' युरोपातील ‘या’ समुदायाची हिंदू धर्मावर असलेली भक्ती पाहून नक्कीच थक्क व्हाल! – InMarathi

युरोपातील ‘या’ समुदायाची हिंदू धर्मावर असलेली भक्ती पाहून नक्कीच थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारतातून अनेक लोक विदेशात गेले आणि तिथेलच झाले आहेत. असाच एक समाज आहे जो यूरोपात राहातो ज्याचे भारतासोबत कनेक्शन आहे. यूरोपातील हा समाज तेथील मायनॉरिटी ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यांना रोमा समाज म्हटले जाते.

या समुदायाचे जवळपास एक कोटी लोक यूरोपात राहात आहेत. ही जमात कायम फिरस्ती असल्याने त्यांना जिप्सी ही देखील म्हटले जाते. ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात.

 

roma-marathipizza01
edidomus.it

रोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे ‘करंट बायोलॉजी’ नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे. ते भारतातील उत्तर आणि उत्तर पश्चिम परिसराशी संबंधीत लोक आहेत.

ते १५०० वर्षांपूर्वी इराणमध्ये पोहोचले होते, त्यानंतर १५ व्या शतकात इराणमार्गे यूरोपात गेले. सध्या त्यांची यूरोपातील संख्या एक कोटींच्या आसपास आहे.  मात्र ते संपूर्ण यूरोपात पसरलेले असल्यामुळे त्यांचे डाटा कलेक्शन सोपे नाही.  शेकडो वर्षांपासून यूरोपात राहात असताना आजही त्यांच्यासोबत भेदभाव होतो.

 

roma-marathipizza02
mibridgemi.com

 

रोमा समुदायाचे लोक मुळतः हिंदू धर्माला मानणारे मानले जातात. भारतातून इराणमार्गे यूरोपात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे धर्मांचे पालन सुरु केले.  आज रोमा समुदायातील काही लोक ख्रिश्चन तर काहींनी मुस्लिम धर्म स्विकारला आहे.

त्यांची संस्कृतीही वेगवेगळ्या धर्म आणि पंथांनी प्रभावित असल्याचे दिसते.

रोमा समुदायाने यूरोपात स्थायिक होताना अनेक अत्याचार सहन केले होते. नाझी काळात यांना वंशभेदाचे चटकेही सहन करावे लागले होते.  इतिहासकारांच्या मते यादरम्यान २,२०,००० ते ५,००,००० रोमा लोकांना नाझींच्या छळामुळे जीव गमवावा लागला होता.

 

roma-marathipizza03
businessinsider.com

 

रोमा समुदायात बालविवाह प्रथा ही सामान्य बाब समजली जाते. या समुदायातील पाच वर्षांच्या मुलीच्या लग्नाच्या घटनेची मोठी चर्चा झाली होती. या मुलीचे ११ वर्षाच्या मुलासोबत लग्न लावून देण्यात आले होते.

सेंट्रल आणि इस्टर्न यूरोपातील बुल्गेरिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी या भागात रोमा समुदायाचे लोक आढळून येतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?