क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार !

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आजच्या काळात क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे पैसे सोबत ठेवायची गरज भासत नाही. पण ह्या क्रेडीट कार्डचे जेवढे उपयोग आणि फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटे देखील आहेत.

InMarathi Android App

म्हणजे जर क्रेडीट कार्ड वापरत असताना काही गोष्टींचे भान ठेवले नाही तर तुम्हाला खूप मोठ्या समस्येला समोर जावे लागू शकते.

त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरत असताना कुठले नियम पाळायला हवे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

 

Credit-cards-inmarathi
wikipedia.org

आपल्या क्रेडीट कार्डची माहिती कुणाही बरोबर कधीही शेअर करू नये. फोन वरून किंवा ऑनलाईन पेमेंट करत असताना सावधनता बाळगणे खूप गरजेचे आहे. कारण ह्या दरम्यान थोडी देखील चूक झाली तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते. सध्याच्या जगात पासवर्ड हॅकिंग आणि डेटा चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून आपले क्रेडीट कार्ड सावधपणे वापरणे गरजेचे आहे.

===
===

जर तुम्हाला वाटत असेल की एकाहून जास्त क्रेडीट कार्ड सोबत ठेवल्याने जेवढा तुम्हाला फायदा होतो, त्याहून जास्त त्याचे नुकसान आहेत. सर्वात पहिली समस्या म्हणजे, अनेक क्रेडीट कार्ड असल्या कारणाने आपल्याला हे लक्षात रहात नाही की कुठल्या क्रेडीट कार्डचे पेमेंट कधी करायचे आहे.

 

Credit-cards-inmarathi01
mag.co.id

जर पेमेंट करायला उशीर झाला तर तुमचा क्रेडीट स्कोर खराब होईल, क्रेडीट स्कोर खराब असला तर बँक आपल्याला आणखी क्रेडीट कार्ड किंवा लोन देत नाही. तसेच तुमची क्रेडीट लीमिठी कमी केली जाते.

जर प्रवासादरम्यान तुम्ही एकाहून अधिक क्रेडीट कार्ड सोबत ठेवत असाल तर ते हरविण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

 

Credit-cards-inmarathi04
reuters.com

ज्यांनी नवीनच क्रेडीट कार्ड वापरायला सुरवात केली आहे अश्या लोकांसोबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे हे लोक क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरतात. क्रेडीट कार्ड वापरणे हे जरी सोप्पे वाटत असले तरी त्याच्या काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. जसे की, पेमेंट टायमिंग आणि इंटरेस्ट.

अनेक बँका ह्या पेमेंट करिता ५० दिवसांचा कालावधी देतात न जर पण क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरलो तर बँक आपल्याकडून अतिरिक्त इंटरेस्ट आकारते.

===
===

ड्यू डेट आणि आउटस्टॅडिंग बॅलन्स यांच्याशी संबंधित माहिती बँक संदेश पाठवून देत असते. ज्यामध्ये बँक कमीत कमी शिल्लक देण्याचा पर्याय देते. एखादेवेळी पैसे कमी असले तर कमी अमाउंट देऊन पेमेंट टायमिंग वाढवता येते. पण नेहमी असे केल्याने पेमेंट चे पैसे त्यावर लावण्यात आलेल्या व्याजामुळे नेहमी वाढत राहील.

 

Credit-cards-inmarathi03
moneyunder30.com

प्रत्येक बँक आपल्या क्रेडीट कार्ड धारकाला हा अधिकार देते की, तो क्रेडीट कराडच्या मदतीने देखील एटीएममधून पैसे काढू शकेल. पण तुम्ही एकावेळी जेवढे पैसे काढाल त्यावर बँकेकडून रोज व्याज घेतले जाईल. जे तुम्हाला खूप महागात पडू शकते.

जर तुम्ही क्रेडीटकार्डाने कुठले मोठे पेमेंट करत असाल किंवा इएमआयवर कुठली मोठी वस्तू खरेदी करत असाल तर त्याचे पेमेंट देताना द्याव्या लागणाऱ्या व्याजाबाबतही एकदा विचार करून घ्याल.

क्रेडीटकार्डने जरी आपले जीवन सुखकर आणि सोयीस्कर केले असले तरी त्याचे तोटे जाणून त्याला वापरणे गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार !

  • May 20, 2019 at 8:25 am
    Permalink

    Credit card che bill over zalyavar te handle kase katyache te pn sanga na

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *