' जाहिरातींना भुलून ROचं पाणी “शुद्ध, आरोग्यदायी” समजून पिताय? थांबा! हे “सत्य” जाणून घ्या…! – InMarathi

जाहिरातींना भुलून ROचं पाणी “शुद्ध, आरोग्यदायी” समजून पिताय? थांबा! हे “सत्य” जाणून घ्या…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे “पाणी”. पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो. निरोगी आयुष्यासाठी नियमित आणि पुरेसं पाणी प्यायलाच हवं. शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर विविध आजार होऊ शकतात. शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी पाण्याची मदत होते.

आपल्या शरीरात सुमारे ६०% पाणी असते. आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर डॉक्टर आपल्याला सर्वप्रथम पाण्याचे प्रमाण वाढवा असं सांगतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा सतेज राहण्यास मदत होते याशिवाय पचनक्रिया सुद्धा सुधारते. त्यामुळे रोज कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे.

 

water InMarathi

 

थेट नळातून येणारे पाणी आपण पित नाही. पाण्यात असलेले जंतु मारण्यासाठी पाणी शुद्ध करण्याची गरज असते. पूर्वी आपण पाण्यातील जंतु मरावे यासाठी पाणी दहा मिनिटे उकळायचो. त्यामध्ये तुरटी फिरवली जायची. अनेक घरगुती उपाय केले जायचे.

आज, अनेक ठिकाणी ROचं पाणी प्यायलं जातं. ROची जाहिरात करताना हे पाणी “शुद्ध-आरोग्यदायी” आहे अशी केली जाते.

पण, खरंच हे पाणी तितकं शुद्ध असतं का? जाणून घेऊया, ROच्या पाण्याची सत्यता…!

काय आहे RO? 

RO म्हणजेच Reverse Osmosis. पाणी शुद्ध करण्याची ही एक प्रक्रिया आहे. आपल्या घरात RO मशिन लावलेली असते पण, RO नेमकं कसं काम करतं हे आपल्याला माहीत नसतं.

ROचं पाणी हे शुद्ध, आरोग्यदायी असतं असा आपला समज आहे. ROची नेमकी प्रक्रिया कशी आहे हे समजून घेतल्यानंतरच आपल्याला या प्रक्रियेचे दोष लक्षात येतील.

ROचे पाणी हे मानवी शरीरासच नाही तर पर्यावरणाला सुद्धा घटक आहे. ROमध्ये प्रेशरने पाण्यातील जीवजंतू काढले जातात. या मशीनमध्ये विविध थरांमधून पाणी जातं आणि त्यातील जीवजंतू किंवा घाण बाहेर काढली जाते. पण, पाण्याच्या शुद्धीकरणासोबतच RO संदर्भातील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

 

RO water inmarathi
bangood

 

“नळातून येणाऱ्या पाण्यात अनेक अशुद्ध घटक असतात. पण, ROचे पाणी माणसाच्या शरीरास जास्त हानिकारक आहे. नळातून येणाऱ्या अशुद्ध पाण्यापेक्षा या पाण्याने आरोग्यास जास्त धोका संभवू शकतो”,असं वैज्ञानिक सांगतात.

 

ROचे पाणी का पिऊ नये?

 

side-effects-ro-water inmarathi
BestROwaterpurifier.com

 

ROमध्ये पाण्यातील ९०% पेक्षा जास्त अशुद्ध घटक काढले जातात. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मिनरल्सचा सुद्धा समावेश असतो. यामध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक जीव पण काढून टाकले जातात. सोडियम,फ्लोराइड, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम या घटकांची मानवी शरीराला गरज असते. पण, ते सुद्धा यामध्ये काढून टाकले जातात.

ROच्या पाण्यात कोणतेच इलेक्ट्रोलाइट्स नसतात. त्यामुळे हे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवू शकत नाही. ज्या पाण्यावर कोणतीच प्रक्रिया केलेली नसते ते पाणी सुद्धा शरीराला हायड्रेटेड ठेऊ शकते पण, ROच्या पाण्यात ती क्षमता नसते.

