नवऱ्यांनो, “दोघात तिसरा” नको असेल तर बायकोला घरकामात मदत करा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एकेकाळी असे मानले जायचे आणि व्हायचे देखील की, एक पुरुषच नेहमी स्त्रीचा विश्वासघात करू शकतो. केवळ पुरुषच त्यांच्या पत्नीला धोका द्यायचे. कारण कदाचित स्त्रिया तेव्हा एवढ्या सक्षम किंवा साहसी नसाव्यात की, त्या आपल्या पतीशिवाय आणखी कुणाचा विचारही करू शकतील. पण आता तो काळ राहिलेला नाही.

 

husband housework-inmarathi05
flickr.com

नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या वाढत्या संख्येने आज पती-पत्नीच्या ह्या नात्याला देखील एका समान पातळीवर आणले आहे. आता पत्नी जर बाहेर जाऊन नोकरी करत असेल, कमवत असेल तर पती देखील तिची घरकामात मदत करताना दिसतो. पण हे दृश्य आपल्याला सर्वत्र बघायला मिळत नाही. खूप कमी पुरुष असे आहेत, जे नोकरी करत असलेल्या आपल्या पत्नीची घरकामात मदत करतात.

जे पती त्यांची मदत न करता सर्वकाही त्यांनीच करावं अशी अपेक्षा ठेवतात अश्यांच्या पत्न्या त्यांना धोका देताना, त्यांचा विश्वासघात करताना जराही विचार करत नाहीत.

 

husband-housework-inmarathi02.jpg
drlinaman.com

आणि हे आम्ही नाही तर एक रिसर्च सांगत आहे. नुकत्याच झालेल्या एका फ्रेंच स्टडीनुसार जर कुठला पती आपल्या पत्नीची घरकामात मदत करत नसेल, तर ती आपल्या पतीला धोका करू शकते. पण हे आपल्या देशात तर शक्यच नाही. कारण पुरुषाने बाहेरचे काम करावे, पैसे कमवावे आणि स्त्रियांनी घरकाम करावे अशीच आपली संस्कृती आहे. आज जरी स्त्रिया घरातून बाहेर पडत नोकरी करत असल्या तरी पुरुष मात्र अजूनही हवे तेवढे घरकामात सहभागी झालेले भारतात तरी बघायला मिळत नाही.

 

husband housework-inmarathi
dailymail.co.uk

फ्रान्समध्ये झालेली ही रिसर्च एका एक्स्ट्रा मॅॅरिटल डेटिंग वेबसाइट ग्लाइडनने स्त्रियांवर केली. ह्या रिसर्च दरम्यान स्त्रियांनी सांगितले की, जर त्यांचे पती त्यांना घरकामात म्हणजेच बाथरूम स्वच्छ करणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे इत्यादी सर्व कामात त्यांची मदत करत नसतील, तर त्या कदाचित त्यांचा विश्वासघात करू शकतात.

ह्या रिसर्च दरम्यान पुरुषांना घरातील साफ-सफाई तसेच भांडे वगैरे घासून स्त्रियांचं मन जिंकण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

 

husband housework-inmarathi03
omaha.com

फ्रान्समध्ये झालेला हा अभ्यास भारतात कितपत ग्राह्य धरला जाऊ शकते ह्यावर तर प्रश्नचिन्ह आहेच. तरी जर स्त्रियाही नोकरी करत असतील तर प्रत्येक पुरुषाची ही जबाबदारी आहे, की त्याने आपल्या पत्नीची घरकामात मदत करावी, जेणेकरून त्यांना देखील स्वतःसाठी जरा वेळ मिळू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “नवऱ्यांनो, “दोघात तिसरा” नको असेल तर बायकोला घरकामात मदत करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?