' सचिन “महागुरू” पिळगावकर सरांनी केलेली “बॅटिंग” काय काय शिकवून गेलीये पहा! – InMarathi

सचिन “महागुरू” पिळगावकर सरांनी केलेली “बॅटिंग” काय काय शिकवून गेलीये पहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक – विद्याधर जोशी

===

सूर नवा ध्यास नवा या सिरीयल च्या ३ एपिसोड्स पैकी, पहिल्या दोन एपिसोडमध्ये एक दिवसीय सामन्यासारखी बॅटिंग केलेल्या म्हागृनी तिसऱ्या एपिसोडमध्ये मात्र आपली नेहमीची T20 क्षमता दाखवून चौफेर टोलेबाजी केली.

 

Sachin Pilgoankar at SNDN InMarathi

काल मित्र उपेंद्र जोशी यांनी विचारलं की या चॅनेलवाल्यांना महागुरूबद्दल माहिती असूनही सारखं सारखं का बोलावतात? म्हटलं, अरे तोच तर त्यांचा USP आहे.

एरवी हा कार्यक्रम न बघणाऱ्या अनेकांनी हे तीन एपिसोड मात्र आवर्जून पाहिले. तेवढाच सत्ता स्थापनेच्या सकारात्मक चर्चांच्या करमणुकीतून थोडा बदल.

तर म्हागृ पुरस्कृत कल का ग्यान –

१. मुम्मूआंटी = मुमताज

 

mumtaaz.InMarathi

२. अब्बू = मजरुह सुलतानपुरी

 

majrooh Sultan InMarathi

३. अब्बूंंनी गाणं लिहिलं की ते जवळच्या माणसाला वाईट पद्धतीने गाऊन दाखवायचे कसं लिहिलंय विचारायला. जवळच्या माणसांपैकी एक म्हणजे अर्थातच आपले लाडके म्हागृ.

म्हागृंंकडून गाण्याची सोनोग्राफी होऊन approval मिळाल्यावरच लेखणीचं बाळंतपण होऊन ते गाणं जन्मायचं.

 

Masrooh Sultanpuri Inmarathi

४. लहानपणापासून म्हागृ आशाताईंच्या सहवासात होते. फक्त आशाताईंच्या लहानपणापासून की म्हागृंंच्या ते कळलं नाय.

 

Sachin Pilgaonkar InMarathi

५. या आठवड्याच्या भागांतून म्हागृंंना निरोपाचा नारळ… सॉरी, निरोपाचा गिफ्ट हँपर देण्याआधी त्यांना गाणं म्हणायला सांगितल्यावर त्यांनी पाठोपाठ दोन गाणी नॉनस्टॉप म्हटली.

त्यातून reading between the lines आम्हाला येतंय बर्का! त्या दोन गाण्यांचा निष्कर्ष असा की….

रफी + किशोरकुमार = म्हागृ…

 

Mahaguru InMarathi

अशा पद्धतीने आमचा हा आठवडा संस्मरणीय केल्याबद्दल आमच्या लाडक्या म्हागृंंचे अनंत उपकार.

म्हागृ येती घरा, तोचि दिवाळी दसरा.

इति विद्याधरविरचितं म्हागृस्तोत्रं संपूर्णम्।

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय म्हागृ.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?