हसताय ना? हसायलाच पाहिजे ! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सनातन संस्था हे नाव आता सर्वांना परिचित आहे. सनातन संस्था ही एक अशी संघटना आहे जी हिंदू जनजागृती व हिंदुत्व संरक्षणाचे कार्य करते. त्यासाठी सनातन संस्था हिंदूंना धर्म आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त करते. हिंदूंना वेगवेगळ्या पूजापाठ, कर्मकांड याचे “शास्त्रीय” दाखले देऊन कार्य समजावून सांगते. हे “शास्त्रीय” दाखले देताना ते त्याला ईश्वरी चमत्कार देखील म्हणतात ही गोष्ट वेगळी, परंतु जर आपण जवळून बघितलं तर सनातन संस्थेने केलेले दावे अगदी हस्यास्पद वाटतात.

सनातन संस्थेचे गुरू आठवले यांनी मांडलेल्या तत्वज्ञानाला सत्य सिद्ध करण्यासाठी या संस्थेचे साधक विविध शास्त्रीय मार्गांचा अवलंब करत असतात. पण हे मार्ग किती शास्त्रीय असतात व शास्त्राच्या कोणत्या concepts घेऊन मांडलेले असतात, याबद्दल मात्र बोलायलाच नको. तर आज आपण सनातन या संस्थेच्या अश्याच काही शास्त्रीय दाव्याची माहिती घेऊ!

 

sanatan-inmarathi
facebook.com

उर्जा पकडणारा थर्मल स्कॅनर :

तर सर्वात पाहिले सुरुवात करूयात नामजपाच्या पद्धतीने. सनातनच्या म्हणण्यानुसार हिंदूंनी दिवसातून २१ वेळा तरी नामजप केला पाहिजे. तसे केल्याने म्हणे शरीरात रक्तसंचार वधारतो आणि तम नाहीसा होतो व व्यक्तीच्या मेंदूतले चक्र स्थिर होते व आजूबाजूला पॉझिटिव्हीटी निर्माण होते. आणि हो, पॉझिटिव्हीटी मोजण्यासाठी सनातन संस्थेकडे यंत्र देखिल आहे!

या यंत्राचे नाव आहे “यु.टी.एस”अर्थात युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर. अश्या प्रकारचं यंत्र खरंच अस्तित्वात आहे का नाही याबाबतीत मात्र खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही, जरी असेल तर ऊर्जा कोणत्या युनिट मध्ये मोजली याबद्दल कसलीच माहिती देण्यात आली नाही.

 

sanatan1-inmarathi
sanatan.org

साधकांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या अग्निरुपी ऊर्जेचा साठा असतो जो वेळोवेळी बाहेर येत असतो आणि थर्मल स्कॅनर ती ऊर्जा पकडते. नामजप केल्याने शरीरातील पवित्र अग्नी वृद्धिंगत होत जाते व वातावरण आजून शांत, निरामय होत जाते व पॉझिटिव्हीटी वाढून मनशांती लाभते आणि हे वैज्ञानिक दृष्ट्या साधकांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे हिंदूनी २१ वेळा, काम धंदा सोडून नामजप केलाच पाहिजे !

मृत्यूनंतरही रोज जेवायला येणारे सद्गुरू :

सनातन संस्थेचे सद्गुरू मृत्यूनंतरही रोज जेवायला येतात असा आश्चर्यकारक दावा देखील सनातनचे साधक करतात. त्यांचा माहितीनुसार आठवले जिवंत असताना त्यांची एक साधक त्यांचा साठी जेवणाचा डबा आणायची परंतु त्यांचा जाण्यानंतर देखील रोज त्या डब्ब्यात उष्टे अन्न सापडते. तर सनातन संस्थेच्या दाव्यानुसार आठवले हे भगवान विष्णुंचे अवतार होते व ते आजही सनातनच्या कार्यावर नजर ठेवून आहेत व रोज साधिकेच्या हातचे भोजन करावयास येतात.

या दाव्याला समर्थन म्हणून त्यांनी युटीएस ने आजूबाजूचा पॉझिटिव्हीटीला मोजले आहे व त्यांचा मताने जेवणाच्या वेळी त्या डब्ब्याजवळची ऊर्जा प्रचंड असते की साधारण माणूस ती झेलू शकत नाही. मग हे साधक ही ऊर्जा कशी झेलतात हे मात्र काही कळू शकलं नाही आहे.

