डास चावल्याचे फोड घालवण्यासाठी महागडी औषधं कशाला? त्याऐवजी सोपे-स्वस्त उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

सहसा कामाच्या ठिकाणी, घरी त्रास देणारी गोष्ट म्हणजे डास चावणे. स्वच्छता ठेवण्याचा अट्टहास केला तरी खोलीत असणारा एक डासही पुढील काही तास खराब करु शकतो, अवघ्या काही सेकंदात होणारा डासांचा दंश पुढे अनेक महिन्यांसाठी गंभीर व्याधी देऊन जातो.

मलेरिया सारख्या आजारांनी तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. पण डास चावल्यानंतर हमखास होणारी गोष्ट म्हणजे त्या जागेवर फोड येऊन खाज सुटते. डास चावू नये यासाठी काळजी घेतली जात असली तरी डास चावल्यानंतर मात्र त्यावर महागड्या औषधांचा भडीमार करण्यापेक्षा घरगुती कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहुया..

 

अमोनिया :

घरघुती अमोनिया हा खाजेवर एक प्रभावी उपाय आहे. डास चावण्यावर अमोनिया हा एक चांगला उपाय आहे. अमोनियामुळे त्वचेचा पीएच लेवल बदलतो, आणि काही केमिकल रिअॅक्शन होऊन खाज कमी होते.

 

mosquito bite-inmarathi05
thoughtco.com

 

त्यासाठी एक कापसाचा बोळा घ्या त्यावर जरा अमोनिया घाला आणि डास चावलेली जागा त्याने पुसून काढा. जर डास चावल्या चावल्या हा उपाय केला तर तो जास्त प्रभावी ठरेल. पण ह्यासाठी नेहेमी घरघुती अमोनिया वापरा, जो डायल्यूटेड असेल. लेबॉरेटरीमधील अमोनिया वापरू नये, तो खुप जास्त कॉन्सेन्ट्रेटेड असतो. जर तुमची त्वचा खूप सेन्सिटिव्ह असेल तर हा उपाय करू नये.

 

रबिंग अल्कोहोल :

रबिंग अल्कोहोल म्हणजेच आयसोप्रोपील अल्कोहोल किंवा इथिल अल्कोहोल. डास चावल्यास जर खाज येत असेल तर ह्याने ती कमी होऊ शकते. अल्कोहोलमुळे त्वचा थंड होते. त्यामुळे खाज लगेच कमी होईल आणि ह्याने इन्फेक्शन पण होणार नाही. ह्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे डास चावल्याची सूज कमी होईल.

 

 

हे अल्कोहोल डास चावलेल्या ठिकाणी लावावे. रबिंग अल्कोहोल व्यवस्थितपणे डास चावलेल्या ठिकाणी लावावे, ह्याने सूज आणि खाज कमी होईल. पण ते पूर्णपणे जाईल ह्याची काहीही गॅरंटी नाही.

 

हायड्रोजन पेरॉक्साईड :

हायड्रोजन पेरॉक्साईड हे तुम्हाला कुठल्याही औषधीच्या दुकानातून सहज मिळेल. हे तुम्ही अनेक गोष्टींकरिता जंतुनाशक म्हणून वापरू शकता. ह्याला तुम्ही डास चावल्यावर इन्फेक्शन होऊ म्हणून वापरू शकता. ह्यामुळे खाज, सूज ह्यापासून बचाव होऊ शकतो.

 

mosquito bite-inmarathi03
thoughtco.com

 

एक कापसाचा बोळा हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये भिजवा, त्यानंतर तो डास चावलेल्या जागी लावा. ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसल्याने तुम्ही ह्याला परत देखील लावू शकता. हा उपाय लहान मुले आणि ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी खर्च फायदा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा ह्यासाठी ३% हायड्रोजन पेरॉक्साईडच वापरावा, ६% हायड्रोजन पेरॉक्साईड वापरू नये.

 

हॅण्ड सॅनिटायझर :

हॅण्ड सॅनिटायझरमध्ये एक महत्वाचा इंग्रेडियंट्स हा अल्कोहोल असतो. हॅण्ड सॅनिटायझर हे रबिंग अल्कोहोल प्रमाणेच काम करते. आणि त्यात असलेलं जेल ह्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. डास चावल्यावर जर तुम्ही खाजवलं तर त्यापासून इन्फेक्शन होण्यापासून हे तुम्हाला वाचवेल.

 

mosquito bite-inmarathi02
cdc.gov

 

जरासं हॅण्ड सॅनिटॅयझर डास चावलेल्या जागी लावा आणि त्याला काही वेळाकरिता तसचं सोडून द्या.

 

डीओडरन्ट अॅण्ड अॅन्टीपरस्पिरंट :

डीओडरन्ट किंवा अन्टीपरस्पिरंट हे जास्त काही मदत होणार नाही. ह्यामुळे खाज तर जाणार नाही पण सूज आणि लालसरपणा नक्कीच कमी होईल.

 

mosquito bite-inmarathi09
marriedwiki.com

 

डास चावलेल्या जागी थोडेसे डीओडोरन्ट किंवा अॅन्टीपरस्पिरंट लावावे.

 

साबण :

साबणामुळे त्वचेचा पी एच लेवल बॅलेन्स होते. पण जर डास जरा जास्तच चावला असेल तर हा उपाय तेवढा कामात येणार नाही.

 

mosquito bite-inmarathi08
cdc.gov

 

डास चावलेल्या ठिकाणी पाणी आणि साबण लावून त्याला स्वच्छ करा. खाज शांत करण्यासाठी साबणाचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते. त्यासाठी एखाद्या सौम्य साबणाचा वापर करावा.

 

केचप :

केचप, मस्टर्ड, कॉकटेल सॉस, हॉट पेपर सॉस इत्यादीचा वापर तुम्ही तात्पुरता आराम मिळावा म्हणून करू शकतो. हे सॉस अॅसिडीक असल्यामुळे ते त्वचेला कोरड बनवतात आणि त्यामुळे जळन कमी होते. तसेच फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड सॉस असेल तर त्यामुळे डास चावल्यावर होणारी खाज कमी होईल.

 

mosquito bite-inmarathi04
marieclaire.fr

 

थोडसं सॉस घ्या थंड असेल तर अधिकच उत्तम, काही वेळ डास चावलेल्या जागी लावा आणि मग धुवून घ्या.

डास चावल्याने कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्यापासून टाळण्यासाठी लगेच ह्या उपायांचा वापर करा. त्यामुळे सूज येणार नाही खाज कमी होईल लालसरपणा ही नाहीसा होईल. पण जर जास्तच त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?