांसाठी घरांची निर्मिती होईल. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पण खूप चांगला याचा परिणाम होईल.

 

Saudi arabia's New city.Inmarathi5
businessinsider.in

 

या शहरामध्ये मोठमोठे मॉल असणार आहेत, जेथे लक्झरी गाड्यांचे शोरूम, रेस्टॉरंट, कॅफे आणि अमेरिकन फूड मिळणारी शॉप्स असणार आहेत. तसेच, या शहरामध्ये किरकोळ विक्रीसाठी ५३८००० चौरस फूटामध्ये पट्टीचे मॉल येथे उपलब्ध असतील.

 

Saudi arabia's New city.Inmarathi6
businessinsider.in

या शहरामध्ये ९०० विलांचा देखील समावेश आहे. या शहराच्या निवासी परिसरामध्ये उद्याने, क्रिडांगणे, जिम, मशिदी, दुकाने आणि स्विमिंग पूल यांचा खूप मोठ्या प्रमाणावर समवेश आहे. त्यामुळे लोकांना कोणत्यही गोष्टीची कमी येथे जाणवणार नाही.

 

Saudi arabia's New city.Inmarathi4
businessinsider.in

या शहराच्या मास्टर प्लॅनमध्ये रिटेल, ऑफिस स्पेस आणि १० लाख चौरस फूटांपेक्षा जास्त भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. जवळपास ५ कोटी चौरस फूटाचे काम करण्यासाठी ७ बिलियन डॉलरचा खर्च येणार आहे.

 

Saudi arabia's New city.Inmarathi7
businessinsider.in

सौदी अरेबिया ही नॉलेज सिटी मदिनामध्ये तयार करणार आहे. जे लाल समुद्राच्या किनाऱ्यापासून ६० मैल अंतरावर आहे. सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे.

असे हे मोठे आणि आव्हानात्मक शहर तयार करणे हे सौदी अरेबियासाठी नवीन नाही आहे, याआधीही या देशाने खूप मोठी शहरे उभारली आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?