(म्हणे) स्त्री मंदिरातल्या प्रचंड पॉझिटिव्ह उर्जेला झेलू शकत नाही :

मंदिरात मासिकपाळी असलेल्या स्त्रीने प्रवेश का करू नये यावरही सनातनच्या साधकांकडे उत्तर आहे. त्यांचा मते मासिकपाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरात रजोगुण वाढीस लागतो. ज्यामुळे स्त्री मंदिरातल्या प्रचंड पॉझिटिव्ह उर्जेला झेलू शकत नाही त्याने तिच्या शरीराची हानी देखील होते ! यासाठी सुद्धा त्यांनी युटीएस या या यंत्राचा उपयोग केला आहे.

 

sanatan.org

याबरोबरच स्त्रीच्या रक्तात मासिकपाळीच्या काळात तम गुण निर्माण होतात जे मंदिराच्या गाभ्यात असलेल्या पारलौकिक ऊर्जेचा सर्वनाश करतात, त्यामुळे स्त्रियांनी मंदिरात जाऊ नये व स्वयंपाक बनवू नये कारण जेवणावाटे ते गुण पुरुषाच्या शरीरात प्रवेश करतात आणि ते सहन करण्याची ऊर्जा पुरुषाच्या शरीरात नसते त्यामुळे त्याला आजारपण येतं. साधकांच्या माहितीनुसार हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालं आहे .

यु.टी. एस या अभिनव यंत्राचा वापर सनातनचे साधक व पूर्वाश्रमीचे थोर वैज्ञानिक मकरंद यांनी ग्रहण व त्याचे साधकांवर होणारे परिणाम याचा शोध घेण्यासाठी केला असून त्यांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की राशीनुसार ग्रहणाचे वेगवेगळे परिणाम शरीरावर होत असतात. या साठी दोन साधकातील ऊर्जेचे मोजमाप युटिएस या अभिनव यंत्राद्वारे करण्यात आले व फरक जाणवला असा दावा सनातन करते.

याच सनातनच्या साधक वैज्ञानिक व्यक्तीचा सांगण्यानुसार त्याने परोतपर गुरू श्री श्री आठवलेच्या ग्रहणाआधीच्या, ग्रहणादरम्यानच्या व ग्रहणानंतरच्या अवस्था व ऊर्जेचे मूल्यमापन केले तेव्हा त्यांच्या शोधयंत्राच्या मर्यादेपेक्षा जास्त ऊर्जा व बदल त्यात झाले असून संपूर्ण विश्वाची ऊर्जा जगतगुरू आठवलेंच्या शरीरात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

uts-inmarathi
sanatan.org

ग्रहणाच्या वेळी बाहेर निघायला नको कारण वाईट प्रादुर्भाव पडतो असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे व या सर्व संशोधनासाठी व अश्या अनेक संशोधनासाठी त्यांनी यु.टी. एस यंत्राचा वापर केला आहे. जेव्हा आम्ही या थर्मल स्कॅनर ची माहिती काढली तर कळून चुकले की हे यंत्र जंगलात रात्रीच्या वेळी उष्ण रक्ताच्या प्राण्यांना टिपण्यासाठी वापरतात, Infra red कॅमेरा देखील याच technology पासून बनवण्यात आला आहे. पण यापासून सुप्त उर्जाचे संशोधन भारतात सनातन द्वारेच करण्यात आले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “हसताय ना? हसायलाच पाहिजे ! सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग – भाग १

 • August 10, 2018 at 3:48 pm
  Permalink

  आपण आपला वेळ destructive कारणासाठी वाया घालवतो आहे असे नाही का वाटत तुम्हाला?. तुम्हाला कोण funding करतय हे सांगू शकाल का?.इतर धर्मा विषयी का बोलत नाही. आम्ही समजू शकतो.

  Reply
 • August 11, 2018 at 10:33 am
  Permalink

  या हसण्याच्या सवयी मुळेच आपण भारतीय मागे पडलो आहोत. आपल्या संस्कृत भाषेवरील संशोधन सुद्धा अमेरीकेत चालते यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ॉ काय असू शकते. आपण असेच दुसर्याला हसत राहणार. बाकी लेख एकदम मस्त BBC ला देण्याच्या लायकीचा.

  Reply
 • May 5, 2019 at 11:45 am
  Permalink

  काही गोष्टी असू शकतात ना खर्या … लेखक बहूतेक arts side चा आहे .. ऊर्जा म्हणजे काय हे आधी समजून घ्या . यानूसार मग तर Einstein वर पण हसायला पाहीजे . फक्त अमेरीकेत एखादी गोष्ट सिद्ध झालि तरच खर मानायच ? ..लेखकाने स्वतः च्या आजीला कींवा आईला विचारावे मंदीर प्रवेश का नाकारतात , मग त्याला काही गोष्टी समजतील .

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?