खास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गाडी चालविणे हे तोपर्यंतच मजेशीर असते जोपर्यंत समोर ट्राफिक पोलीस येत नाही. कारण गाडी चालविण्याची मजा घेत असताना एक दोन ट्राफिक नियम तर तुटतातच.

मग ट्राफिक पोलीस आपलं चलान कापणार आणि आपल्याला ५००-१०००चा फटका बसणार. पण सर्व नियम आपल्यासाठीच आहेत असं नाही. तर काही ट्राफिक नियम हे पोलिसांसाठी देखील आहेत.

जसे त्यांना काही अधिकार आहेत तसेच आपल्याला देखील काही अधिकार आहेत.

ह्या अधिकारांचा फायदा घेण्यासाठी आपल्याला हे अधिकार माहित असणे खूप गरजेचे आहे. ह्याने तुम्ही स्वतःसोबत तसेच इतरांसोबत काही चुकीचे घडू देणार नाही.

वाहतुकीचे नियम आणि आपल्याला मिळणारे अधिकार माहित असताना तुम्ही त्याचा उपयोग योग्य त्या वेळी करू शकता.


 

traffic police rules-inmarathi01
dnaindia.com

ट्राफिकच्या नियमांनुसार ६ कारणांमुळे पोलीस तुमचे लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करू शकते.

१. रेड लाइट जंप करणे.

२. गाडी सामानाची ओव्हरलोडिंग करणे.

३. ओझे वाहून नेणाऱ्या गाडीत प्रवाश्यांना बसवणे.

४. मद्यपान करून गाडी चालविणे.

५. ड्राइविंग करताना मोबाईलवर बोलणे.

६. गाडी ओव्हर स्पीडने चालविणे.

कुठलाही ट्राफिकचा कायदा मोडल्यास त्यावर तीन प्रकारचे चलान असू शकतात.

 

traffic police rules-inmarathi02
mid-day.com

१. ऑन द स्पॉट चलान

जर ट्राफिक पोलिसांनी तुम्हाला कुठला ट्रॅफिकचा नियम मोडताना पकडले आणि त्याच वेळी त्यांनी तुम्हाला चलान देऊन दंड आकारून सोडले तर त्याला ऑन द स्पॉट चलान म्हणतात.

२. नोटिस चलान

जर कुठला चालक नियम तोडून पळून जात असेल आणि त्यानंतर ट्राफिक डिपार्टमेंट त्याच्या घरी चलान पाठवत असेल तर त्याला नोटिस चलान असे म्हणतात. हा चलान भरण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा वेळ दिला जातो.

३. कोर्ट चलान

जर वाहन चालकाने कुठला मोठा गुन्हा केला असेल ज्यासाठी त्याला शिक्षा आणि दंड दोन्ही होणार असेल तर अश्या प्रकरणांत कोर्ट चलान जारी करण्यात येते.

कॉन्स्टेबल फाईन मागू शकत नाही.

 

traffic police rules-inmarathi
pahlikhabar.com

कॉन्स्टेबलला फाईन घेण्याचा अधिकार नसतो. तो केवळ कारवाई म्हणून गाडीचा नंबर नोट करू शकतो. तर हेड कॉन्स्टेबलला १०० रुपयांहून अधिकचा फाईन घेण्याचा अधिकार नसतो. तसेच ट्राफिक ऑफिसर एएसआय हे १०० हून अधिक रुपयांचा फाईन घेऊ शकतात.

तीन कारणांसाठी तुम्ही गाडी ट्राफिक पोलिसांद्वारे जप्त केली जाऊ शकते.

१. जर तुमची गाडी एखाद्या ठिकाणी हक्क नसलेल्या स्थितीत उभी असेल.

२. जर तुमची गाडी नो पार्किंग झोनमध्ये उभी असेल.

३. जर तुमची गाडी अश्या स्थितीत उभी असेल ज्याने इतरांना त्रास होत असेल.

तसेच कुठल्या चुकीसाठी किती दंड आकारला जाऊ शकतो हे देखील माहित असणे गरजेचे आहे.

 

traffic police rules-inmarathi05
hindustantimes.com

जर तुमच्या गाडीची नंबर प्लेट डिफेक्टिव्ह असेल, जर तुम्ही सीट बेल्ट न लावता गाडी चालवत असाल, गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क असेल, सिग्नल लाल झाल्यावर जर तुम्ही गाडी काढली,

विना हेल्मेट दुकाचीवर समोर किंवा मागे बसले असाल, गाडीवर गार नसताना लाल दिवा लावला असेल तसेच दुकाचीवर तीन जण बसलेली असतील तर अश्या परिस्थितीत तुमच्याकडून १०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

कुठले नियम तोडल्यास १०० हून जास्त रुपयांची फाईन आकारली जाते.

 

traffic police rules-inmarathi03
jagranjunction.com

ओव्हरस्पीड गाडी चालविण्यासाठी तुमच्याकडून ४०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, विना लायसन्स गाडी चालविण्यासाठी तुमच्यावर ५०० रुपयांचा फाईन लागू शकतो.

गाडी चालविणारा अल्पवयीन असल्यास ५०० रुपयांचा फाईन लागू शकतो. गाडी चालविताना मोबाईलवर बोलण्यासाठी १००० रुपयांचा फाईन लागू शकतो.

विना इन्शुरन्स गाडी चालविल्यास १००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच रजिस्ट्रेशन नसलेली गाडी चालविण्यासाठी २००० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

हे नियम आणि अधिकार माहित असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच ते पाळणे देखील महत्वाचे आहे. कारण हे नियम आपल्याच सुरक्षेसाठी तयार करण्यात आले आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “खास “पोलिसांसाठी” असलेले हे वाहतुकीचे नियम प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवेत!

 • July 8, 2018 at 8:24 pm
  Permalink

  मला माहिती करायचे आहे की मराठी मध्ये नंबर प्लेट वापरली तर चालते का?

  Reply
  • December 6, 2018 at 12:34 pm
   Permalink

   100% yes ….pn no double meaning nko…

   Reply
 • August 28, 2018 at 9:07 pm
  Permalink

  Amhi 2 divsa purvi gavi gelelo …ani ghari parat yetana …. highway var police constable ne gadi thambvli …. driver kadun RS 100 ghetle …driver chi gadi ….normal …car hoti…fakta ..tyavar , yellow color chi line hoti..

  Mala fakta yevdhch vicharych ki.jar traveling car asel aani jar driver ne uniform nasel ghatla ..tar tyala fine basto ka ?
  Taxi aani auto Vale lokana sodun ….je Baki car travel karnare

  Reply
 • January 10, 2019 at 8:28 am
  Permalink

  तुमचं टाईपिंग 2 ठिकाणी चुकलंय

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *