‘ह्या’ कारणामुळे साधू-संत वापरायचे लाकडी पादुका

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

खडावा- म्हणजेच लाकडी पादुका… तुम्ही अक्षय कुमार आणि परेश रावलचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट बघितलाच असेल. त्यामध्ये एक सीन असा दाखवला आहे की, अक्षय कुमारच्या पायात चप्पल असते तेव्हा तो कृष्णाच्या मंदिरात ठेवलेल्या लाकडी पादुका आपल्या पायात घालतो. हा सीन बघितल्यावर त्या प्राचीन काळाची आठवण होते जेव्हा साधू-संत हे पायात हा खडावा घालायचे. पण ते पायात या लाकडी पादुका का घालत असावे आणि त्यांनी पादुका बनविण्यासाठी लाकडाचीच निवड का केली असावी? असे प्रश्न नक्कीच आपल्या मनात आले असणार… आज आम्ही तुमच्या याचं प्रश्नच उत्तर घेऊन आलो आहोत..

InMarathi Android App

 

khadava-inmarathi03
khabridost.in

प्राचीन काळी साधू-संत हे या लाकडाच्या पादुका म्हणजेच खडावा घालायचे. तसेच त्या काळचे अनेक लोकं या लाकडी पादुकांचा वापर करायचे. आजच्या काळात या लाकडी पादुकांची जागा भलेही वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आणि बुटांनी घेतली असली तरी देखील आजही अशे अनेक साधू-संत आहेत जे खडावाचं वापरतात. पण असे का..? तर यामागे एक वैज्ञानिक तसेच धार्मिक कारण आहे.

 

khadava-inmarathi02
palpalindia.com

चला तर मग जाणून घेऊ की हे साधू-संत लाकडाच्या पादुका का वापरतात ते..

 

khadava-inmarathi04
bhaskar.com

गुरुत्वाकर्षणचा जो सिद्धांत आपल्या वैज्ञानिकांनी मांडला, तो ऋषी-मुनींनी प्राचीन काळीच जाणला होता.

या सिद्धांतानुसार, आपल्या शरीरात प्रवाहित होणाऱ्या विद्युत लहरी गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी द्वारे अवशोषित केली जातात. जर ही प्रक्रिया निरंतर सुरु असली तर त्यामुळे शरीरातील सर्व जैविक शक्ती संपून जाईल.

 

khadava-inmarathi
googleusercontent.com

याच जैविक शक्तींना वाचविण्याकरिता साधू-संत त्यांच्या पायात या लाकडी पादुका घालण्याची प्रथा सुरु केली, ज्यामुळे शरीरातील विद्युत लहरींचा पृथ्वीच्या अवशोषण शक्ती सोबत संपर्क येणार नाही.

 

khadava-inmarathi01
bhaskar.com

अनेक धार्मिक आणि सामाजिक कारणांमुळे प्राचीन काळी चामड्याचा बूट किंवा चप्पल समाजाच्या एका मोठ्या वर्गाला मान्य नव्हती. तर कपड्याचे बूट प्रत्येक ठिकाणी वापरण्यायोग्य नव्हते. जेव्हाकी लाकडी पादुका घातल्याने कुठल्याही धर्म अथवा समाजाला आपत्ती नव्हती म्हणून हे खडावा प्रचलित झाले. त्यानंतर हे साधू-संतांची ओळखच बनले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *