' मुंबईतील १४२ वर्ष जुन्या मासळी बाजाराचा अविश्वसनीय कायापालट; एकदा बघाच! – InMarathi

मुंबईतील १४२ वर्ष जुन्या मासळी बाजाराचा अविश्वसनीय कायापालट; एकदा बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

=== 

बदल ही काळाची गरज असते. रोज सतत तेच केल्यानं आपणही कंटाळतो. मग आपल्याला काहीतरी वेगळं, हटके करावंसं वाटतं. अगदी मग तो बदल आपण आपल्या लूक मध्ये केशरचना बदलून, कधी एखादा नवा haircut करून तर कधी कापड्यांची style बदलून करतो.

कधी आपल्या अॅक्सेसरी तर कधी इतर गोष्टी बदलून आपण त्यात थोडं नावीन्य आणू पहातो. अशा बदलानंतर आपल्यालाच छान आणि टवटवीत वाटू लागतं. आपलं पालटलेलं इंटरेस्टिंग रूप इतरांच्या नजरेत भरल्याशिवाय राहत नाही आणि आपल्यालाही गंमत वाटू लागते.

कोणाला काही वाटो न वाटो आपण मात्र कधी दिसण्यातला बदल, कामातला बदल, आयुष्यातला बदल नेहमीच एन्जॉय करत असतो कारण त्यातल्या तोच-तोचपणाला आपण वैतागलेलो असतो.

 

sasoon docs 10 inmarathi
youtube

 

आता नेहमीचाच रस्ता, त्याच इमारती, तीच दुकानं ह्याचं फारसं काही अप्रूप आपल्याला वाटत नाही; पण तेच तिथे एखादं नवं दुकान सुरु झालं की, आपलं लक्ष आपोआप तिथे वेधलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्या जागेचं वेगळेपण, नवं रूप आपल्याला भावतं आणि कालांतराने तेही आपल्या सवयीचं होतं.

असंच आपल्या जीवाभावाची असलेली मुंबई आपल्याला कितीही प्रिय असली तरी रोज त्याच ठिकाणी राहून, वावरून आपल्याला ह्या शहराची सवय झालेली असते. रोज चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणारी मंडळी क्वचितच मरिन ड्राईव्ह कडे बघतात.

 

marine drive inmarathi
india tours

 

हेच एखादी बाहेरून आलेली व्यक्ती त्या मॅरीने ड्राईव्हचं रूप डोळे भरून पाहत असते. कारण एकच की, त्यांच्यासाठी ते नवीन असतं आणि त्यातला तोचतोचपणा आपल्याला ठाऊक असतो.

हे तर फक्त एक उदाहरण झालं. अशी अनेक ठिकाणं आहेत जी काळाच्या ओघात आपल्या आधुनिक जीवनशैलीत आपल्या सवयीची आणि थोडीशी दुर्लक्षित झाली आहेत.

मुंबई म्हटलं की, समुद्र हा आलाच आणि समुद्र म्हटलं की, मांसाहार करणाऱ्यांचा सर्वांत जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच मासोळी!

तर अशी ही मासोळी म्हणजेच मासे अनेक काळ आपल्या पोटात घेत सांभाळ करणारं, जणू ‘फिश परफ्युम’ मध्ये रोज चिंब भिजणारं, आपलं जूनं अन् सवयीचं ससून डॉकयार्ड!

ऐकून तर आपल्या हे माहित आहेच पण सर्व मुंबईकरांनी ते पाहिलं असेलंच असं नाही. त्याच्या आसपास काम करणाऱ्या मंडळींना त्याच्या नुसत्या वासावरूनच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत असते.

 

sasoon docs inmarathi

गेली १४२ वर्ष अविरत सेवा देणारं आपलं ससून डॉकयार्ड तिथे काम कारणाऱ्यांसाठीही थोडं इंटरेस्टिंग झालं तर? आता ह्यात काय वेगळं करता येईल बरं ? तर जसं आपण आपल्या पेहेरावात बदल करून नावीन्य आणतो तसं ससून डॉकयार्डचा कायापालट झाला तर काय मस्त वाटेल ना?

अहो नुसतं वाटेल नाही तर वाटतंय! कारण कलाप्रधान अशा आपल्या मुंबईतील ही वास्तू रंगात आणि कलेत न्हाऊन निघालीय आणि येणाऱ्या जाणाऱ्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागलीये.

अतिशय जुना आणि पहिलावहिला असा हा मासळी बाजार कालांतराने फक्त अस्तित्वापुरताच मर्यादित राहिला होता. खरंतर ह्या महत्वाच्या वास्तूला पुन्हा काळाच्या प्रवाहात आणणं देखील गरजेचं होतं.

