ज्या ठिकाणी सूर्यच मावळत नाही, तिथे रोजे कसे सोडत असतील?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

रमजानचा पवित्र महिना सुरु आहे, ह्या दरम्यान मुस्लिम बांधव हे रोजा ठेवतात. रोजा असताना पूर्ण दिवस त्यांना उपवास धरावा लागतो. ते पण तोपर्यंत जोवर सूर्य मावळत नाही. मे महिन्यात जेव्हा सूर्य एवढा तापत असतो.

ह्या दरम्यान रोजा ठेवणे मुस्लिमांना खरंच कठीण जात असेल. पण तुम्ही कधी अश्या ठिकाणाबद्दल ऐकले आहे का, जिथे सूर्य मावळतच नाही? तिथे हे लोक रोजा कसे ठेवत असतील?

 

roza-inmarathi02.jpg
indianexpress.com

आपल्याकडे म्हणजे भारतात उन्हाळ्यात सूर्य हा १६-१७ तासानंतर मावळून जातो. पण जिथे सूर्य फक्त ५५ मिनिटांसाठीच लपत असेलं तिथले मुस्लिम बांधव रोजा कसे ठेवत असतील?

आर्क्टिक सर्कलमध्ये राहणाऱ्या लोकांना २४ तास सूर्याच्या प्रकाशात राहावे लागते. तिथे राहणारे मुस्लिम हे रोजा कसे पाळत असतील? म्हणजे ते कधी सहरी खाणार आणि कधी इफ्तार करणार? कधी नमाजपठण करणार, कधी तरविह करणार?

 

roza-inmarathi
latestly.com

फिनलंड आणि स्वीडन हे देखील असेच देश आहेत जिथे सूर्य का खूप कमी वेळेकरिता मावळतो. फिनलंड येथे राहणाऱ्या मुस्लिमांची संख्या ५.५ मिलियन म्हणजे इथल्या लोकसंख्येच्या ३ टक्के आहे.

इथे वर्षातून ३६५ दिवसांपैकी उन्हाळ्यात ७३ दिवस सूर्य राहतो. तर स्वीडन येथे ६ लाख मुस्लीम वास्तव्यास आहेत.

 

roza-inmarathi01
dnaindia.com

इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार नॉर्दन फिनलंडमध्ये उन्हाळ्याच्या काळात सूर्य केवळ ५५ मिनिटांसाठी मावळतो. येथे दिवस सकाळी १:३५ ला सुरु होतो तर १२:४० ला संपतो. म्हणजे येथे राहणाऱ्या मुस्लिमांना फक्त ५५ मिनिटे मिळतात.

ज्यात त्यांना जे खी खायचे प्यायचे असेलं ते करू शकतात. म्हणजेच त्यांना २३ तास ५ मिनिटांपर्यंत रोजा ठेवावा लागतो. विचार करा तिथे राहणाऱ्या लोकांना किती ह्याचा किती त्रास होत असेल.

जिथे सूर्य मावळतच नाही तिथे लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरून आपली कामे पूर्ण करतात. काही ठिकाणी वेळेनुसार रोजा ठेवला जातो. जे मुस्लीम लैपलंदडमध्ये राहतात त्यापैकी अनेकजण हे मिडिल इस्टच्या टाईम टेबलला फॉलो करतात.

 

roza-inmarathi03
whatinindia.com

सर्वच देशात रोजाची वेळ ही सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यावर अवलंबून असते. त्यामुळे ती सगळीकडे वेगवेगळी असते. एकाच देशात देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी रोजा पाळला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?