मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात मुलं ह्या ५ गोष्टी करतात – आणि फसतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मुलींना इम्प्रेस करायचं म्हटलं तर मुलं काहीही करायला तयार असतात. काही त्यांना स्पेशल फील व्हावे यासाठी त्यांच्यासाठी सरप्राईज देतात तर काही वेगवेगळ्या पद्धतींनी आपले प्रेम व्यक्त करत असतात. ते नेहेमी मुलींना इम्प्रेस करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण अश्यातच काही मुलं चुकतात आणि आपल्या क्रशला किंवा डेट ला इम्प्रेस करण्याच्या नादात जे नाही तेही करून बसतात. म्हणजे खोटं बोलणार, उगीचच स्वतःला अति दाखविण्याचा प्रयत्न करणार वगैरे.

चला तर, जाणून घेऊया की मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं काय काय करतात ज्यावर विश्वास ठेवणे अवघड असू शकते.

१. उगीच प्रशंसा करणे :

 

date-inmarathi
zikoko.com

जर कोणाची तारीफ योग्य पद्धतीने केली तर कोणाचाही दिवस सहज चांगला जातो. कोणाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. म्हणून जर तुम्हाला कुठल्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता. पण जो खोटी प्रशंसा करतात ते कोणालाही आवडत नाहीत. असे लोक प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रशंसा करत बसतात जे कधीकधी इरिटेटिंग वाटायला लागलं.

२. आवड-निवड एकसारखी आहे असे भासवणे :

 

date-inmarathi01
thehansindia.com

जर पहिल्याच भेटीत तुम्ही हे बघून आनंदी आहात की, तुम्ही ज्याला भेटल्या त्याची आणि तुमची आवड-निवड किती एकसारखी आहे. तर जरा सावध व्हा, कारण अनेक पुरुष आपल्या डेटला खुश करण्यासाठी अश्याप्रकारे खोटं बोलतात. त्यामुळे जर कोणासोबत तुमची अगदीच आवड-निवड जुळत असेल तर त्यांना एकदा त्याबाबत डिटेलमध्ये विचारून बघा. मग ते खरं बोलत आहेत की खोटं हे तुम्हाला कळून जाईल.

३. एक्स किती वाईट होती हे सांगणे :

 

date-inmarathi05
memoirsbymide.wordpress.com

काही लोक स्वतःला डिफेंड करण्यासाठी मी किती बरोबर आणि दुसरे किती चुकीचे आहेत हे दाखविण्यासाठी आपल्या एक्स गर्लफ्रेंड किंवा परीस्थितींना दोष देऊन मोकळे होतात. ते तुम्हाला त्यांच्या भूतकाळाची दुखद कहाणी सांगतील जेणेकरून त्यांना सिम्पथी मिळेल. त्यामुळे कोणाच्याही गोष्टींवर डोळेझाकून विश्वास ठेवू नये. आधी त्याबाबत पुरेपूर माहिती मिळवून घ्यावी.

४. स्वतःला जे नाही ते दाखवणे :

 

Gentleman in the company of two sexy women
thehansindia.com

अनेकांना ही सवय असते, स्पेशली मुलांना. आपल्या पगाराबाबत खोटं बोलणे किंवा स्वतःला एकदम हायफाय दाखविणे हे खूप कॉमन आहे. आताच्या जगात सर्वच फक्त प्रिटेंड करत असतात. पण हे ते खूप काळ टिकवून ठेवू शकत नाही. काही दिवसांनी त्याचं पितळ उघडं पडत आणि त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर येतो.

५. गर्लफ्रेंडचे मित्र-मैत्रीण न आवडणे :

 

date-inmarathi03
pinterest.com

अनेकांना आपल्या प्रेयसीचे मित्र-मैत्रीण आवडत नसतात. भलेही ते तुमच्यासमोर त्यांच्याशी चांगलं वागतील किंवा चांगलं बोलतील पण मनातून त्यांना त्या मित्र-मैत्रिणींबद्दल रोष असतो, जो ते दाखवत नाहीत. ह्यातही ते खोटं वागू शकतात.

त्यामुळे अश्या मुलांपासून जेवढं दूर राहाल तेवढंच चांगल…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?