जेव्हा, ROमध्ये पाण्यावर प्रक्रिया केली जाते तेव्हा त्यामधले महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स पण काढून टाकले जातात. ज्या पाण्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स नसतात ते पाणी शरीराला फार वेळ हायड्रेटेड ठेऊ शकत नाही.

ROमध्ये पाणी फिल्टर होताना त्यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम ९० ते ९९% नष्ट होते. हे पाणी जास्त वेळ प्यायल्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे हृदयासंबंधीचे विकार होऊ शकतात.

सतत थकवा जाणवणं, डोकेदुखी, मानसिक थकवा हे सगळे आजार या पाण्यामुळे होऊ शकतात.

कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम हे दोन घटक शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. कॅल्शिअम हे दातांसाठी आणि हाडांसाठी महत्त्वाचे आहे.

 

water health-inmarathi03

 

WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनिझेशनने दिलेल्या रिपोर्टनुसार, “ROचे पाणी हे मानवी आरोग्याला घटक आहे.” आपण पाण्यातील अशुद्ध घटक काढले जातात, असाच विचार करतो पण, नेमके कोणते घटक काढून टाकले जातात याकडे आपण लक्ष देत नाही.

WHOच्या रिपोर्टनुसार, ROमध्ये पाणी फिल्टर होताना शरीराला जे घटक लागणार आहेत ते सुद्धा काढले जातात.

आता आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की, फक्त पाण्यातूनच हे महत्त्वाचे घटक मिळतात का? इतर पदार्थांमधूनसुद्धा आपण शरीराला आवश्यक असणारे घटक मिळवू शकतो.

पण, आपली आधुनिक जीवनशैली इतकी वेगळी झाली आहे की, आपल्या जेवणात हे मिनरल्स कमी प्रमाणातच आढळतात. त्यामुळे जेवणातून हे मिनरल्स पोटात गेले नाही तर निदान पाण्यात तरी त्यांचा समावेश असावा.

१९६० पासून करण्यात येणाऱ्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की, ज्या पाण्यात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी असते असे पाणी पिणे म्हणजे अनेक त्रासांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

 

कॅल्शियमची कमतरता असलेले पाणी प्यायल्याने होणारे आजार –

 

water-marathipizza03
surrey.ca

 

१) खेळताना आपटल्याने हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते.

२) मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.

३) दिलेल्या तारखेच्या आधी बाळाचा जन्म होणे (प्री टर्म बर्थ)

४) जन्माच्या वेळेस नवजात शिशूचे वजन कमी असणे.

५) कर्करोगाची शक्यता वाढते.

६) अकाली मृत्यू येणे.

७) अल्सर, कावीळ यासारखे आजार.

 

ROचे पाणी स्वयंपाकासाठी वापरले तर? 

 

good food-inmarathi05
carbonrally.com

 

ROचे पाणी जेवण बनवताना वापरले तर, अन्नतील महत्त्वाचे घटक नष्ट होतात. ROच्या ऐवजी जर जेवण बनवताना मिनरल वॉटर वापरले तर, पाण्यातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण टिकून राहते.

आपल्या जेवणात आधीच अनेक घटकांचा अभाव असतो. अशातच, आहेत-नाहीत ते सगळॆ घटक नष्ट करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आजकाल, अनेक RO मशीन्समध्ये TDS कंट्रोलर्स लावलेले असतात. TDS म्हणजे पाण्यात विरघळलेले सूक्ष्म पदार्थ. हे पदार्थ RO प्रक्रिया होताना काढून टाकले जातात. हे पाणी अत्यंत हानिकारक आहे असं समजण्याची गरज नाही कारण, हे पाणी विषारी नाही. पण, याबाबतीत थोडं सतर्क राहण्याची गरज आहे. कंट्रोलरमध्ये आपण आपल्या गरजेनुसार ही मात्रा सेट करू शकतो.

असं केल्यास या पाण्यापासून धोका संभवत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?