चंद्रग्रहणाबद्दलच्या अत्यंत हास्यास्पद अंधश्रद्धा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अवकाशात घडणाऱ्या अनेक घटनांनी माणसाला सुरुवातीपासून कोड्यात टाकले आहे. या घटनांच्या कुतुहलापायी माणसाने अनेक शोध लावले. अफाट तर्कशक्ती आणि उपलब्ध साधनांच्या बळावर तो आकाशातील घटनांचे अचूक अंदाज लावायला शिकाला. आणि त्याने त्या गोष्टी स्वतःच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असा कयास बांधण्यास सुरुवात केली. आणि यातून अनेक ही अंधश्रद्धांचा जन्म झाला.

 

Space-Universe-inmarathi
cdn.bloody-disgusting.com

ग्रहणाच्या बाबतीतही अशा अनेक अंधश्रद्धा आजही पाळल्या जातात. ग्रहण ही अवकाशात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचा पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाच्या नशिबावर, दैनंदिन कामावर, त्याच्या शुभ अशुभावर काही परिणाम होत असतो हे असे म्हणणे हे कितपत विज्ञाननिष्ठ आहे? या अंधश्रद्धा कशा चूक आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रथम ग्रहण होते म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेऊयात..


ग्रहण म्हणजे काय?

ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रांगेमध्ये येतात. त्यावेळी जर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, तर त्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचे तेज कमी होते. त्यावेळी चंद्र हा तांबूस – भुरकट रंगाचा दिसतो. पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला, तर खग्रास चंद्रग्रहण घडते आणि जर सावली अर्धवट पडली, तर खंडग्रास चंद्रग्रहण घडते.

 

lunar-eclipse-inmarathi
latimes.com

असेच काहीसे सूर्यग्रहणाच्या देखील आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जर चंद्र आला, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे त्या भागातून सूर्य थोडा झाकल्यासारखे दिसतो म्हणजेच सूर्यग्रहण घडते.  जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

 

solar-eclipse-inmarathi
img.patrika.com

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.

आज ३१ जानेवारी २०१८, आजही चंद्रग्रहण दिसणार आहे आणि हे २०१८ चे पहिले चंद्रग्रहण आहे.

चंद्रग्रहणामध्ये वेगवेगळ्या परंपरा मानल्या जातात. काही गोष्टी न करण्यास घरातील थोरामोठ्यांकडून सांगितले जाते. जेव्हा चंद्रग्रहण लागते तेव्हा कोणत्याही देवी-देवतांचे दर्शन घेणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी देवी-देवतांना कपाटात बंद करून ठेवले जाते आणि पूजेचे कोणतेही वाक्य बोलले जात नाही. याव्यतिरिक्त या दिवशी गर्भवती स्त्री, वृद्ध यांना औषध देखील दिले जात नाही. ग्रामीण भागात तर ही अंधश्रद्धा घरोघरी कसोशीने पाळली जाते.

चंद्रग्रहणाच्या दिवशी गर्भवती स्त्रीला कोणतेही काम न करण्याचा आणि घरातून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला जातो.

 

lunar-eclipse-superstitions-inmarathi
nace.igenomix.co.in

तसेच सगळीकडे घरामध्ये तुळशीची पाने टाकली जातात. भारतात चंद्रग्रहणाविषयी वेगवेगळ्या मान्यता आहेत. पण विज्ञानाच्या दृष्टीने त्या सत्य नाहीत हे आजवर झालेल्या प्रयोगांच्या आधारे म्हणावे लागेल. यामागे काही खगोलशास्त्र आहे, जे आपण वरील सारांशामध्ये पाहिले.


गर्भवती महिलांना या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये खूप जपले जाते. त्यांना घरातील ज्येष्ठ स्त्रियांकडून वेगवेगळे सल्ले दिले जातात. पण या सर्व नेहमीच अंधश्रद्धा असल्याचे दिसून आले आहेत, कारण या गोष्टी न करण्याची जी करणे सांगितली जातात यामागे काही ठोस आणि तर्कसंगत पुरावा असा नाही.

परंपरेनुसार जे चालत आलेले आहे, तेच आपण पुढे चालवतो. ग्रहणात कितीतरी  गोष्टी न  करण्यास सांगितले जाते. पण जरी आपण त्या केल्या तरीदेखील त्यामुळे आपले नुकसान होत नाही. अजून एक ग्रहणाबाबत गैरसमज म्हणजे, ग्रहणात बुटक्या माणसाला ओढल्यास तो लांब होतो. उंच आणि ठेंगणा होणे हे माणसाच्या शरीराच्या वाढीवर अवलंबून असते. असे ग्रहणात वाढून माणसे उंच होऊ लागली असती, तर आज आपल्याला कोणताही ठेंगणा माणूस दिसला नसत.

जे लोक हे पाळत नाहीत किंवा ज्यांचा यावर विश्वासच नाही अशा लोकांना देखील त्याचे काही नुकसान होत नाही. त्यामुळे या सर्व दंतकथा असल्याचे उघड आहे.

मुळात पृथ्वीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तार्यांच्या एकमेकांच्या सावलीखाली येण्याने माणसाच्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होतो हा दावाच अनाकलनीय आहे. जयंत नारळीकर यांच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांनी सांगूनही आपण त्यांचे मत विचारात घ्यायला आणि विवेकी वागायला तयार नाही. भारतीय लोक अशा अंधश्रधांना तिलांजली देऊन जितक्या लवकर विवेकवादाची आणि विज्ञानाची कास धरतील तितके ते जास्त प्रगतीकडे जाणार आहेत.

 

solar-eclipse-watching-inmarathi
home.bt.com

ग्रहणाला दान मागण्याची एक प्रथा आपल्याकडे आहे. यावेळी आपल्या विचारांना लागलेलं अंधश्रद्धांचे ग्रहण सुटावे आणि अज्ञानाची सावली जाऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा असे दान मागायला हवे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?