ग्राहकांचे “हे” अधिकार कदाचित तुमच्या बँकेने तुम्हाला आजवर सांगितले नसतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
बँक हे ठिकाण काही वेगळेच असते, कारण तिथे जाण्यासाठी कितीही कंटाळा आला असला तरी काही महत्त्वाचे काम असल्यास आपल्याला तिथे जाणे भाग पडते. बँकेची कामे करणे सर्वांसाठीच सोप्पी नसतात. काहींना ही कामे करण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
नवीन खाते उघडणे, लोन घेणे यांसारख्या आणि इतर अनेक बँकेशी जोडलेल्या कामांना करण्यासाठी बहुतेक लोकांना अडचणी येतात.
ग्राहकांना बरेचदा आपल्या अधिकारांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे त्यांना या समस्या निर्माण होतात.
या अडचणींपासून सुटका होण्यासाठी रिजर्व बँकेकडून तयार करण्यात आलेले बँकिंग कोड्स अँड स्टॅन्डर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआई) ने बँक ग्राहकांना खूप सारे अधिकार दिले आहेत. आम्ही तुम्हाला अश्या १० अधिकारांविषयी सांगणार आहोत, जे लक्षात घेऊन तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता..

१. खाते उघडण्याचा अधिकार…
कोणतीही बँक फक्त स्थायी पत्ता नसल्याने देशामध्ये कोठेही राहणाऱ्या भारतीय नागरिकाचे खाते उघडण्यासाठी कधीही नकार देऊ शकत नाही.

२. फंड ट्रान्सफरचा अधिकार…
कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेमधून नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) च्या माध्यमातून ५०,००० रुपयापर्यंतची रक्कम कोणत्याही इतर बँकेच्या खात्यामध्ये जमा करू शकतो. त्यासाठी संबंधित बँकेमध्ये त्या व्यक्तीचे खाते असणे गरजेचे नाही.

३. चेक कलेक्शन उशीरा झाल्यास भरपाई…
चेक कलेक्शनमध्ये बँकेकडून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्यावर ग्राहकांना भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. भरपाईची रक्कम साधारण व्याज दराच्या हिशोबाने चुकवली जाईल.

४. सिक्युरिटी परत मिळवण्याचा हक्क…
जर एखाद्या ग्राहकाने बँकमधून लोन घेतले आहे आणि त्यासाठी सिक्युरिटी दिली असेल, तर या प्रकरणामध्ये पूर्ण लोन फेडल्यानंतर १५ दिवसांच्या आतमध्ये सिक्युरिटी परत मिळाली पाहिजे.

५. सूचनेचा अधिकार…
बँक आणि तुमच्यामध्ये झालेल्या करारामध्ये जर बँकेने कोणताही बदल केला, तर बँकेला असे करण्याच्या ३० दिवस आधी नोटीस पाठवून तुम्हाला त्याची माहिती देणे गरजेचे आहे.
६. अनधिकृत पैसे काढल्यास ग्राहक दोषी नाही…
ग्राहकाच्या बँक खात्यामधून अनधिकृत काढलेल्या पैशांसाठी ग्राहकाला दोषी ठरवता येत नाही. त्याला सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेची असते.

–
- तुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!
- बँक खात्यातील किमान सरासरी रक्कम (Average Minimum Balance) कशी ठरवली जाते? वाचा..
–
७. नकार देण्याचे कारण जाणून घेण्याचा अधिकार…
जर बँक कोणतीही सुविधा देण्यासाठी नकार देत असेल, तर ग्राहकाला त्यामागचे कारण जाणून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.

८. थर्ड पार्टी प्रोडक्ट्स…
कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाला जबरदस्ती थर्ड पार्टी प्रोडक्ट्स विकू शकत नाही. थर्ड पार्टी प्रोडक्ट म्हणजे असे उत्पादन जे संबंधित बँकेचे नसते. दुसऱ्या कुठल्यातरी कंपनीने ते उत्पादन बँकेला विकण्यासाठी दिलेले असते आणि बँकेला ते विकण्याचा मोबदला दिला जातो.

९. गुप्तता ठेवण्याचा अधिकार…
ग्राहकांची खाजगी माहिती गुप्त ठेवणे बँकेची प्रमुख जबाबदारी आहे. बँक तुमची खाजगी माहिती तुमच्या संमतीशिवाय कोणालाही सांगू शकत नाही.

१०. तक्रार निवारण अधिकार…
बँकेला ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचे पालन करणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे बँकेचे काम आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या हितासाठी हे अधिकार निश्चित केले आहेत. या अधिकारांच्या विरोधात न जाता प्रत्येक बँकेने ग्राहकांना सेवा द्यावी असेही निर्देशित केले आहे.
तुमच्या बँकेत तुमच्या किंवा इतरांच्या बाबतीत या अधिकारांचे हनन होताना दिसून आले तर थेट वरिष्ठांकडे जा. सुलभ बँकिंग का ग्राहकांचा हक्क आहे आणि हा हक्क पूर्ण करायला बँका बांधील असतात.
–
- बँक ग्राहकांना कर्ज देताना व्याजदर कसा ठरवते ? जाणून घ्या..
- बँकेतील लॉकरवरच दरोडा पडला तर? तुमचा मौल्यवान ऐवज सुरक्षित करण्याच्या १० टिप्स
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Loan repayment related rules