आणि म्हणूनच ३० कलाकारांनी हे मेकओव्हरचं काम हाती घेत यशस्वीरीत्या हा कायापालट कलात्मकतेने करून दाखवलाय.

 

sasoon docs inmarathi 1

 

भारत आणि इतर देशातल्या अशा एकूण ३० कलाकारांनी मिळून हाती घेतलेल्या या कामाचं st +art ह्या टीमने डॉक्युमेंटेशन केलं. लोकांमध्येही थोडी जागृती व्हावी ह्यासाठी वेगवेगळे आर्ट बेस वर्कशॉप घेण्यात आले.

 

sasoon docs inmarathi 4
the financial express

 

इतरांनीही आपले विचार, कला  कन्सेप्ट मांडल्या. थोडक्यात, सगळ्यांना ह्या ना त्या प्रकारे ह्या कार्यात सहभागी करून घेण्यात आलं.

ऑस्ट्रेलिया मधून Guido Van Helten , सिंगापूर मधून Tan Zi Xi,Yok and Sheryo , मेक्सिको मधून Curiot , जर्मनी मधून Clemens Behr, भारतातले Daku and Sameer Kulavoor , फ्रान्स मधून Ella & Pitr , न्यूझीलंड मधून Askew One ह्यांचा त्या ३० कलाकारांच्या यादीत समावेश आहे.

 

जाणून घेऊया कायापालटाविषयी :

 

sasoon docs inmarathi 2
insider.in

 

ससून डॉकयार्ड रंगात न्हाऊन निघालंय मात्र तिथे दिसणारी कला ही त्या जागेला अनुसरूनच करण्यात आलेली दिसून येते. अनेक भिंतींवर मासे, होड्या, समुद्र अशा कन्सेप्टची पैंटिंग्स बघायला मिळतात.

 

sasoon docs 9 inmarathi
the better india

 

जेट्टीजवळील बोटींवर फडकणाऱ्या पिवळ्या झेंड्यावर ‘आर्ट फॉर ऑल’ असं हिंदीत लिहिलेलं दिसून येतं. वायर आणि मॅशचा केलेला उंच कुत्र्याचा पुतळा सर्वांचं लक्ष आकर्षून घेत जणू प्रदेशाच्या अख्त्यारीची जाणीव करून देतो.

 

sasoon docs 8 inmarathi

आपल्या धन्याच्या परतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मासेमाऱ्यांच्या पत्नीचंही सुंदर दर्शन काही चित्रांतून घडतं.

प्रवेशाच्या मुख्य भिंतीला काळा रंग फासून त्यावर तिथे रोज काम करणाऱ्या कामगार स्त्रियांचं पोर्ट्रेट त्या भिंतीची शोभा तर वाढवतंच पण त्याबरोबरच त्या महिलांचं जणू कौतुकही करतं.

 

sasoon docs inmarathi 5

 

एकाने UV लाईट्सचे कट – आउट्स वापरून तिथल्या माणसांचं निरीक्षण करून त्याप्रमाणे त्यांचं जीवन भिंतीवर साकारलं आहे.

प्लास्टिक आणि टाकाऊ गोष्टी वापरून एकाने ‘प्लास्टिक ओशन’ नावाचं आर्ट वर्क करत पर्यावरणाच्या संबंधित मुद्द्यांवर लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे.

 

sasoon docs inmarathi 3

 

इतर वेळी अतिशय सामान्य असलेली ही जागा, झाडाला जशी पालवी फुटावी तशी पुनरुज्जीवीत झालीये आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराला घटकाभर का होईना पण थांबायला भाग पडतेय हे खरं.

जसं रोज धावणारा मुंबईकर चर्चगेट स्थानकाबाहेर थांबून स्थानकावरील महात्मा गांधींचं चित्र न्याहाळण्यात व्यग्र असतो अगदी तसंच! विशेषतः फक्त हा कायापालट बघायला येणाऱ्यांचंही प्रमाण वाढताना दिसतंय.

 

sasoon docs inmarathi 7-

 

खरंच , ही मेकओव्हरची कल्पना मनापासून भावते. किती साधी सोपी गोष्ट होती ना! कले परी कला तर झालीच पण आपली एक, कुठेतरी काळाच्या ओघात मागे पडलेली वास्तू पुन्हा एकदा रोजच्या जीवनात पाय रोवून नव्या ढंगात सज्ज झाली.

मुंबईचं हे स्पिरिट नक्कीच मन प्रसन्न करत असतं आणि मुंबईच्या सौंदर्याला चार चांद का काय ते म्हणतात तसं लावतं. चांगले बदल हे नक्कीच स्वागतार्ह असतात ; मग ते माणसातले असतो वा वास्तूंमधील!

कधी भेट देताय मग सासून डॉक्सला?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?